केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे केंद्र सरकारचे विविध विभाग आणि मंत्रालय अंतर्गत अभियंत्यांची नेमणूक करण्यासाठी  ‘इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन-२०१५’ ही स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. याकरता पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
जागांचा तपशील
या स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणाऱ्या जागांची एकूण संख्या ४७५ असून त्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल तसेच इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन अभियंत्यांसाठीच्या जागांचा समावेश आहे.
उपलब्ध जागांपैकी २० जागा अपंग उमेदवारांसाठी राखीव आहेत.
आवश्यक शैक्षणिक अर्हता
अर्जदारांनी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल तसेच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
अर्जदारांचे वय ३२ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही  परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर १२ जून २०१५ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्राचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे मुलाखत व वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांची केंद्र सरकारअंतर्गत इंडियन रेल्वे, इंडियन रेल्वे स्टोर्स, सेंट्रल इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसेस, इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी सव्‍‌र्हिसेस, मिलिटरी इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसेस व पीअ‍ॅण्डटी- बिल्िंडग वर्क यासारख्या विभागांत अभियंता म्हणून नेमणूक करण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क-
उमेदवारांनी अर्जासह २०० रु. रोख शुल्क स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा स्टेट बँकेच्या सहयोगी बँकेच्या शाखेत  भरणे आवश्यक आहे.
अधिक  तपशील
यासंदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० मार्च २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची १० एप्रिल २०१५ पर्यंत अर्ज करावा.