वनवासी विद्यार्थ्यांना विदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

केंद्र सरकारच्या वनवासी विकास मंत्रालयातर्फे वनवासी-आदिवासी विद्यार्थ्यांना २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात विदेशातील विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी अथवा संशोधनपर पीएच.डी.

केंद्र सरकारच्या वनवासी विकास मंत्रालयातर्फे वनवासी-आदिवासी विद्यार्थ्यांना २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात विदेशातील विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी अथवा संशोधनपर पीएच.डी. करण्यासाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्तीसाठी  पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिष्यवृत्तींची संख्या- या योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्तींची संख्या २४ आहे.
शिष्यवृत्तींचा तपशील- या योजनेअंतर्गत समाविष्ट विषयांमध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, कृषी व कृषी विज्ञान, सामाजिक विज्ञान व समाजशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
शैक्षणिक अर्हता- उमेदवारांनी खालीलप्रमाणे पात्रता पूर्ण केलेली असावी:
* पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- संबंधित विषयांसह पदवी परीक्षा किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. अनुभवी विद्यार्थ्यांना प्राधान्य.
* पीएच.डी.- संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. एम.फिल. पात्रताधारक अथवा अनुभवी विद्यार्थ्यांना प्राधान्य.
वयोमर्यादा- अर्जदारांचे वय १ जुलै २०१४ रोजी ३५ वर्षांहून अधिक नसावे.
आर्थिक निकष- अर्जदारांच्या पालकांचे वार्षिक एकत्रित उत्पन्न सहा लाख रुपयांहून अधिक नसावे.
शिष्यवृत्तीचा कालावधी- संबंधित अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्तीचा कालावधी एक ते चार वर्षे राहील.
निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची संबंधित अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.
अर्जाचा  तपशील- अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ एप्रिल ते १ मे २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या वनवासी विकास मंत्रालयाची जाहिरात पाहावी अथवा मंत्रालयाच्या http://www.tribal.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत- विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज ‘दि डायरेक्टर, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, एज्युकेशन सेक्शन, रूम नं. ४१२, बी विंग, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्र प्रसाद मार्ग, नवी दिल्ली- ११०००१’ या पत्त्यावर ६ जून २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Abroad education scholarship for aboriginal students

ताज्या बातम्या