web-knowledgeवेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कर्तृत्व सिद्ध केलेल्या व्यक्तींच्या भाषणांचे व्हिडीओ इंटरनेट जगात विविध संकेतस्थळांच्या रूपात उपलब्ध आहेत आणि तेही विनामूल्य! त्याविषयी जाणून घेऊयात-
cv-05ted.com
इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अशा खजिन्यांपकी एक म्हणजे ted.com हे संकेतस्थळ. १९८४ साली टेड (TED) ही स्वयंसेवी संस्था स्थापन करण्यात आली, तीच मुळी तंत्रज्ञानाचा वापर करून माहितीचा आणि ज्ञानाचा तसेच आगळ्यावेगळ्या कल्पनांचा जगभरात प्रसार करण्याचे काम करण्यासाठी! याकरता विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना बोलावून संस्थेतर्फे त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाऊ लागले आणि त्या भाषणांच्या व्हिडीओ क्लिप्स ते संकेतस्थळावर टाकू लागले. आज या संकेतस्थळावर वेगवेगळ्या विषयांवरील तज्ज्ञांचे सुमारे दोन हजार व्हिडीओ पाहता येतात. या भाषणांसाठी कोणताही विषय वज्र्य नाही. तंत्रज्ञान-विज्ञान, व्यावसायिक, व्यक्तिमत्त्व विकास, मनोरंजन, क्रीडा, नावीन्यपूर्ण कल्पना, लेखक, चित्रकार, अध्यात्म अशा सगळ्या विषयांवरची भाषणं इथे पाहायला आणि ऐकायला मिळतात. एखाद्या विषयावरचे व्याख्यान किंवा एखाद्या तज्ज्ञाचे व्याख्यान तुम्हाला ऐकायचे असेल तर त्यानुसार तुम्हाला ‘सर्च’ देता येतो.
विशेष म्हणजे हे व्हिडीओ तुम्हाला डाउनलोड करून संग्रही ठेवता येतात. तसेच तुम्ही संकेतस्थळावर ‘लॉग इन’ करून सबस्क्राइब केल्यास नव्या भाषणांचे, कार्यक्रमांचे अपडेट्स तुम्हाला ई-मेलने येत राहतात. या संकेतस्थळांचे ‘अ‍ॅप’ अ‍ॅन्ड्रॉइड आणि िवडोज प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध आहेत.

cv-06Youtube
Youtube – यूटय़ूब हे व्हिडीओचं संकेतस्थळ आपल्या अतिपरिचयाचं आहे. त्यावर आपण गाणी ऐकतो, व्हिडीओ पाहतो. खरेतर या संकेतस्थळाचा वापर आपण फारच मर्यादित स्वरूपात करतो. अनेकांना त्यावर असलेल्या विविध चॅनेल्सची माहितीच नसते. या चॅनेल्सवर उपयुक्त माहिती देणारे व्हिडीओ, माहितीपट उपलब्ध आहेत. त्यातली काही चॅनेल्स अशी – Minutephysics, ASAPscience, Crashcourse, Ted Education, Smarteveryday. या चॅनेल्सवर अत्यंत रंजक पद्धतीने विज्ञान, तंत्रज्ञान, अभ्यासक्रम, शैक्षणिक माहिती सांगण्यात आली आहे.

http://www.sciencedump.com
टेडसारखंच आणखी एक अफलातून संकेतस्थळ म्हणजे http://www.sciencedump.com   होय. या संकेतस्थळाच्या नावात जरी सायन्स म्हणजे विज्ञान असा शब्द असला तरीही यावरचे व्हिडीओज, डॉक्युमेंटरीज, इन्फोग्राफिक्स हे कोणत्याही क्षेत्रातल्या व्यावसायिकांसाठी किंवा कोणत्याही विद्याशाखेतल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत. त्यांना बौद्धिक खाद्य पुरवणारे आहेत. यामध्ये कला, जीवशास्त्र, कॉम्प्युटर- इंटरनेट, आरोग्य, डिझाइन, पर्यावरण, इतिहास, गणित, मन, तत्त्वज्ञान, निसर्ग, भौतिकशास्त्र असं वर्गीकरण केलं आहे. यात व्हिडीओची अत्यंत रंजक पद्धतीने  विषयानुसार अथवा संकल्पनेनुसार मांडणी केलेली असते. हे सारे व्हिडीओ आपल्याला  विचारप्रवृत्त करतात. उदा. आपल्या अश्रूंची रचना कशी असते? याबाबतच्या ‘इन्फोग्राफिक्स’मध्ये अश्रूंचे प्रकार, त्यांचा निर्माण होण्याचा हेतू आदी गोष्टी प्रतिमांच्या मदतीने थोडक्यात स्पष्ट केलेल्या आहेत.
संकेतस्थळाच्या डॉक्युमेंटरी या विभागात एक तास आणि त्याहून अधिक वेळाचे माहितीपट आहेत. यात भौतिकशास्त्राची रहस्यं, विज्ञानातले महत्त्वाचे शोध, मानवाची उत्क्रांती, नेफ्रेसिसच्या मृत्यूचे गूढ, जगातला सर्वात मोठा बोगदा यांसारखे माहितीपट पाहायला मिळतात.
sakhadeopranav@gmail.com