News Flash

सैन्यदलात महिला विधी पदवीधरांची निवड

सैन्यदलात थेट निवड योजनेंतर्गत महिला विधी पदवीधरांची निवड करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-

| February 10, 2014 01:07 am

सैन्यदलात थेट निवड योजनेंतर्गत महिला विधी पदवीधरांची निवड करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक पात्रता : अर्जदार महिलांनी बारावीनंतर विधी विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केली असावी. त्या बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी करण्यासाठी पात्र व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात.
वयोगट : उमेदवारांचे वय २१ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे व त्यांचा जन्म २ जुलै १९८७ ते १ जुलै १९९३ च्या दरम्यान झालेला असावा.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना सैन्य निवड मंडळातर्फे निवड चाचणी, शारीरिक शिक्षण चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व फायदे : निवड झालेल्या उमेदवारांना सैन्यदलाच्या कायदा विभागात सुरुवातीला लेफ्टनंट म्हणून दरमहा १५६००-३९१०० + ५४०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल.
या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना सैन्यदलाच्या नियमांनुसार इतर भत्ते, फायदे व भविष्यकालीन बढतीच्या संधी उपलब्ध होतील.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी सैन्यदलाच्या www.joinindianarmy.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टोरेट जनरल ऑफ रिक्रूटिंग, आरटीजी- ए, जेएजी एंट्री, एजीज ब्रँच, आर्मी हेड क्वॉर्टर्स,
वेस्ट ब्लॉक-३, आर. के. पुरम, नवी दिल्ली-११००६६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१४.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2014 1:07 am

Web Title: womens law graduate recruitment in troops
Next Stories
1 न्यूक्लिअर पॉवर कॉपरेरेशन- तारापूर येथे संशोधन साहाय्यकांच्या ६ जागा
2 व्यापार-उद्योगाचा शुभारंभ
3 करिअरमंत्र
Just Now!
X