25 February 2021

News Flash

भारत आणि  आशियाई देश

प्रस्तुत लेखामध्ये ‘भारत आणि आशियाई देश’ या घटकांवर आधारित यूपीएससी मुख्य परीक्षेत आलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेणार आहोत.

|| प्रश्नवेध यूपीएससी : डॉ. गणेश देविदास शिंदे

विद्यार्थी मित्रांनो, मागील लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर- २ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकांतर्गत ‘भारत आणि शेजारील देश’ या उपघटकातील यूपीएससी मुख्य परीक्षेत आलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेतलेला आहे. प्रस्तुत लेखामध्ये ‘भारत आणि आशियाई देश’ या घटकांवर आधारित यूपीएससी मुख्य परीक्षेत आलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेणार आहोत.

Q. 1. India’s relations with Israel have of late acquired a depth and diversity, which can not be rolled back. discuss.

या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रारंभी भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये वेगाने विकसित होणाऱ्या संबंधांना व्यावहारिक ध्येयधोरणे आणि राष्ट्रीय हितांनी विशिष्ट खोली आणि विविधता मिळवून दिल्याचे नमूद करावे. उत्तराच्या पुढील टप्प्यामध्ये भारताचे इस्रायलसोबतचे सामरिक, तंत्रज्ञानविषयक, आर्थिक, संरक्षणविषयक संबंध थोडक्यात मांडावेत. उदा. रशिया आणि अमेरिकेनंतर इस्रायल भारताला संरक्षण साहित्य पुरवणारा तिसरा मोठा भागीदार देश आहे. तसेच दहशतवादाला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इस्रायलकडून भारताला मदत पुरवण्यात येते उदा. बराक क्षेपणास्त्र, द्रोण. उत्तराच्या पुढील भागामध्ये भारत-इस्रायल यांच्यामधील आर्थिक संबंधांवर थोडक्यात प्रकाश टाकावा. उदा. द्विपक्षीय व्यापार, इस्रायली तंत्रज्ञानाला भारतीय बाजारपेठेची उपलब्धता आणि दोघांनी व्यापारासाठी एकमेकांना प्राधान्य देण्यासंदर्भात सहमती दर्शवणे इत्यादी.

उत्तराच्या अंतिम टप्प्यामध्ये इस्रायलकडून कृषी, पर्यावरण, आरोग्य, संचार व्यवस्थेमधील सहयोग आणि पर्यटनाच्या माध्यमातून जनतेमधील संबंध वाढवले जात असल्याचे आणि भारतीय पंतप्रधानांच्या इस्रायल भेटीविषयी थोडक्यात सांगून पश्चिम आशियामधील भारतीय हितांना पूर्ण केले जात असल्याचे सांगावे.

  Q. 2 A Number of outside Powers have entrenched themselves in central Asia, which is a zone of Internet to India. discuss the implications in this context of India’s joining the Ashgabat Agreement 2018?

उत्तराच्या प्रस्तावनेमध्ये अश्गाबात करार- २०१८ या विषयी थोडक्यात माहिती द्यावी. उत्तराच्या पुढील भागात भारताचे मध्य-अशियाई धोरणाचे महत्त्व अधोरेखित करावे. त्याअंतर्गत संपर्क व्यवस्था स्थापित करणे (संचार, परिवहन), नसíगक संसाधनांचा शोध आणि या माध्यमातून देशाची ऊर्जा आवश्यकता पूर्ण केली जाऊ शकते.

मध्य-आशियामध्ये व्यापारिक केंद्राची निर्मिती करणे आणि येथील देशांसोबत सामरिक संबंध स्थापित करणे या बाबीवर प्रकाश टाकावा. उत्तराच्या पुढील टप्प्यामध्ये रशिया व चीनमार्फत मध्य-आशियावर स्थापित करण्यात येणाऱ्या प्रभावाविषयी थोडक्यात सांगावे. उदा. रशिया-सुरक्षा आणि पारंपरिक प्रभाव आणि

चीन-द्विपक्षीय व्यापार, रेशीम मार्ग इत्यादी. उत्तराच्या पुढील टप्प्यात भारत, अश्गाबात करार-२०१८ मध्ये समाविष्ट झाल्याने होणाऱ्या प्रभावाविषयी थोडक्यात सांगावे. उदा. भारताला युरेशिया या भागाशी व्यापार आणि संपर्क स्थापित होण्यासाठी मदत होईल. यामुळे युरोप व मध्य-आशियाशी संबंध स्थापित होण्यास साहाय्यभूत ठरेल.

उत्तराच्या अंतिम टप्प्यात अश्गाबात करारामुळे भारताचे मध्य आशियाई देशांशी थेट व्यापारिक संबंध प्रस्थापित झाल्याने या प्रदेशातील चीनच्या वाढत्या प्रभावाला संतुलित करता येऊ शकते, असे लिहून उत्तराचा शेवट करावा.

Q. 3 A question of India’s Energy security constitutes the most important part of India’s economic progress. analyze India’s energy Policy co-operation with west Asian countries.

उत्तराच्या प्रारंभी भारताच्या आर्थिक विकासामध्ये असलेले ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करावे. उदा. भारत ऊर्जेच्या उपयोगामध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि मुख्यत: ऊर्जेच्या आयातीवर अवलंबून आहे. उत्तराच्या पुढील टप्प्यात भारताचे ‘पश्चिमेकडे बघा’

(Look West Policy) हे परराष्ट्रीय धोरण मुख्यत: इराण, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, इराक, कतार, पॅलेस्टाइन आणि इस्रायलसोबत चांगले संबंध स्थापित करणे याविषयी थोडक्यात सांगावे.

उत्तराच्या पुढील टप्प्यात पश्चिम आशियासोबत भारताचे ऊर्जेविषयक धोरण सहकार्याविषयी थोडक्यात सांगावे. उदा. भारत-यूएईदरम्यान संकटकालीन तेलाच्या राखीव साठय़ाविषयी करार, यूएई आणि सौदी अरब या देशांना तेथील तेलासाठी भारत एक उत्तम बाजारपेठ आहे. भारतात कतारकडून एकूण ६६% एल.एन.जी. आयात केली जाते, इत्यादी बाबी सांगता येतील.

Q. 4 Economic ties between India and Japan while growing in the recent years are still for below their potential. Elucidate the policy Constraints which are inhibiting this growth.

उत्तराच्या प्रारंभी भारत-जपान यांच्यामधील द्विपक्षीय संबंधांविषयी थोडक्यात माहिती द्यावी (सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक). उत्तराच्या पुढील टप्प्यामध्ये भारताच्या ‘पूर्वेकडे बघा’ (Look East Policy) धोरणाअंतर्गत जपानचे त्यात महत्त्वपूर्ण स्थान असून जपानमार्फत भारताला उद्योग संचालनासाठी करत असलेल्या सहकार्याबद्दल थोडक्यात सांगावे. उदा. जपानचे अनेक उद्योग जसे टोयोटो, होंडा, सुझुकी भारतात कार्यरत असून ते उद्योग आर्थिक व्यापाराला चालना देत आहेत.

उत्तराच्या पुढील टप्प्यात भारत-जपान यांच्यातील द्विपक्षीय आर्थिक संबंधांच्या वाढीमध्ये येणारे अडथळे थोडक्यात नमूद करावेत. उदा. भारताचे आण्विक संरक्षणाविषयीचे धोरण आणि जपानचे नि:शस्त्रीकरणाचे धोरण परस्परविरोधी असल्याने व्यापार-वाणिज्य यांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. सन १९९१ नंतरच्या आर्थिक सुधारणांनंतरही लालफितीचा कारभार, भ्रष्टाचार, राजकीय विचारप्रवाह इत्यादींमुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांवर चीनच्या उदयाचा प्रभाव पडला आहे, असे मुद्दे मांडावेत. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, बुलेट ट्रेन इत्यादी प्रकल्पांमध्ये असणारे जपानचे सहकार्य अधोरेखित करून उत्तराचा शेवट सकारात्मकपणे करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:16 am

Web Title: upsc exam study akp 94 16
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : यूपीएससी काही प्रमुख पदांची ओळख
2 नोकरीची संधी
3 अंकगणित, तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता तयारी
Just Now!
X