द.वा.आंबुलकर

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे देशांतर्गत १६० व्यवस्थापन अभ्यासक्रम शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या व्यवस्थापन विषयक पदविका अथवा व्यवस्थापनशास्त्र विषयातील एमबीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट म्हणजे ‘एमएटी : सप्टेंबर २०१८’ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Printing of NCERT textbooks by private publishers without permission
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा ते पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.

निवड पद्धती-

अर्जदारांना खालीलप्रमाणे प्रवेश पात्रता परीक्षेला बसावे लागेल.

*      प्रवेश पात्रता परीक्षा संगणकीय पद्धतीने १५ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.

*      अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित शिक्षण संस्थेतील व्यवस्थापन विषयक पदविका अथवा एमबीए अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून १५५० रुपये भरणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख-

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहिती व तपशील

वरील अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनची जाहिरात पाहावी अथवा ‘एआयएमए’च्या http://www.aima.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.