यूपीएससीची तयारी : प्रवीण चौगुले

प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-२ मधील आंतरराष्ट्रीय संघटना या अभ्यासघटकाविषयी जाणून घेऊ या. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे काय? त्याचे स्वरूप, उद्दिष्टे याविषयी चर्चा करणे इष्ट ठरेल. आपल्या गरजा, सामूहिक हितसंबंध व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी लोकांचा गट एकत्र येऊन संघटना बनवतो. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले हितसंबंध व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या रूपामध्ये राष्ट्रे संघटित होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बहुतांश संघटना १९ व्या शतकामध्ये उदयास आल्या आणि २०व्या शतकामध्ये त्यांचा विकास झालेला दिसून येतो. २१ व्या शतकाच्या प्रारंभी राष्ट्र राज्ये व अशासकीय घटकांबरोबरच आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा अत्यावश्यक भाग बनल्या आहेत. आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रांमधील सामाजिक, आíथक, राजकीय व सुरक्षाविषयक सहकार्य सुकर करण्याचे कार्य पार पाडतात. युद्धे टाळून शांतता व सुव्यवस्था राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांमध्ये खासगी व सार्वजनिक, वैश्विक व प्रादेशिक, बहुउद्देशीय व विशेषीकृत अशा सविस्तर संरचना दिसून येतात. सामान्य अध्ययन पेपर-२ साठी संयुक्त राष्ट्रसंघ व त्याच्याशी संबंधित इतर संस्था यामध्ये युनिसेफ, युनेस्को, यूएनईपी, जागतिक आरोग्य संघटना या व या प्रकारची इतर अभिकरणे, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, आसियान, युरोपीयन संघ, ओईसीडी, ओपेक, अ‍ॅरपेक, अरब लीग इ. संघटनांचे अध्ययन महत्त्वपूर्ण ठरते. त्यांचे अध्ययन करताना त्यांची संरचना, अधिदेश(Mandate) याबाबी लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरेल. तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास चालू घडामोडींच्या अनुषंगाने करणे सयुक्तिक ठरेल. बऱ्याचदा परीक्षेमध्ये संघटनेशी संबंधित एखादी बाब चच्रेत असल्यास त्यावर प्रश्न विचारला जातो.

उदा. Too little cash, too much politics, leaves UNESCO fighting for life. Discuss the statement in the light of US withdrawl and its accusation of the cultural body as being ‘anti-Israel bias’ (2014). रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावर १३ ऑक्टोबर २०१७ रोजी याच शीर्षकाचा लेख लिहिला होता. अमेरिकेने UNESCO ही संघटना इस्रायलबाबत पक्षपाती धोरणाचा अवलंब करत असल्याचा आरोप करत UNESCO मधून बाहेर पडण्याचा इरादा जाहीर केला. पाठोपाठ इस्रायलनेही असाच निर्णय जाहीर केला होता.

यूपीएससीने मुख्य परीक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय संघटना या घटकावर विचारलेल्या प्रश्नांपकी काही प्रश्नांचा आपण ऊहापोह करू या.

What are the main functions of the United Nations Economic and Social Council? Explain different functional commissions attached to it. (2017). संयुक्त राष्ट्र संघाचे अभिकरण असलेल्या आíथक व सामाजिक परिषदेवर हा पारंपरिक स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रकारच्या प्रश्नांवरून समकालीन घडामोडीइतकेच पारंपरिक भागाचे अध्ययन करणे आवश्यक असल्याचे सिद्ध होते. उत्तरामध्ये या परिषदेची काय्रे नमूद करावीत व संख्याशास्त्रीय आयोग, लोकसंख्या व विकास यावरील आयोग, सामाजिक विकास आयोग स्त्रियांच्या स्थितीवरील आयोग इ.ची माहिती द्यावी.

२०१४ मध्ये जागतिक व्यापार संघटनेवर प्रश्न विचारला गेला –  WTO ही महत्त्वपूर्ण  आंतरराष्ट्रीय संघटना आहे जिथे घेतलेल्या निर्णयाचा सदस्य देशावर दूरगामी परिणाम होतो. WTO चा अधिदेश (WTO) काय आहे आणि WTO चे निर्णय बंधनकारक असतात का?

अलीकडच्या अन्नसुरक्षेवरील चच्रेच्या फेरीमध्ये भारताने घेतलेल्या भूमिकेचे टीकात्मक विश्लेषण करा. असा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न WTO चा अधीदेश, कार्यपद्धती आणि WTO शी संबंधित समकालीन घडामोडी संदर्भात विचारण्यात आला.

WTO चा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर करणे व मुक्त आणि उदार व्यापारासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणे हा आहे. WTO चे निर्णय निरपेक्ष असतात त्यामुळे निर्णय मान्य न करणाऱ्या देशावर र्निबध लावले जाऊ शकतात. भारताने अन्नसुरक्षेवरील चच्रेमध्ये व्यापार सुलभीकरण कराराला (TFA) मान्यता देण्यास नकार दिला. भारताने गरीब जनतेला अन्नधान्याची उपलब्धता व्हावी याकरिता अन्नधान्याच्या सार्वजनिक साठय़ाच्या समस्येवर तोडगा काढावा आणि पीस क्लॉजला (peace clause) मुदतवाढ देण्याची मागणी केली. भारतातील अन्नसुरक्षा हा कळीचा मुद्दा असल्याने भारताला अन्नधान्याच्या साठय़ामध्ये कपात करण्यास बाध्य करण्यामुळे येथील लोकांच्या अन्नसुरक्षेविषयक अधिकाराशी तडजोड होते आहे. तसेच ही बाब संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहस्रक विकास लक्ष्यामधील गरिबी व भूक नष्ट करणे या तत्त्वाच्या विरोधी असल्याने भारताची मागणी रास्त ठरते. आंतरराष्ट्रीय संघटनांविषयीची माहिती संबंधित संघटनेच्या संकेतस्थळावरून मिळते. याबरोबरच या संघटनांशी संबंधित समकालीन घडामोडींचा मागोवा घेत राहिल्याने या घटकाची तयारी परिपूर्ण होईल.