श्रीकांत जाधव

मागील लेखामध्ये आपण या घटकाचे स्वरूप कसे आहे, याची माहिती घेतलेली आहे. आजच्या लेखात आपण या घटकातील शाश्वत विकास, गरिबी, समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी नमूद मुद्दय़ांवरील गतवर्षीय पूर्वपरीक्षांमध्ये (२०११—२०१९) विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांचा आढावा आधी  घेऊया.

२०१९ मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न The Global Competitiveness Report कोण प्रकाशित करते हा प्रश्न विचारण्यात आलेला होता, यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, संयुक्त राष्ट्रांची व्यापार आणि विकास परिषद ((UNCTAD), वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि जागतिक बँक असे पर्याय देण्यात आलेले होते.

Atal Innovation Mission  कोणाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेले आहे, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, कामगार आणि रोजगार मंत्रालय, निती आयोग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय असे पर्याय देण्यात आलेले होते.

भारतात एखाद्या दिल्या गेलेल्या वर्षांमध्ये अधिकृत गरिबी रेषा (Official Poverty Line) काही राज्यांमध्ये अधिक आहे तर काही राज्यांत कमी आहे, असे का? असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि यासाठी गरिबी दर हा राज्या राज्यामध्ये वेगळा असतो, किमतीचा स्तर राज्या राज्यामध्ये वेगळा असतो, स्थूल राज्य उत्पादन राज्या राज्यामध्ये वेगळे असते आणि सार्वजनिक वितरण प्रणालीची गुणवत्ता राज्या राज्यामध्ये वेगळी असते, असे पर्याय देण्यात आलेले होते.

२०११ ते २०१८ मधील काही प्रश्न २०११ मध्ये  ‘खालीलपैकी कोण सरकारच्या सर्वसमावेशक वाढीच्या उद्देशाला साहाय्यकारी ठरू शकते?’  असा प्रश्न विचारण्यात आला होता आणि खालील तीन विधाने देण्यात आली होती आणि यातील योग्य विधान/विधाने कोणते/ती हे ओळखून पर्याय निवडायचा होता.

१. स्वयंसाहाय्यता बचत गटाचा प्रसार.

२. सूक्ष्म, छोटी आणि मध्यम उपक्रम प्रसार

३. शिक्षणहक्क कायद्याची अंमलबजावणी

२०१२ मध्ये ‘Oxford Poverty and Human Development Initiative’ यांनी UNDP च्या मदतीने विकसित केलेल्या मल्टीडायमेन्शनल पॉव्हर्टी इंडेक्स (Multi Dimensional Poverty Index) यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता व यासाठी तीन विधाने देण्यात आलेली होती व यातील योग्य विधाने/विधाने कोणती याची निवड करून पर्याय निवडायचा होता.

१. घरपोच शिक्षण, आरोग्य, मालमत्ता आणि सेवा यांपासून वंचित.

२. राष्ट्रीय स्तरावरील क्रयशक्ती साम्य.

३. राष्ट्रीय स्तरावरील तुटीच्या अर्थसंकल्पाचे प्रमाण आणि स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा दर.

२०१३ मध्ये ‘लोकसांख्यिकीय लाभांशाचे संपूर्ण फायदे प्राप्त करण्यासाठी, भारताने काय करणे क्रमप्राप्त आहे?’असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि यासाठी खालील चार पर्याय देण्यात आले होते.

१. कौशल्यविकास प्रसार,

२. अधिक प्रमाणात सामाजिक सुरक्षा योजना सुरू करणे,

३. बालमृत्यू दरामध्ये घट करणे आणि

४. उच्च शिक्षणाचे खाजगीकरण करणे

२०१५ मध्ये Bio Carbon Fund Initiative for Sustainable Forest Landscape हा फंड कोण व्यवस्थापित करते, आणि Rio+sq Conference काय आहे? असे दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते.

२०१६ मध्ये SWAYAM या भारत सरकारच्या उपक्रमावर प्रश्न विचारण्यात आलेला होता व या उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे, हे दिलेल्या पर्यायातून निवडायचे होते.

तसेच २०१७ मध्ये National Nutrition Mission चे उदिष्टे काय आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

२०१८ मध्ये मानवी भांडवलावर (Human Capital) प्रश्न विचारण्यात आलेला होता.

एकू णच या घटकावर बहुपर्यायी (MCQ) पद्धतीचे प्रश्न अधिक विचारले जातात. या घटकावर विचारण्यात आलेले प्रश्न हे या घटकाचे वस्तुनिष्ठ स्वरूप ग्रा धरून विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे या घटकाचे योग्य आकलन करून संबंधित मुद्दय़ाविषयी वस्तुनिष्ठ माहिती संकलन करून अभ्यास करणे अधिक उपयुक्त ठरणारे आहे.

अभ्याससाहित्य

या घटकाची परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीची इयत्ता ११ वीचे Indian Economic Development  आणि इयत्ता १२ वीचे Macro Economics ही पुस्तके वाचावीत, ज्यामुळे या घटकाची मूलभूत माहिती आपणाला समजते.

या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बाजारामध्ये अनेक संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत, यातील उमा कपिला लिखित Indian Economy : Economic Development and Policy, दत्त आणि सुंदरम लिखित Indian Economy   हे संदर्भग्रंथ या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

या घटकाशी संबंधित चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी योजना मासिक आणि दी हिंदू व दी इंडियन एक्स्प्रेस ही इंग्रजी वृत्तमानपत्रे वाचावीत. यापुढील लेखामध्ये आपण आर्थिक विकास या घटकाअंतर्गत येणारे कृषी आणि कृषीसंलग्न क्षेत्रे, औद्योगिक क्षेत्र, पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, भारतीय वित्तीय प्रणाली, भारताचा परकीय व्यापार इत्यादीवर गतवर्षीय पूर्वपरीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि या मुद्दय़ाची परीक्षाभिमुख तयारी कशी करावी, याची एकत्रित चर्चा करणार आहोत.