News Flash

भारतीय कला आणि संस्कृती

मध्ययुगीन भारतीय कला व संस्कृतीचा अभ्यास उपरोक्त पद्धतीने करावा.

 

यूपीएससीची तयारी : डॉ. गणेश देविदास शिंदे

प्रस्तुत लेखामध्ये आपण यूपीएससी पूर्वपरीक्षेकरिता असलेल्या भारतीय कला आणि संस्कृती या घटकाविषयी चर्चा करणार आहोत. भारतीय कला आणि संस्कृती या घटकाची व्याप्ती व परीक्षेतील वेटेज लक्षात घेता या घटकाविषयी परीक्षार्थीना नेमक्या आणि निश्चित रणनीतीचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे. या रणनीतीच्या आधारे हा घटक अत्यंत सुलभ बनवता येतो. या घटकावर सन २०११ ते २०१९मध्ये सरासरी एकूण ४७ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पूर्वपरीक्षेतील या घटकाचे महत्त्व वाढत चाललेले आहे. कारण या विषयाची तयारी फक्त पूर्वपरीक्षेसाठी मर्यादित नसून मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन – पेपर १ साठीही या घटकाचे अध्ययन करावे लागते. त्यामुळे या विषयाची र्सवकष तयारी करणे आवश्यक आहे.

भारतीय कला व संस्कृती या घटकाची तयारी आणि नियोजन करीत असताना याची सुरुवात प्राचीन भारतातील कला व संस्कृतीपासून करावी लागते. याद्वारे प्राचीन भारतात अस्तित्वात आलेल्या विविध कला व संस्कृतींचा उगम कशा प्रकारे झाला, याची ऐतिहासिक पाश्र्वभूमी आपल्याला लक्षात घेता येते. तसेच या घटकांतर्गत भारतीय स्थापत्यकला व शिल्पकला, भारतीय संगीत, नाटक व नृत्य, भारतीय चित्रकला, साहित्य आणि तत्त्वज्ञान यांचे सखोल व र्सवकष अध्ययन करणे गरजेचे आहे.

प्राचीन भारतातील घटकांचे सिंधू संस्कृती, वैदिक काळ, बौद्ध युग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौर्य कालखंड, मौर्योत्तर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड अशा प्रकारे कालखंडनिहाय वर्गीकरण करून संबंधित कालखंडातील स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, साहित्य आणि तत्त्वज्ञान यांच्याशी संबंधित विविध संकल्पना, कलेचे प्रकार आणि वैशिष्टय़े तसेच त्यांच्याशी निगडित ऐतिहासिक स्थळे, या स्थळांची निर्मिती नेमकी कोणत्या कालखंडात आणि कोणी केली, कोणत्या धर्माशी संबंधित होती इत्यादी पलूंविषयी मूलभूत माहितीचा अभ्यास सर्वप्रथम करावा लागतो. ज्यामुळे या विषयाची परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी तयारी आपणाला करता येते.

मध्ययुगीन भारतीय कला व संस्कृतीचा अभ्यास उपरोक्त पद्धतीने करावा. कारण प्राचीन भारतातील विविध कलांचे परिपक्व स्वरूप आपणाला या कालखंडात पाहावयास मिळते. उदाहरणार्थ स्थापत्य कला, चित्रकला आणि हिंदू धर्माव्यतिरिक्त इस्लाम धर्माशी संबंधित इंडो-इस्लामिक स्थापत्यकलेचा उदय झालेला पाहावयास मिळतो. चित्रकलेमध्ये भित्ती चित्रकलेसोबत लघू चित्रकलेचा उदय झालेला दिसून येतो. यासोबत धर्मनिरपेक्ष साहित्य, परकीय प्रवाशांचे प्रवासवर्णने, दरबारी साहित्यही दिसून येते. स्थापत्यकला आणि प्राचीन व मध्ययुगीन कालखंडातील विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी संबंधित माहिती असणे आवश्यक आहे.

या अभ्यासघटकांचे निश्चित स्वरूप जाणून घेण्यासाठी यूपीएससी पूर्वपरीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न पाहू या.

(१) खालील विधानांचा विचार करा. (२०१९).

(क) बुद्धांचे देवस्थान

(कक) बोधीसत्त्वाच्या मार्गावर चालणे

(ककक) प्रतिमा पूजा व विधी

वरीलपैकी कोणते महायान बौद्ध धर्माचे वैशिष्टय़ आहे?

(अ) केवळ क

(इ) केवळ क आणि कक

(उ) केवळ कक आणि ककक

(ऊ) क, कक, ककक

टीप : यूपीएससी पूर्वपरीक्षेत जैन धर्म आणि बौद्ध धर्म यांविषयी सतत प्रश्न विचारले जातात.

 

(२) पुढील विधानांचा विचार करा. (२०१९).

(क) संत निंबार्क हे अकबराचे समकालीन होते.

(कक) संत कबीर यांचा शेख अहमद सरिहडी यांच्यावर फार प्रभाव होता.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/त?

(अ) केवळ क

(इ) केवळ कक

(उ) क आणि कक दोन्हीही

(ऊ) क आणि कक  दोन्हीही नाहीत.

 

(३) पुढीलपैकी मियाँ तानसेन यांच्याविषयीचे कोणते विधान योग्य नाही. (२०१९).

(अ) तानसेन ही अकबर बादशाहने दिलेली पदवी होती.

(इ) तानसेन यांनी हिंदू देवी-देवतांवर ध्रुपदांची रचना केली.

(उ) तानसेन यांनी आपल्या संरक्षकांवर (ढं३१ल्ल२) गाणी रचली.

(ऊ) तानसेन यांनी अनेक रागांचा शोध लावला.

२०१८ – या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मुघल स्थापत्यकला, ईशान्य भारतातील नृत्य, भारतीय हस्तकला, राजस्थानी चित्रकला इत्यादी विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

२०१७ – या वर्षीच्या पेपरमध्ये जैनधर्म, चित्रकला, जमातीचे सण-उत्सव, मंदिर स्थापत्य इत्यादी विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

या घटकांवर आलेल्या प्रश्नांचे योग्य आकलन केल्यास असे दिसून येते की, प्रश्नांचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक या दोन्ही प्रकारांत मोडणारे आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास, या घटकांच्या मूलभूत माहितीसह विश्लेषणात्मक बाजू विचारात घेऊन करावा लागतो. तसेच या घटकांशी संबंधित संकल्पना, त्यांचा अर्थ, उगम व वैशिष्टय़े इत्यादींची माहिती असणे गरजेचे आहे.

संदर्भसाहित्य – या घटकाच्या तयारीसाठी

ठउएफळ – अकरावीAn Introduction to Indian Art Part-I, NCERT – बारावी Themes in Indian History Part-I & II, NCERT  आर. एस. शर्मा (प्राचीन) आणि सतीश चंद्र (मध्ययुगीन) या पुस्तकांमधील काही घटक आणि तमिळनाडू

बोर्ड – बारावी इ. संदर्भ ग्रंथांचा आधार घेता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 12:21 am

Web Title: upsc exam study akp 94 18
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पूर्व परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी
2 करिअर क्षितिज : औषधनिर्माण तंत्रज्ञान
3 नोकरीची संधी
Just Now!
X