श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील ‘सुरक्षा’ या घटकाविषयीची परीक्षाभिमुख सर्वंकष तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत.

Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
Upsc Preparation Legislature Judiciary in Indian Polity Paper of Civil Services Pre Exam
upsc ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था; कायदेमंडळ, न्यायमंडळ, पंचायती राज

या घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न

*सायबर डोम योजना काय आहे? भारतातील इंटरनेट गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी ते कशा प्रकारे उपयोगी ठरू शकते, हे स्पष्ट करा? (२०१९)

*डाव्या उग्रवादामध्ये (Left Wing Extremism) उतरता कल (downward  trend) दिसून येत आहे, पण अद्यापही देशाच्या अनेक भागात याचा प्रभाव आहे. डाव्या उग्रवादामुळे (छहए) निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारत सरकारने अंगीकारलेल्या दृष्टिकोनाचे थोडक्यात स्पष्टीकरण करा. (२०१८)

*जमावाची हिंसा ही एक गंभीर कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या म्हणून भारतात उदयास येत आहे. योग्य उदाहरण देऊन यासारख्या हिंसेची कारणे आणि परिणामाचे विश्लेषण करा. (२०१७)

*दुर्गम भूभाग आणि काही देशांसोबत असणाऱ्या शत्रुत्व संबंधामुळे सीमा व्यवस्थापन हे एक कठीण कार्य बनलेले आहे. प्रभावी सीमा व्यवस्थापन आणि रणनीतीवर प्रकाश टाका. (२०१६)

* डिजिटल मीडियासारख्या माध्यमातून धार्मिक उपदेशाच्या परिणामस्वरूप भारतीय युवक आय.एस.आय.एस. -इसिस (ISIS) मध्ये सहभागी होत आहेत. इसिस (ISIS) हे काय आहे आणि या संघटनेचे उद्दिष्ट काय आहे? इसिस (करकर) हे आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला कशा प्रकारे धोका पोहोचवू शकते? (२०१५)

* “भारताचे  बहुधार्मिक आणि बहुवांशिक विविधतापूर्ण समाजस्वरूप हे शेजारील देशामध्ये पाहावयास मिळणाऱ्या मूलतत्त्ववादी प्रभावापासून मुक्त नाही.” यासारख्या वातावरणाचा प्रतिकार करण्यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या रणनीतीसह चर्चा करा. (२०१४).

* अवैध पसा हस्तांतरण देशाच्या आर्थिक सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी एक धोका आहे. भारतासाठी याचे काय महत्त्व आहे आणि या धोक्यापासून वाचण्यासाठी कोणती पावले उचलणे आवश्यक आहे? (२०१३)

उपरोक्त प्रश्नांवरून असे दिसून येते की, सुरक्षा या घटकाची तयारी करताना देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसमोर नेमकी कोणती आव्हाने आहेत? यापासून देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला नेमका कोणता धोका आहे? आणि या आव्हानांना यशस्वीरीत्या परतवून लावण्यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? या सोबतच या घटकाला मूलभूत ज्ञानासह चालू घडामोडींच्या आकलनाची जोड देणे गरजेचे आहे.

*  सुरक्षा आणि सुरक्षा व्यवस्थापन – परीक्षाभिमुख आकलन

* सुरक्षा या विषयाची व्याप्ती मोठी आहे, भारताला बाह्य व अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. बाह्य सुरक्षा म्हणजे परकीय राष्ट्राकडून केल्या जाणाऱ्या आक्रमणापासून सुरक्षा करणे होय. अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या सीमेअंतर्गत असणारी सुरक्षा ज्यामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था व देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. भारतात अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्रालयावर आहे तर बाह्य सुरक्षेची जबाबदारी संरक्षण मंत्रालयावर आहे.

* दीर्घकाळापासून जम्मू आणि काश्मीर हे राज्य दहशतवाद आणि दहशतवादी कारवायाने ग्रासलेले आहे तसेच ईशान्येकडील राज्ये घुसखोरी व वांशिक चळवळी, संघटित गुन्हेगारी, सीमेपलीकडून अवैधरीत्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी इत्यादी समस्यांनी प्रभावित आहेत. सद्यस्थितीमध्ये देशाच्या अनेक राज्यांमध्ये दहशतवाद आणि दहशतवादी कारवाया घडत आहेत. धार्मिक दंगे, भाषिक वाद, राज्यांतर्गत असणारे वाद, नवीन तंत्रज्ञान अर्थात मोबईल, इंटरनेट, सोशल नेट्वìकग साइट्स यामुळे एखाद्या विशिष्ट द्वेषपूर्ण विचारसरणीचा प्रसार करणे यासारख्या घटना घडत आहेत. अशा बहुविध आव्हानात्मक समस्या देशाच्या विविधतेतील एकता आणि अखंडतेला बाधा पोहचवत आहेत, ज्यामुळे सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षेला प्रचंड मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.

* सर्वप्रथम आपण सुरक्षा या घटकामधील मुद्यांचा थोडक्यात आढावा घेऊ. सुरक्षा या घटकामध्ये भारताच्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षासंबंधी मुद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये डाव्या विचारसरणीचा दहशतवाद अर्थात नक्षलवाद, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, दहशतवाद, वाढता प्रादेशिकवाद, पूर्वेकडील राज्यांमध्ये होणारी घुसखोरी व वांशिक चळवळी, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, आंतरराष्ट्रीय सीमासंबंधी असणारे वादविवाद, संघटित गुनेह्गारी, अवैध पसा हस्तांतरण, सीमेवर अवैधरीत्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी आणि याचे असणारे संघटित स्वरूप, सततचे होणारे भाषिक वाद, राज्यांतर्गत असणारे वाद, धार्मिक दंगे, सायबर सुरक्षा संबंधित मूलभूत माहिती, माध्यमे आणि सोशल नेट्वìकग साईटस यांचा होणारा वापर ज्याद्वारे देशातील सामाजिक सलोख्याला निर्माण होणारा धोका, सुरक्षतेला निर्माण होणारे आव्हान इत्यादी बाबी या बाबी आहेतच. त्याच्या याच्या जोडीला या आव्हानांना सामोरे जाताना भारत सरकारने आखलेली रणनीती ज्यामध्ये सीमा सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक सक्षमरीत्या राबविणे, सीमेलगतच्या भागाचा विकास घडवून आणणे, याचबरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्वाच्या बाबींचा समावेश आहे. तसेच देशाची बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सरकारमार्फत स्थापन करण्यात आलेल्या विविध सरकारी संस्था आणि संघटना व त्यांना नेमून दिलेले कार्य याचबरोबर सरकारमार्फत वेळोवेळी केल्या जाणारया उपाययोजना व कायदे याची माहिती असणे आवश्यक आहे.

या घटकाची तयारी करण्यासाठी कोणते संदर्भ वापरावेत याचा आढावा आपण घेऊ. या घटकावर नोट्स स्वरूपातील अनेक गाईड्स उपलब्ध आहेत ज्याद्वारे या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासता येते. तसेच या सोबत दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे दहशतवाद आणि नक्षलवाद यावरील अहवाल पाहावेत. या घटकाशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी ‘द हिंदू’ आणि  ‘इंडियन एक्सप्रेस’ ही इंग्रजी दैनिके, योजना आणि वर्ल्ड फोकस ही मासिके आणि परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, IDSA यांच्या संकेतस्थळांचा वापर करावा.