पश्चिम रेल्वेत खास महिला खेळाडूंसाठी खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत-
जागांची संख्या व तपशील : एकूण उपलब्ध जागांची संख्या ८ असून त्या महिला खेळाडूंसाठी आरक्षित आहेत-
आवश्यक पात्रता : अर्जदार महिला पदवीधर असाव्यात व त्यांनी अ‍ॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन यांसारख्या क्रीडाप्रकारात राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी.
वयोमर्यादा : २५ वर्षे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना क्रीडा नैपुण्य चाचणी, निवड चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व फायदे : निवड झालेल्या महिला खेळाडूंना पश्चिम रेल्वेत दरमहा ५२००-२०२००+२००० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. याशिवाय त्यांना रेल्वेच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदेपण देय असतील.
अधिक माहिती व तपशील : अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ जुलै- २ ऑगस्ट २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली पश्चिम रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा पश्चिम रेल्वेच्या www.wr.indianrailways.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ६० रु.चा वेस्टर्न रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन, मुंबई यांच्या नावे असणारा पोस्टल ऑर्डर पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि पोस्टल ऑर्डरसह असणारे अर्ज सीनिअर स्पोर्ट्स ऑफिसर, वेस्टर्न रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन, हेडक्वार्टर ऑफिस, चर्चगेट, मुंबई ४०००२० या पत्त्यावर २६ ऑगस्ट २०१३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.    ल्ल