AIIMS Recruitment 2021: प्राध्यापकांसह ‘या’ ११२ पदांवर होणार भरती; ‘असा’ करा अर्ज

या प्रक्रियेद्वारे एकूण ११२ अध्यापक पदांची भरती केली जाईल.

AIIMS-Bhubaneswar-Recruitment-2021
नोकरीची संधी

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), भुवनेश्वर ने गट A पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक उमेदवार जाहिराती प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत एम्स भुवनेश्वर, aiimsbhubaneswar.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर या पदांवर भरतीसाठी अर्ज करू शकतात.

या प्रक्रियेद्वारे एकूण ११२ अध्यापक पदांची भरती केली जाईल. ज्यात प्राध्यापकांची ३६ पदे, अतिरिक्त प्रोसेसरची ३ पदे, असोसिएट प्रोफेसरची ८ पदे आणि सहाय्यक प्राध्यापकांची ६५ पदे समाविष्ट आहेत. या पदांवर भरतीसाठी उमेदवाराकडे वैद्यकीय पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त उमेदवारांना कामाचा अनुभव देखील असावा. सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे, त्यामुळे तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

वयोमर्यादेबद्दल बोलताना, प्राध्यापक आणि अतिरिक्त प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय ऑनलाईन अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार ५८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वरच्या वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट तपासा.

इच्छुक आणि पात्र उमेदवार विहित नमुन्यात अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, भर्ती कक्ष, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भुवनेश्वर, सिजुआ, दुमुदुमा, भुवनेश्वर -७५१०१९ येथे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

याशिवाय, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), बीबीनगरने ट्यूटरसह इतर अनेक पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार जाहिराती जारी झाल्यापासून ३० दिवसांच्या आत एम्स बीबीनगर aiimsbibinagar.edu.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे या पदांवर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aiims recruitment 2021 direct apply here sarkari nokriya last date 27 september ttg

ताज्या बातम्या