News Flash

शब्दबोध : घुमट

घुमटाच्या आकाराचे एक चर्मवाद्य असते, त्यालाही घुमट म्हणतात.

शब्दबोध : घुमट
(संग्रहित छायाचित्र)

डॉ. अमृता इंदुरकर

घुमट म्हणजे देवळाचा, मशिदीचा गोलाकार असा मोठा कळस. घरातसुद्धा एखाद्या भांडय़ावर खोल वाटी उलटी करून ठेवली तर तेही घुमटाच्या आकाराचे दिसते. शिवाय घुमटाच्या आकाराचे एक चर्मवाद्य असते, त्यालाही घुमट म्हणतात. या वाद्याच्या घुमणाऱ्या आवाजाला, गजराला घुमटा असे म्हणतात.

घुमट हा शब्द मूळ फारसी ‘गुम्बद’ या शब्दापासून तयार झाला आहे. फारसीमध्ये डेऱ्याच्या, कलशाच्या आकाराचे छप्पर असा अर्थ आहे. या घुमटाचा आकार असा काही असतो की त्याखाली उभे राहून बोलल्यास घुमटातील पोकळीमध्ये तो आवाज घुमतो. म्हणूनच बालकवींनी म्हटले आहे,

शून्य मनाच्या घुमटांत, कसले तरी घुमते गीत अशी मनाच्या घुमटांत उदासीनतेमुळे येणारी शून्यत्वाची प्रचीती शब्दबद्ध केली; आणि न कळे असला, घुमट बनविला, कुणी कशाला? असा हा विश्वघुमट कुणी निर्मिला असेल, असा प्रश्नही उपस्थित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2018 3:59 am

Web Title: vocabulary word article
Next Stories
1 ‘प्रयोग’ शाळा : अक्षर मशागत
2 संशोधन संस्थायण : संशोधनाचे पक्के रस्ते 
3 यूपीएससीची तयारी : प्रदेशवादाची समस्या
Just Now!
X