News Flash

यूपीएससी : वैद्यकीय सेवा परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या कम्बाइन्ड मेडिकल सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन- २०१४ या निवड परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत -

| April 14, 2014 01:05 am

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या कम्बाइन्ड मेडिकल सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन- २०१४ या निवड परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत –
जागांची संख्या : या निवड परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या एकूण जागांची संख्या ८७५ आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार एमबीबीएम उत्तीर्ण झालेले असावेत अथवा एमबीबीएसच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
वयोमर्यादा : अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांचे वय ३२ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर २२ जून २०१४ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये राज्यातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क : अर्जासह भरायचे शुल्क म्हणून २०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरावे.
अधिक माहिती व तपशील : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ मार्च २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०१४.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 1:05 am

Web Title: upsc medical services exam
टॅग : Upsc
Next Stories
1 केंद्रीय लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी परीक्षा
2 कर्मचारी निवड आयोगाची हिंदी भाषांतरकार निवड परीक्षा
3 राष्ट्रीय पुरातत्त्व विभागात पुरातत्त्व साहाय्यकांच्या १५ जागा
Just Now!
X