15 August 2020

News Flash

आंतरराष्ट्रीय संघटना

उत्तराच्या प्रस्तावनेमध्ये युनेस्को (UNESCO) या संघटनेविषयी थोडक्यात माहिती द्यावी.

प्रश्नवेध यूपीएससी : डॉ. गणेश देविदास शिंदे

विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर- २ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकामधील आंतरराष्ट्रीय संघटना, भारत व शेजारील देश, आशिया व दक्षिण-पूर्व आशिया, भारत आणि जग इत्यादी उपघटकांवरील विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत. सर्वप्रथम आपण ‘आंतरराष्ट्रीय संघटना’ या उपघटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांविषयी चर्चा करू या.

1 “Too little cash, too much Politics, leaves UNESCO Fighting for life” Discuss the statement in the light of US withdrawal and its accusation of the cultural body as being anti-Israel bias?

उत्तराच्या प्रस्तावनेमध्ये युनेस्को (UNESCO) या संघटनेविषयी थोडक्यात माहिती द्यावी. तसेच रॉयटर्स या संकेतस्थळावर १३ ऑक्टोबर २०१७ रोजी “Too little cash, too much Politics, leaves UNESCO Fighting for life” या शीर्षकाचा लेख आला होता. आपल्याला उत्तरामध्ये या लेखाचा संदर्भ देता येईल. यामध्ये अमेरिकेने युनेस्को ही संघटना इस्रायलबाबत पक्षपाती धोरणाचा अवलंब करत असल्याचा आरोप करीत युनेस्कोमधून बाहेर पडण्याचा इरादा जाहीर केला होता. अमेरिकेनंतर इस्रायलनेही असाच निर्णय जाहीर केला होता. अशी पाश्र्वभूमी उत्तरामध्ये देता येईल. उत्तराच्या मुख्य भागामध्ये युनेस्को या संघटनेचे मुख्य कार्य आणि उद्दिष्टे नमूद करावीत.

युनेस्कोच्या प्रमुख कार्याअंतर्गत प्रत्येक मुलाला आणि मुलीला योग्य शिक्षण मिळावे, संसाधन व ऊर्जेच्या वितरणात मदत करण्यासाठी तंत्रज्ञान सुधारणे इत्यादी आणि मुख्य उद्दिष्टांतर्गत शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि संप्रेषणाच्या माध्यमातून राष्ट्रामध्ये सहकार्य वाढून जगातील शांतता व सुरक्षिततेला हातभार लावणे इत्यादी मुद्दे मांडावेत.

उत्तराच्या पुढील टप्प्यामध्ये इस्रायलने युनेस्कोच्या विरोधात केलेल्या आरोपांविषयी थोडक्यात लिहावे. उदा. युनेस्को ही इस्रायलने व्यापलेल्या पूर्व जेरुसलेमवर टीका करते, ज्यूंच्या ऐतिहासिक वारसास्थळाला पॅलेस्टाईनचे वारसास्थळ म्हणून मान्यता देणे इत्यादी. उत्तराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अमेरिका, युनेस्को या संघटनेतून बाहेर पडल्यानंतर संघटनेच्या भविष्यावर होणारे परिणाम थोडक्यात मांडावेत.

2 What are the key areas of reform in the WTO has to survive in the Present Context of “Trade War” especially keeping in mind the interest of India?

उत्तराच्या प्रारंभी जागतिक व्यापार संघटनेविषयी ((WTO) थोडक्यात माहिती द्यावी आणि ‘व्यापार युद्ध’ ((Trade War)) म्हणजे काय स्पष्ट करावे. (अमेरिका-चीन या देशांदरम्यान चालू असलेल्या व्यापार युद्धाचा संदर्भ थोडक्यात द्यावा).

उत्तराच्या मुख्य भागात वर्तमानकाळामध्ये व्यापार युद्धाने निर्माण झालेल्या अडचणींमुळे जागतिक व्यापार संघटनेच्या कार्यामध्ये येणारे अडथळे थोडक्यात नमूद करावेत. उदा. व्यापार युद्धाने आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेला पर्यायी प्रादेशिक व्यापारी करार (आशियान, ब्रिक्स इत्यादी) या आधारावर वर्तमानकाळात जागतिक व्यापार संघटनेमध्ये बदलाची आवश्यकता अधोरेखित करावी.

उदा. सर्वसमावेशी व्यापारी धोरण आखणे, जागतिक व्यापार संघटनेमधील प्रलंबित विवादास्पद मुद्दय़ांचा निर्णय त्वरित घेणे इत्यादींमधील भारताचे हितसंबंध विशद करावेत.

3 What are the main function of the United Nations Economics and Social Council (ECOSOC)? Explain different functional commissions attached to it?

उत्तराची सुरुवात संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेची ((ECOSOC)) थोडक्यात माहिती देऊन करावी. उत्तराच्या पुढील भागामध्ये परिषदेच्या कार्याविषयी थोडक्यात लिहावे. उदा. लोकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी रोजगार, आंतरराष्ट्रीय प्रश्न जाणून घेणे, मानवाधिकार इत्यादींविषयी सांगावे आणि उत्तरार्धामध्ये परिषदेशी संलग्न असलेल्या आयोगांची माहिती द्यावी. उदा. लोकसंख्या व विकसनशील आयोग, नार्कोटिक्स ड्रग्ज आयोग इत्यादी.

4 India has recently singed to become founding member of New Development Bank (NDB) and also the Asian Infrastructure Investment Bank (AIIB). Now will the role of the two bank be different? Discuss the strategic signification of these two bank for India.

उत्तराच्या प्रस्तावनेमध्ये NDB आणि AIIB या बँकांच्या स्थापनेविषयी थोडक्यात माहिती द्यावी. तसेच ठऊइ आणि अककइ बँकेचे जागतिक महत्त्व थोडक्यात नमूद करावे. यामध्ये या बँकांच्या स्थापनेने जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांना पर्याय निर्माण झाला आहे, असे सांगता येईल. उत्तराच्या मुख्य भागामध्ये NDB आणि AIIB यांच्या भूमिकेमधील भिन्नता स्पष्ट करावी. उदा. यांच्याद्वारे देशांना मदत करण्याचे स्वरूप, नेतृत्व, मताधिकार, पायाभूत घटकांना देण्यात येणारी मदत इत्यादी. उत्तराच्या अंतिम टप्प्यामध्ये NDB आणि AIIB बँकांच्या स्थापनेने भारताला उपलब्ध होणारे आर्थिक पर्याय, जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील वाढते महत्त्व आणि चीनशी असणाऱ्या संबंधांमधील सुधारणा इत्यादी मुद्दे थोडक्यात नमूद करावेत.

5 Discuss the Impediments India is facing in its Pursuit of a Permanent seat in UNSCO?

उत्तरामध्ये प्रारंभी संयुक्त राष्ट्रांचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या सुरक्षा परिषदेविषयी थोडक्यात माहिती द्यावी. तसेच भारताकडून सुरक्षा परिषदेमध्ये कायम सदस्यत्व मिळवण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांविषयी सांगावे. याअंतर्गत जी-४ (ब्राझील, जर्मनी, जपान आणि भारत) या गटाची स्थापना, सुरक्षा परिषदेच्या विस्ताराविषयीची मागणी आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध व्यासपीठांवर मांडणे, भारताचा प्रादेशिक व लोकसंख्येच्या

आधारावरील दावा इत्यादींचा समावेश होतो. उत्तराच्या पुढील भागात भारताला सुरक्षा परिषदेतील कायम सदस्यत्वासाठी असणारे प्रमुख अडथळे नमूद करावेत.

उदा. पी-५ गट, जी-४ गटाला विरोध करणारा कॉफी गट. भारताची जागतिक ओळख आणि नसíगक स्थिती इत्यादींविषयी थोडक्यात माहिती द्यावी.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2020 2:01 am

Web Title: upsc exam study akp 94 13
Next Stories
1 पूर्वपरीक्षा राज्यव्यवस्था घटकाची तयारी
2 विविध नैतिक द्विधा
3 एमपीएससी मंत्र : राज्यव्यवस्था घटकाची तयारी
Just Now!
X