बंगळुरू येथील नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट येथे उपलब्ध असणाऱ्या ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन विषयातील विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
उपलब्ध जागा
अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ६० असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत. अभ्यासक्रमाचा कालावधी २६ आठवडय़ांचा असेल.
शैक्षणिक अर्हता
अर्जदारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स अथवा पॉवर इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
निवड पद्धती
अर्जदारांच्या पदवी परीक्षेच्या गुणांकाच्या आधारे त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क
अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ५०० रुपयांचा ‘पीएसटीआय-बंगलोर’ यांच्या नावाने असणारा व बंगळुरू येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवावा.
याशिवाय ज्या अर्जदारांना अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असेल त्यांनी डिमांड ड्राफ्ट विनंतीअर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० मार्च २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बंगळुरूची जाहिरात पाहावी, इन्स्टिटय़ूटच्या http://www.psti.kar.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत
संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज दी प्रिन्सिपल डायरेक्टर, पॉवर सिस्टीम्स ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, सुब्रमण्यपुरा रोड, बनशंकरी सेकंड स्टेज, बंगळुरू ५६००७० या पत्त्यावर ११ मे २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.