प्रश्नवेध यूपीएससी : डॉ. गणेश शिंदे

Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा

मागील लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर २ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकाअंतर्गत ‘आंतरराष्ट्रीय संघटना’ या उपघटकातील मुख्य परीक्षेत आलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेतला. प्रस्तुत लेखामध्ये ‘भारत आणि शेजारील देश’ या घटकावर आधारित यूपीएससी मुख्य परीक्षेत आलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेणार आहोत.

 Q. 1. China is using its economic relation and positive trade surplus as tool to develop potential military power status in Asia. In the light of this statement discuss its impact on India as her neighbour.

या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रारंभी चीनच्या आर्थिक धोरणाची उद्दिष्टे नमूद करावेत. उत्तराच्या पुढील टप्प्यात चीनकडून आर्थिक उपक्रमाच्या आडून लष्करी अजेंडा राबविला जातो, याविषयी चीनच्या असलेल्या प्रमुख आर्थिक प्रकल्पांविषयी माहिती द्यावी. उदा. वन बेल्ट, वन रोड उपक्रम, रेशीम मार्ग उपक्रम, भारताभोवती निर्मित िस्ट्रग ऑफ पर्ल उपक्रम इत्यादी. उत्तराच्या पुढील टप्प्यात चीनच्या या धोरणांचा भारतावर शेजारील देश म्हणून आर्थिक आणि सामरिक संबंधांवर (Strategic Relation) होत असलेले परिणाम स्पष्ट करावेत. उदा. व्यापारिक तूट, भारताशेजारील देशांमध्ये चीनकडून पायाभूत संरचना क्षेत्रामध्ये करण्यात येणारी गुंतवणूक याविषयी थोडक्यात विशद करावे.

Q. 2. Increasing cross-border terrorist attacks in India and growing interference in the internal affairs of member state by Pakistan are not conducive for the future of SAARC. Explain with suitable example.

उत्तराच्या प्रस्तावनेमध्ये सार्क संघटनेची स्थापना, उद्देश आणि संघटनेत सहभागी देशांविषयी थोडक्यात माहिती द्यावी. त्याचप्रमाणे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि भारतामध्ये करण्यात येणारा हस्तक्षेप या संदर्भात करण्यात आलेल्या करारांचे उल्लंघन याविषयीचे मुद्दे अधोरेखित करावेत.

उदा. तालिबानला समर्थन, बांगलादेशातील बॉम्बस्फोट इत्यादी प्रकारच्या पाकिस्तानच्या कारवायांमुळे इस्लामाबाद येथे नियोजित सार्क संघटनेच्या परिषदेवर सदस्य राष्ट्रांनी बहिष्कार घातल्याने सार्कच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. उत्तराच्या पुढील भागामध्ये पाकिस्तानच्या भूमिकेमुळे सार्कचा मूलभूत उद्देश, दक्षिण आशियातील एकीकरण, संपर्क, व्यापार इत्यादी बाबींवर प्रभाव पडत असल्याने सार्कच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे विशद करावे. उत्तराच्या अंतिम भागामध्ये दक्षिण

आशियामध्ये शांतता स्थापन होण्यासाठी पाकिस्तानची महत्त्वाची भूमिका आणि सार्कच्या निर्णयप्रक्रियेमध्ये बदल करीत बहुमतावर भर देण्यासंदर्भात उपाय सुचवावेत. तसेच भारताला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा आणि सार्कचे व्यासपीठ महत्त्वपूर्ण असल्याचे थोडक्यात सांगून उत्तराचा शेवट सकारात्मकपणे करावा.

 

 Q. 3. Project Mausam is considered a unique foreign policy initiative of Indian government to improve relationship with its neighbours does the project have strategic dimension? Discuss.

प्रारंभी प्रोजेक्ट मौसमविषयी थोडक्यात सांगून या प्रकल्पाअंतर्गत असणारा त्रिकोणीय दृष्टिकोन स्पष्ट करावा. ज्यामध्ये सांस्कृतिक संबंध सुदृढ करणे, सागरी सुरक्षा सुनिश्चिलत करणे, िहदी महासागरालगत असलेल्या देशांशी आर्थिक संबंध वाढवणे या बाबींचा समावेश होतो.

उत्तराच्या पुढील टप्प्यात चीनमार्फत िहदी महासागरालगतच्या देशांमध्ये करण्यात येणारी गुंतवणूक आणि सागरी रेशीम मार्ग यामुळे भारताच्या चिंतेमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट करावे. उत्तराच्या अंतिम टप्प्यात भारताच्या प्रोजेक्ट मौसमचे सांस्कृतिक आणि सामरिक महत्त्व स्पष्ट करावे.

   Q. 4. What do you understand by the string of pearls? How does it impact? and Brifly outline the steps taken by India to counter this?

प्रस्तावनेमध्ये ‘मोत्याची माळ’

(String of pearls) म्हणजे काय ते स्पष्ट करावे. यानंतर चीनचा िहद महासागरातील वाढता प्रभाव अधोरेखित करून याविषयी असलेले भौगोलिक, आर्थिक, सामरिक आणि लष्करी महत्त्व आणि भारताला घेरण्याच्या धोरणाविषयी थोडक्यात माहिती द्यावी. उत्तराच्या पुढील टप्प्यात ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल’ सिद्धांताअंतर्गत चीनने सांगितलेली उद्दिष्टे नमूद करावीत. उदा. ऊर्जा सुरक्षा, नवीन बाजारपेठ, सागरी मार्गातील व्यापारावर नियंत्रण इत्यादी. उत्तराच्या पुढील टप्प्यामध्ये उपरोक्त बाबींचा भारतावर होणारा परिणाम विशद करावा. उदा. शेजारील देशात भारताचे महत्त्व कमी होणे, चिनी लष्करी धोरणाचा प्रभाव इत्यादी. अंतिम टप्प्यामध्ये भारताने या सिद्धांताचा प्रतिकार करण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाविषयी थोडक्यात सांगावे. उदा. म्यानमारमध्ये सितवे बंदराचा विकास, मालदीवमध्ये हवाई तळाची स्थापना, हिंदी महासागरालगत निर्माण ट्रिपराइट टेक्निकल एक्सपर्ट ग्रुप (TIEG) ला भारताची भरीव आर्थिक मदत.

  Q. 5. What is meant by Gujarat doctrine? Does it have any relevance today? Discuss.

उत्तराच्या प्रथम टप्प्यात गुजराल सिद्धांताविषयी थोडक्यात सांगावे. उत्तराच्या पुढील टप्प्यात गुजराल सिद्धांताअंतर्गत दक्षिण आशियातील भारतीय परराष्ट्रीय धोरणाविषयीचे महत्त्वपूर्ण मुद्दे सांगावेत. उदा. दक्षिण आशियातील भारताशेजारील राष्ट्रांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करणे, या राष्ट्रांना परतफेडीची अपेक्षा न करता मदत पुरविणे, दक्षिण आशियामध्ये अशांततेसाठी भूभागाचा वापर न होऊ देणे इत्यादी. या सिद्धांतानुसार भारताने सार्क राष्ट्रांना वेळोवेळी परतफेडीची अपेक्षा न ठेवता मदत पुरविली. जसे भूकंप, त्सूनामी आणि या राष्ट्रांचा अनेकदा यथोचित सन्मान राखला. उत्तराच्या अंतिम टप्प्यात या सिद्धांतातील द्विपक्षीय स्तरावरील वाद सोडवणे आणि हस्तक्षेपाच्या धोरणामुळे ‘गुजराल सिद्धांत’ आजही प्रासंगिक असल्याचे सांगून उत्तराचा शेवट सकारात्मक करावा.