: सुश्रुत रवीश

मागील काही लेखांमध्ये आपण विविध नैतिक विचारसरणींचा अभ्यास केला. यूपीएससीच्या सामान्य अध्ययनाच्या चौथ्या पेपरमधील, विभाग ‘अ’ मध्ये या विचारसरणींवर आधारित अनेकदा थेट प्रश्न विचारले जातात. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारे विचारलेले प्रश्न आणि त्यांची नैतिक विचारसरणींनुसार विभागणी देत आहे. याचा उमेदवारांना नक्कीच फायदा होईल.

(अ) उपयुक्ततावादी विचारसरणी

(1) In doing good thing, everything is permitted which is not prohibited expressly or by clear implication. Examine the statement with suitable examples in the context of public servant discharging his/her duties. (2018, 150 words, 10 Marks)

(१) एखादे चांगले काम करताना/चांगला निर्णय घेताना ज्या गोष्टी स्पष्टपणे वज्र्य केलेल्या नाहीत तसेच ज्यांच्या वज्र्यतेबद्दल स्पष्टता नाही अशा सर्व गोष्टींना परवानगी असते. लोकसेवकाच्या सेवेसंदर्भात योग्य अशी उदाहरणे देऊन वरील विधानाचे परीक्षण करा.

(२०१८, १५० शब्द, १० गुण)

(2) The increased national wealth does not result in equitable distribution of its benefits. It has created only some enclaves of modernity and prosperity for a small minority at the cost of the majority. Justify. (2017, 150 words, 10 marks)

(२) वाढलेल्या राष्ट्रीय संपत्तीच्या फायद्यांचे समताधिष्ठित वाटप आढळून येत नाही. यामुळे बहुसंख्यांकांना डावलून काही ठरावीक अल्पसंख्यांकांसाठी आधुनिकतेचे व सुबत्तेचे बेट तयार होते. स्पष्ट करा.

(२०१७, १५० शब्द, १० गुण)

(3) What is Environmental Ethics? Why is it important to study? Discuss any one environmental issue from the viewpoint of environmental ethics (2015, 150 words, 10 marks)

(३) पर्यावरणीय नीतीशास्त्र म्हणजे काय? या संकल्पनेचा अभ्यास का महत्त्वाचा आहे? कोणत्याही एका पर्यावरणीय मुद्याचा पर्यावरणीय नीतीशास्त्राच्या दृष्टिकोनातून चर्चा करा.

(२०१५, १५० शब्द, १० गुण)

(ब) कर्तव्यवादी विचारसरणी

(1) With regard to the morality of actions, one view is that means is of paramount importance and the other view is that ends justify the means. Which view do you think is more approporiate? Justify your answer. (2018, 150 words, 10 marks) (१) नैतिक कृतींच्या संदर्भात एक मत असे आहे की, ‘साधन’ हे सर्वोच्च महत्त्वाचे असते तर दुसरे मत असे आहे की, ‘साध्य’ हेच साधनांच्या प्रस्तुततेला स्पष्ट करू शकते. आपल्या मते कोणते मत योग्य आहे? आपल्या उत्तराचे स्पष्टीकरण द्या. (२०१८, १५० शब्द, १० गुण)

 

(2) Human beings should always be treated as in themselves and never as merely means. Explain the meaning and significance of this statement, giving its implications in the modern techno – economic society. (2014, 150 words, 10 marks)

(२) व्यक्तींचा कधीही साधन म्हणून विचार न करता ‘साध्य’ म्हणूनच विचार केला गेला पाहिजे. तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था असणाऱ्या आधुनिक समाजासाठी वरील विधानाचा अर्थ, महत्त्व व परिणाम स्पष्ट करा.

(२०१४, १५० शब्द, १० गुण)

(क) सद्गुणावर आधारित विचारसरणी

(1) In the context of civil services, state the 3 universal basic values and bring out their importance. (2018, 150 words, 10 marks) (१) नागरी सेवेसंदर्भातील ३ वैश्विक मूलभूत मूल्ये विषद करा. तसेच त्यांचे महत्त्व अधोरेखित करा. (२०१८, १५० शब्द, १० गुण)

(2) While looking for people to hire, you look for three qualities. : Integrity, Intelligence and energy. And if they do not have the first, the other two will kill you. – Warren Buffett.

What do you understand by this statement in the present-day scenario (2018, 50 words, 3 marks)

(२) “नोकरीसाठी भरती करताना उमेदवारांमध्ये तुम्ही तीन गुणांच्या शोधात असता : सचोटी, बुद्धिमत्ता आणि उर्जा. जर पहिला गुण व्यक्तींमध्ये/उमेदवारांमध्ये नसेल तर बाकीचे दोन गुण तुम्हाला ठार करतील” – वॉरेन बफे

प्रस्तुत विधानामधून आजच्या संदर्भात आपणास काय समजते? प्रस्तुत विधानाचा आजच्या संदर्भात विचार करता आपणास काय बोध होतो?

(२०१८, ५० शब्द, ३ गुण)

(3) Examine the relevance of the following in the context of civil service. (2017, 150 words, 10 marks)

(A) Transparency

(B) Accountibility

(C) Fairness and Justice

(D) Courage of Conviction

(E) Spirit of Service

(२०१७, १५० शब्द, १० गुण)

(अ) पारदर्शकता

(ब) उत्तरदायित्व

(क) निष्पक्षपातीपणा आणि न्याय

(ड) स्वत:च्या मतांवरील ठाम विश्वास

(इ) सेवाभावी वृत्ती

वरील प्रश्नांव्यतिरिक्त विभाग ‘अ’ मध्ये इतरही अनेक प्रश्न सोडवत असताना वरील ३ नैतिक विचारसरणींचा वापर केला जाऊ शकतो. या विचारसरणींमधील मुख्य मूल्यांची माहिती, त्यातील बारकाव्यांचा अभ्यास, ते मांडणाऱ्या विचारवंतांच्या नैतिक धारणांची माहिती असणे, व सरतेशेवटी या नैतिक विचारांचा प्रत्यक्ष आयुष्यातला वापर आणि महत्त्व यांची जाणीव या बाबींवर वरील प्रश्नांची उत्तरे प्रभावीपणे देणे अवलंबून आहे. या सगळ्या प्रश्नांची या सगळ्या अभ्यासाव्यतिरिक्त दिलेली उत्तरे ढोबळ आणि वरवरची वाटतात. तसेच १५० शब्दांच्या मर्यादेत राहून अर्थपूर्ण आणि नेमके उत्तर देण्यासाठी विचारसरणीच्या या अभ्यासाची नक्कीच मदत होते. पुढील लेखात आपण सामाजिक मानसशास्त्रविषयीचे काही घटक आणि त्यातील बारकावे पाहणार आहोत.