भारत हे जगातील आघाडीचे लग्नकार्याचे ठिकाण असून त्यासंबंधीची सर्वात मोठी बाजारपेठही आहे. व्यावसायिकांसाठी ‘वेिडग प्लािनग’ हा एक करिअरचा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याविषयी..
आपल्याकडे थाटामाटात विवाह करणे ही गोष्ट तशी नवीन नाही. मात्र थाटामाटाची संकल्पना ही प्रत्येकाच्या ऐपतीनुसार बदलते. हा लग्न सोहळा संस्मरणीय व्हावा, यासाठी त्यासंबंधीच्या साऱ्या कामांचे वा योजनांचे व्यवस्थापन हे व्यावसायिक दृष्टिकोनातून केले तर तो समारंभ अधिक देखणा होऊ शकतो. यामुळे आयत्या वेळी होणारी धावपळ टळते आणि लग्न समारंभाच्या आयोजनासंबंधीचा यजमानाचा ताणतणावही दूर होऊ शकतो.
 वेगाने वाढणारे करिअर या दृष्टिकोनातून नव्या पिढीला वेिडग प्लािनग या क्षेत्राकडे पाहता येऊ शकेल. हे एक ग्लॅमरस, आनंददायी आणि आकर्षक करिअर असून नव्या दमाच्या युवा पिढीला व्यवसायाचा हा पर्याय ध्यानात घेता येईल. पुढील काही वर्षांत यासंबंधीची बाजारपेठ वेगाने वाढणार असून पर्यायाने या करिअरलाही उत्तम मागणी येणार आहे. योग्य पद्धतीने वेगवेगळ्या बाबी हाताळणे, एकत्रितपणे काम केल्यास आणि कलात्मकता आणल्यास वेिडग प्लािनग हा एक चांगला व्यवसाय ठरू शकेल. थोडक्या सेवा देऊन अधिकतर सवलती दिल्यास वेिडग प्लािनग सेवा अतिशय यशस्वी होऊ शकतात. कित्येक फ्लोरिस्ट, हेअर स्टायलिस्ट, कॅटर्स इत्यादीमधून तुम्ही अनेक गोष्टी निवडू शकता. तरीही आजमितीस कोणत्याही कंपन्या पूर्ण सेवांची रेंज उपलब्ध करीत नाहीत. लग्नाची बाजारपेठ ही सध्या वर्षांकाठी २५ टक्क्यांहून अधिक वेगाने वाढत आहे. प्रत्येक दशकात भारतीय लग्न बाजारपेठ ही जगातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ म्हणून पुढे येत आहे. अमेरिकेतील वर्षांला ५० अब्ज डॉलर्सच्या या बाजारपेठेलाही भारताने मागे टाकले आहे. म्हणूनच एखाद्याने जर वेिडग प्लानर म्हणून करिअरचा पर्याय निवडल्यास ती आता एक चांगली संधी ठरेल.
वेिडग प्लानर होण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असते- मनाचा कल, व्यावसायिक दृष्टिकोन, लग्न बाजारपेठेची संपूर्ण आणि चांगली माहिती, वेिडग प्लॅिनगमधील विशेष पदवी, आपले स्वप्न सत्यात उतरवण्याची तयारी.
कामाचे स्वरूप
मेंदीपासून ते लग्न समारंभाच्या अखेरीस मुलीची सासरी पाठवणी करेपर्यंत वेिडग प्लानर एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. पूर्वी लग्न समारंभातील समन्वयक यांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असे. त्यात स्थळ, कॅटर्स, फ्लोरिस्ट, वादक इत्यादींचा समावेश असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून स्टाइल, समन्वय, पाहुणचार, कस्टमाइज्ड आणि थीम बेस्ड सजावट, लग्नाच्या दिवशीची मदत इत्यादी सेवांचीही गरज भासते. वेिडग प्लानरच्या उपस्थितीमुळे या सर्वाना एक व्यावसायिक स्पर्श लाभतो. उदा. फुलांची सजावट, रिटेल विक्री (अ‍ॅक्सेसरीज, नावीन्य इत्यादी), फोटोग्राफी आणि कॅटिरग. लग्नाच्या नवीन ट्रेण्ड्समध्ये तसेच डेस्टिनेशन वेिडग्जमध्ये वेिडग प्लानरबरोबरच टुरिझम आणि ट्रॅव्हलचाही समावेश केला जातो.  
वेिडग प्लानरची कौशल्ये, निर्णयक्षमता, मेहनत घेण्याची तयारी, उत्तम संवादकौशल्य, अत्याधुनिक ट्रेण्ड्सची माहिती, चांगला जनसंपर्क आणि चर्चा कौशल्य, रूढी आणि परंपरांचे चांगले ज्ञान, कलात्मक दृष्टिकोन, योजनाबद्ध पद्धतीने काम करणे.
प्रशिक्षण सुविधा
सर्टफिाईड वेिडग प्लािनग कोर्स हा चांगला वेिडग प्लानर बनण्याचा उत्तम मार्ग आहे. विशेषकरून पदवीपूर्व आणि पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना हा अल्पकालीन अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. अनेक खासगी संस्थांतर्फे चालविल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना याविषयीची कौशल्ये शिकवली जातात. आणि त्यांना वेिडग प्लॅिनग हे करिअर निवडता येऊ शकते. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना लग्नसंबंधीच्या बाजारपेठेविषयी माहिती मिळते. वेडिंग प्लानरचे उत्पन्न हे त्याचे कौशल्य आणि सेवांनुसार तसेच स्थानिक बाजारपेठेनुसार बदलते. तरीही सर्वसाधारणपणे लग्न समारंभाच्या एकूण आर्थिक तरतुदीच्या किमान १० ते १५ टक्के रक्कम वेडिंग प्लानर त्याचे शुल्क म्हणून आकारतो.