19 September 2020

News Flash

यूपीएससीची तयारी : भारतीय संविधान

भारतीय संविधान हा अभ्यासघटक एकूणच यूपीएससी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे

(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण चौगले

प्रस्तुत लेखमालेद्वारे आपण वढरउ मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-२चा अभ्यासक्रम आणि या पेपरच्या तयारीसाठी आवश्यक संदर्भसाहित्य याविषयी माहिती घेणार आहोत. या पेपरमध्ये संविधान, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय, कारभारप्रक्रिया व आंतरराष्ट्रीय संबंध या पाच प्रमुख अभ्यासघटकांचा समावेश आहे. या पेपरचा अभ्यासक्रम गतिशील (dynamic) व उत्क्रांत होत जाणार आहे. यातील बहुतांश घटकांचा परस्परांशी संबंध असल्याचे दिसते.

भारतीय संविधान हा अभ्यासघटक एकूणच यूपीएससी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण पूर्व व मुख्य परीक्षेला या घटकावर प्रश्न विचारले जातात. यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या विकासाचा आधार असलेली ब्रिटिश राजवट, ब्रिटिशांनी सन १७७३ साली लागू केलेला नियामक कायदा ते १९३५च्या ‘भारत सरकारचा कायद्यापर्यंत’ केलेले विविध कायदे, भारताच्या स्वातंत्र्य लढय़ामध्ये सहभागी झालेल्या धुरिणांनी स्वतंत्र भारतासाठी कशा प्रकारची राज्यघटना असावी यासाठी केलेल्या प्रयत्नांविषयी जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते. यासोबतच संविधान सभा, उद्दिष्टांचा ठराव घटना सभेतील चर्चा, घटनेतील तरतुदींविषयीची मतमतांतरे, घटनेची स्वीकृती व २६ जानेवारी १९५० मध्ये राज्यघटना प्रचलनात येईपर्यंत ती कशाप्रकारे उत्क्रांत होत गेली याचा मागोवा घेणे परीक्षेचे दृष्टीने महत्त्वाचे ठरते.

घटनाकर्त्यांनी भारताची सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन घटनेमध्ये केलेल्या विस्तृत व सखोल तरतुदी, आवश्यक प्रशासकीय तपशील यामुळे भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे संविधान बनले. संविधानाच्या ठळक वैशिष्टय़ांमध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, जनतेचे सार्वभौमत्व, संसदीय लोकशाही, संघराज्यीय स्वरूप, घटनादुरुस्ती प्रक्रियेतील ताठरता व लवचीकता यांचा मेळ, आणीबाणीविषयक तरतुदी, एकेरी नागरिकत्व अशा महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होतो.

संविधानातील महत्त्वपूर्ण तरतुदींमध्ये मूलभूत अधिकार, राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये आदींचा समावेश होतो.

वर नमूद केलेल्या संविधानातील तरतुदींच्या पार्श्वभूमीवर UPSC मुख्य परीक्षा २०१९ मध्ये धर्मनिरपेक्षता या संकल्पनेशी विचारलेले प्रश्न पाहू या.

What can France learn from the Indian Constitutions approach to secularism?

फ्रान्समध्ये धार्मिक प्रतीकांचा वापर उदा. बुरखा घालण्यावर, पगडी धारण करण्यावर लावण्यात आलेले निर्बंध होते. या प्रश्नामागे या समकालीन घडामोडींची पार्श्वभूमी होती. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याकरिता संविधानामध्ये नमूद असलेली धर्मनिरपेक्षतेची संकल्पना व धार्मिक स्वातंत्र्याविषयीच्या तरतुदी अवगत असणे, गरजेचे आहे. १६ जानेवारी २०१७ रोजी ‘द वायर’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला India’s Approach to Secularism could hold lessons for the West   हा लेख जिज्ञासूंनी अवश्य वाचावा. या लेखामध्ये आपणास या प्रश्नाचे उत्तर सापडते. या प्रकारच्या प्रश्नांवरून एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे संविधानातील संकल्पना या जरी स्थिर (Static) स्वरूपाच्या असल्या तरी समकालीन घडामोडींच्या प्रकाशामध्ये त्यांचे आकलन करून घेणे क्रमप्राप्त ठरते.

संविधानाशी संबंधित उपरोक्त अभ्यासघटकांबरोबर ‘मूलभूत संरचना’ ही संकल्पना व तिच्याशी संबंधित असणारी केशवानंद भारती केस, या संकल्पनेत समाविष्ट तरतुदी अभ्यासणे आवश्यक ठरते.

यासोबतच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी, केंद्र व राज्य सरकारांची कार्ये, जबाबदाऱ्या, राज्यपालाची भूमिका, आणीबाणीविषयक तरतूद जाणून घ्याव्यात.

भारतामध्ये संसदीय पद्धतीचा अंगीकार केलेला आहे. संसद, राज्य विधीमंडळे, त्यांची रचना, कार्ये, सभागृहातील कामकाज, अधिकार, विशेष हक्क, पक्षांतरबंदी इ. बाबी जाणून घेणे उचित ठरेल. सोबतच संसद व राज्य विधीमंडळातील चर्चेचा दर्जा, विरोधी हक्कांचा दुरुपयोग या बाबींची सखोल माहिती आवश्यक ठरते.

राज्यघटनेमध्ये विविध सांविधानिक मंडळांची (Bodies) तरतूद आहे. महालेखापाल (AG) निवडणूक आयोग, यूपीएससी, अनुसूचित जाती व जमाती आयोग, वित्त आयोग यातील पदांची नियुक्ती, रचना व कार्ये, अधिकार व जबाबदाऱ्या यासंबंधीची माहिती असणे महत्त्वाचे ठरते.

२०१८

The Comptroller and Auditor General (CAG) has a Very vital role of play”. Explain how this is reflected in the method and terms of this appointment as well as the range of powers he can exercise.

या प्रश्नाद्वारे संविधानिक राष्ट्रीय मानवी हक्कआयोग, सतर्कता आयोग, प्रशासकीय न्यायाधिकरणे, हरित न्यायाधिकरण TRAI, IRDA इ. वैधानिक, नियामक व अर्धन्यायिक निकाय, त्यांचे कार्य व जबाबदाऱ्या अभ्यासाव्यात.

भारतीय राज्यघटनेच्या अध्यानाची सुरुवात डेमोक्रे टिक पॉलिटिक्स (Class X), इंडियन कॉन्स्टिटय़ूशन अ‍ॅट वर्क्‍स (Class XI) इ. एनसीआरटीच्या पुस्तकांपासून करावी. यानंतर ‘अ‍ॅन इंट्रोडक्शन टू इंडियन कॉन्स्टिटय़ूशन (डी. डी. बसू), आपली संसद (सुभाष कश्यप), भारतीय संविधान व भारतीय राजकारण (तुकाराम जाधव, महेश शिरापूरकर) कॉन्स्टिटय़ूशन ऑफ इंडिया (पी. एम. बक्षी) आदी संदर्भ ग्रंथ विद्यार्थी वापरू शकतात. राज्यघटनेविषयक समकालीन घडामोडींकरिता ढकइ ‘द हिंदू’ बुलेटिन, योजना इ. वृत्तपत्रे व मासिकांचे वाचन पुरेसे ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2020 12:47 am

Web Title: upsc exam preparationnindian constitution zws 70
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : कृषी घटकातील सुधारणा
2 एमपीएससी मंत्र : विज्ञान-तंत्रज्ञान – अभ्यासक्रमाची वैज्ञानिक मांडणी
3 एमपीएससी मंत्र : अर्थव्यवस्था अभ्यासक्रमातील वाढ
Just Now!
X