वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी! ४००हुन अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु; जाणून घ्या कसा करायचा अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा प्रसिद्ध केल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे.

वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी! ४००हुन अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु; जाणून घ्या कसा करायचा अर्ज
महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये ४००हुन अधिक पदांसाठी भरती केली जाणार आहे. (Indian express)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा प्रसिद्ध केल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. या रिक्त पदांद्वारे महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये ४२७ पदांसाठी भरती केली जाणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांवर जाहीर करण्यात आलेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे.

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइट – mpsconline.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांवर जाहीर झालेल्या या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत चालेल. यासाठी, इच्छुक आणि पात्र उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

असा करा अर्ज

  • अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट- mpsconline.gov.in वर जा.
  • वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, नवीनतम भरतीच्या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर नवीन युजरच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता एमपीएससी वैद्यकीय अधिकारी भरती २०२२ च्या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढील पृष्ठावर जा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.

या रिक्त पदांसाठी, वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज करणार्‍या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना ३९४ रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. त्याच वेळी, आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २९५ रुपये भरावे लागतील. अर्जाची फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरली जाऊ शकते. फी जमा केल्यानंतरच या पदांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण मानली जाईल.

कोण अर्ज करू शकतो?

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून एमबीबीएस पास पदवी असावी. त्याच वेळी, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे नाव महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ मधील तरतुदीनुसार नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. याशिवाय अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आणि ३८ वर्षांपेक्षा कमी असावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. मात्र, जास्त अर्ज आल्यास एमपीएससीकडून लेखी परीक्षाही घेतली जाऊ शकते.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A golden opportunity for a government job in the medical fieldin maharashtra recruitment process started for more than 400 vacancies learn how to apply pvp

Next Story
एमपीएससी मंत्र: लिपिक टंकलेखक ,पदनिहाय पेपर तयारी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी