भुवनेश्वर येथील सेंट्रल टूल-रूम अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर येथे उपलब्ध असणाऱ्या टूल-डायमेकिंग व मेकॅट्रॉनिक्समधील पदविका अभ्यासक्रमाच्या २०१५-२०१६ सत्रामध्ये प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत –
शैक्षणिक अर्हता
उमेदवारांनी दहावीची शालान्त परीक्षा गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय घेऊन व किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्यांनी वर नमूद केलेल्या विषयांसह शालांत परीक्षा आता दिलेली असावी. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी ४० टक्क्य़ांपर्यंत शिथिलक्षम आहे.
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय १५ ते १८ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारासाठी २१ वर्षांपर्यंत शिथिलक्षम आहे.
अर्ज व माहितीपत्रक
अभ्यासक्रमाचा अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास ५५० रुपयांचा ‘सेंट्रल टूल रूम अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर’च्या नावे असणारा व भुवनेश्वर येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अर्ज पाठविण्याची मुदत
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज सेंट्रल टूल रूम अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर, बी-३६, चांदका इंडस्ट्रियल एरिया, भुवनेश्वर ७५१०२४ या पत्त्यावर पाठविण्याची १८ एप्रिल २०१५ पर्यंत पाठवावेत.     
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षा देण्यासाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा २६ एप्रिल २०१५ रोजी घेण्यात येईल.
उमेदवारांनी शालांत परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अधिक माहिती
या अभ्यासक्रमाच्या संदर्भात सविस्तर माहितीसाठी सेंट्रल टूल-रूम अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटरच्या http://www.cttc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.