13 July 2020

News Flash

भूगोल चालू घडामोडींच्या अनुषंगाने

बहुतांश प्रश्न माहितीवर (Informative) आधारित स्वरूपाचे आहेत. या घटकाचा अभ्यास करताना काही मूलभूत गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

|| प्रश्नवेध यूपीएससी : डॉ. अमर जगताप

विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेख मालेतील आजच्या सहाव्या लेखामध्ये आपण भूगोल विषयातील चालू घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा ऊर्जा साधन संपत्ती हा घटक चच्रेला घेणार आहोत. प्रत्येक राष्ट्राला अर्थव्यवस्थेच्या वृद्धी विकासाकरिता ऊर्जेचा विनाअडथळा, पुरेसा पुरवठा आवश्यक असतो. परिणामी, प्रत्येक राष्ट्र ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत असते. थोडक्यात, ऊर्जा साधनसंपत्तीचा अभ्यास आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर गेल्या काही वर्षांमध्ये आलेले प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत.

प्र. १.With growing scarcity of fossil fuels, the atomic energy is gaining more and more significance in India. Discuss the availability of raw material required for the generation of atomic energy in India and in the world. (१० गुण)

 प्र. २.  In spite of adverse environmental impact, coal mining is still inevitable for development. Discuss. (१० गुण)

प्र. ३.  Petroleum refineries are not necessarily located nearer to crude oil producing areas, particularly in many of the developing countries. Explain its implications.  (१० गुण)

 वरील प्रश्नांचा विचार केल्यास असे जाणवते की, या घटकावर संकल्पनात्मक किंवा विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जाण्याची शक्यता फार नाही. बहुतांश प्रश्न माहितीवर (Informative) आधारित स्वरूपाचे आहेत. या घटकाचा अभ्यास करताना काही मूलभूत गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण घरगुती व व्यावसायिक पातळीवर ऊर्जा वापरतो. या ऊर्जा प्रकारांचा अभ्यास केल्यास दगडी कोळसा, रॉकेल, LPG, CNG, लाकूड, वीज या स्रोतांचा वापर सर्वाधिक केला जातो. थोडक्यात जीवाश्म इंधने व वीज हे प्रमुख ऊर्जास्रोत आहेत. त्यापकी वीजनिर्मितीसाठी आपण भारतामध्ये विविध पर्यायांचा वापर करतो. त्या पर्यायांमध्ये पुढील घटक समाविष्ट होतात. जल-विद्युत प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्प, अणू विद्युत प्रकल्प, सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती, पवनऊर्जेपासून वीजनिर्मिती, सागरी लाटा, भरती-ओहोटी, सागर प्रवाह यांपासून वीजनिर्मिती, OTEC (Ocean Thermal Energy Conversion), भू-औष्णिक वीजनिर्मिती व जैव ऊर्जेपासून वीजनिर्मिती.

या मार्गानी वीजनिर्मितीचे तंत्रज्ञान भारतात कोणत्या टप्प्यावर विकसित झाले आहे, या प्रकल्पांची भारतातील सद्य:स्थितीतील उपस्थिती, स्थापित क्षमता व एकूण वीजनिर्मिती यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या प्रकारांपकी जे प्रकल्प पुनर्नवीकरणीय व पर्यावरणपूरक आहेत ते आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहेत. अशा पर्यायांबद्दल केंद्र सरकारचे धोरण व सद्य:स्थितीतील योजना व कार्यक्रम यांचा अभ्यास करावा. त्यामध्ये प्रामुख्याने सौरऊर्जा, पवनऊर्जा व लाटांपासून ऊर्जा हे पर्याय सर्वाधिक महत्त्वाचे आहेत.

वीजनिर्मितीमध्ये महत्त्वाचा पर्याय विद्युत उर्जा आहे. भारताने गेल्या दोन दशकांत अणुऊर्जेवरील अवलंबित्व मोठय़ा प्रमाणात वाढविले आहे. त्या अनुषंगाने भारतातील अणु इंधनाचे साठे, त्यांचे वितरण, उत्पादन आणि भारताद्वारे परराष्ट्राकडून होणारी अणू इंधनाची खरेदी या घटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

वीज या ऊर्जास्रोतानंतर अभ्यासावयाचा स्रोत आहे तो म्हणजे जीवाश्म इंधने ! जीवाश्म इंधनांचा पर्यावरणावरील दुष्परिणाम सिद्ध होऊनसुद्धा भारताचे त्यावरील अवलंबित्व फार मोठय़ा प्रमाणात कमी झालेले नाही. परिणामी, भारतातील दगडी कोळशाचे साठे, खनिज तेल व नसíगक वायूचे साठे, त्यांचे वितरण, उत्पादन यांचा सखोल अभ्यास करावा. भारताचा डढएउ राष्ट्रांशी तेलाचा व्यापार, त्याचे स्वरूप, एकूण आयातीतील त्याचा वाटा अभ्यासावा. भारतातील तेलशुद्धीकरण प्रकल्प, तेल व वायू वाहक नलिका मार्गाचे जाळे यांचा नकाशांसह अभ्यास करावा.

सद्य:स्थितीतील वापरामध्ये असणाऱ्या ऊर्जास्रोतांऐवजी नवीन ऊर्जास्रोतांचा विकास केला जात आहे. त्यामध्ये हायड्रोजनसारख्या नवीन स्रोताचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. तसेच इतर पर्यायांचा विचार करावा. त्याबाबतची भारताची भूमिका व विकास भविष्यातील योजनांचा विचार करावा. अशा प्रकारे ऊर्जा साधन संपत्तीच्या अभ्यासाची रणनीती आखणे आवश्यक आहे. ऊर्जा संपत्तीबाबत मूलभूत संकल्पना अभ्यासल्यानंतर चालू घडामोडींचा सखोल आढावा घ्यावा.

आयोगाच्या प्रश्नांचा विचार केल्यास प्रश्न अणुऊर्जा, जीवाश्म इंधने, त्यांचे वितरण, त्याचा पर्यावरणावरील दुष्परिणाम यांवर प्रामुख्याने केंद्रित आहे. वर नमूद केलेल्या प्रश्नांपकी पहिल्या प्रश्नात अणू इंधनाचे वितरण स्पष्ट करताना भारत व जगाच्या नकाशावर वितरण मांडल्यास चांगले गुण प्राप्त होतील. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मांडताना इतर पर्यायांचा पुरेसा विकास न झाल्याने कोळशावरील अवलंबित्वाची भारताची अपरिहार्यता स्पष्ट करावी. ती स्पष्ट करताना त्याचे दुष्परिणाम थोडक्यात स्पष्ट करावेत. तिसरा प्रश्न ऊर्जा साधन संपत्तीपेक्षा उद्योगांचे स्थानिकीकरण याच्याशी संबंधित आहे. त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तेल शुद्धीकरण प्रक्रियेचा व त्यातील उप उत्पादने व त्यावर आधारित उद्योगांचा विकास; या घटकांचा विचार करून विकसनशील देशांसंदर्भात त्याचे परिणाम विशद करणे आवश्यक आहे.

थोडक्यात, विद्यार्थ्यांनी भारताची सद्य:स्थितीतील ऊर्जा साधन संपत्तीबाबतची ध्येयधोरणे लक्षात घेऊन, मूलभूत संकल्पना स्पष्ट करून अभ्यास करावा. या घटकावर नजीकच्या भविष्यात पुन्हा प्रश्न येणार हे निश्चित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 4:44 am

Web Title: upsc exam preparation akp 94 5
Next Stories
1 वनसेवा मुख्य परीक्षा पेपर १ सराव प्रश्न
2 कारभार प्रक्रिया
3 गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा  मराठी आणि इंग्रजी प्रश्नविश्लेषण
Just Now!
X