सुरेश वांदिले

ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स ही वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी व या क्षेत्रातील संशोधन कार्यास वाव देणारी देशातील सर्वात महत्त्वाची व सर्वोत्कृष्ट संस्था होय. अभियांत्रिकी शिक्षण-प्रशिक्षण-संशोधन कार्याच्या क्षेत्रात जसे आयआयटीने स्थान पटकावले आहे, तसेच स्थान भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या संस्थेने प्राप्त केले आहे. या संस्थेत एमबीएबीएस, बीएस्सी नर्सिंग, बीएस्सी- पॅरामेडिकल अशासारखे अभ्यासक्रम चालविले जातात. या संस्थेचे नवी दिल्लीसह भोपाळ, भुवनेश्वर, रायपूर, जोधपूर, पाटणा आणि हृषीकेश या ठिकाणी कॅम्पसेस आहेत. (महाराष्ट्रात या संस्थेचे कॅम्पस नागपूर येथे नजीकच्या काळात सुरू केले जाणार आहे.) देशातील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम या ठिकाणी शिकवला जात असल्याने या संस्थेच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा असते.

*   प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

संस्थेच्या बीएस्सी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. बी.एस्सी. नर्सिंग (पोस्ट बेसिक) या अभ्यासक्रमासाठीची परीक्षा १ जून २०१९ रोजी, बी.एस्सी – पॅरामेडिकल या अभ्यासक्रमासाठीची परीक्षा १५ जून २०१९ रोजी, बी.एस्सी (ऑनर्स) नर्सिंग या अभ्यासक्रमासाठीची परीक्षा २३ जून २०१९ रोजी, देशातील विविध केंद्रांवर घेतली जाईल.

यंदापासून या संस्थेने या परीक्षेच्या नोंदणीसाठी वेगळी प्रक्रिया अवलंबली आहे. या प्रक्रियेस प्रॉस्पेक्टिव्ह अ‍ॅप्लिकंट्स, अ‍ॅडव्हान्स्ड रजिस्ट्रेशन म्हणजेच पार या नावाने संबोधले जाते. यामुळे प्रत्यक्षात परीक्षेच्या कालावधीच्या सहा महिने आधी इच्छुक विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी नोंदणी करता येते. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून संस्थेच्या संकेतस्थळावर ती उपलब्ध आहे. नोंदणी करण्यासाठीचे टप्पेनिहाय मार्गदर्शन त्याच ठिकाणी केले जाते. विद्यार्थ्यांना दोन वेळेस नोंदणी करावी लागेल. पहिली प्राथमिक नोंदणी आणि त्यानंतर परीक्षेसाठीची नोंदणी.

*   अर्हता

बीएस्सी (ऑनर्स) नर्सिंग- खुला आणि इतर मागास वर्ग संवर्गातील उमेदवारांनी बारावी विज्ञान परीक्षेत इंग्रजी, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांत सरासरीने ५५ टक्के गुण आणि अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांनी ५० टक्के गुण मिळवलेले असावेत. या अभ्यासक्रमाला केवळ महिला उमेदवारांनाच प्रवेश दिला जातो.

बीएस्सी पॅरामेडिकल- खुला आणि इतर मागास वर्ग संवर्गातील उमेदवारांनी बारावी विज्ञान परीक्षेत इंग्रजी, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांत सरासरीने ५० टक्के गुण आणि अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांनी ४५ टक्के गुण मिळवलेले असावेत.

बीएस्सी (पोस्ट बेसिक) नर्सिंग- बारावी आणि त्यानंतर डिप्लोमा इन जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी हा अभ्यासक्रम संबंधित विद्यार्थ्यांने केलेला असावा.

*  एकूण जागा

बीएस्सी (ऑनर्स) नर्सिंग – नवी दिल्ली- ७०, भोपाळ, भुवनेश्वर, रायपूर, जोधपूर, पाटणा (प्रत्येकी ६०) आणि हृषीकेश- १००

बीएस्सी इन पॅरामेडिकल- दिल्ली कॅम्पस- बॅचलर ऑफ ऑप्टिमेट्री (एकूण जागा – १९), बीएस्सी (ऑनर्स) इन मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी (एकूण जागा – ९), बीएस्सी इन डेंटल ऑपरेटिंग रूम असिस्टंट (एकूण जागा -८), बीएस्सी इन डेंटल हायजिन (एकूण जागा – ४), बीएस्सी इन ऑपरेशन थिएटर (एकूण जागा – २०), भुवनेश्वर कॅम्पस- मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (एकूण जागा – १०), ऑपरेशन थिएटर अ‍ॅण्ड अ‍ॅनेस्थिऑलॉजी टेक्नॉलॉजी (एकूण जागा – १०), मेडिकल टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड इमॅजिंग थेरपी (एकूण जागा – १०)

*   अभ्यासक्रमांचा कालावधी

बीएस्सी (ऑनर्स ) नर्सिंग – ४ वष्रे, बीएस्सी (पोस्ट बेसिक) नर्सिंग – २ वष्रे, बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री- ४ वष्रे, बीएस्सी इन मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी- ३ वष्रे, बीएस्सी इन डेंटल ऑपरेटिंग रूम असिस्टंट- साडेतीन वष्रे, बीएस्सी इन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी – साडेतीन वष्रे

*  परीक्षा केंद्रे

बीएस्सी (ऑनर्स) इन नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा मुंबई, कोलकाता, देहरादून, चेन्नई, जोधपूर, भुवनेश्वर, भोपाळ, थिरुवनंतपूरम, दिल्ली, रायपूर, पाटणा या केंद्रांवर घेतली जाते. बीएस्सी पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा दिल्लीमध्येच घेतली जाते.

*   अशी असते परीक्षा

(१) बीएस्सी (ऑनर्स)- नर्सिंग – परीक्षेचा कालावधी दोन तास.

पेपर ऑनलाइन द्यावा लागतो. इंग्रजी किंवा िहदी भाषेत पेपर सोडवता येतो. पेपर वस्तुनिष्ठ पद्धतीचा आणि बहुपर्यायी उत्तरांचा असतो. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांवर प्रत्येकी ३० प्रश्न आणि सामान्य ज्ञानासाठी १० प्रश्न विचारले जातात. एकूण प्रश्नांची संख्या १००.

(२) बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री, बीएस्सी- (ऑनर्स) रेडिओग्राफी. पेपरचा कालावधी – दीड तास.

यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र आणि गणित या विषयांवर प्रत्येकी ३० प्रश्न विचारले जातात. अचूक उत्तरासाठी एक गुण दिला जातो. उत्तर चुकल्यास १/३ गुणांची कपात केली जाते. विद्यार्थी गणित किंवा जीवशास्त्र या विषयांपकी कोणत्याही एक विषयाचे प्रश्न सोडवू शकतात. या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रत्येक  संवर्गासाठी स्वतंत्र निवड यादी तयार केली जाते. प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील.

*  निवड  यादी प्रक्रिया

प्रत्येक संवर्गात दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्यास त्यांचा गुणवत्ता यादीतील क्रमांक पुढीलप्रमाणे निश्चित केला जातो.

बीएस्सी (ऑनर्स)- नर्सिंग- जीवशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारास वरचा क्रमांक दिला जाईल. (बीएस्सी पॅरामेडिकल अभ्यासक्रम प्रवेश – गणित विषयात सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारास वरचा क्रमांक दिला जाईल.) या पद्धतीचा अवलंब केल्यावरही समान गुण राहिल्यास, भौतिकशास्त्र विषयात अधिक गुण मिळालेल्या उमदेवारास वरचा क्रमांक दिला जाईल. तरीही समान गुण राहिल्यास, रसायनशास्त्र विषयात अधिक गुण मिळालेल्या उमेदवारास वरचा क्रमांक दिला जाईल. त्यानंतरही समान गुण राहिल्यास, दोन उमेदवारांपकी वयाने मोठय़ा असलेल्या उमेदवारास वरचा क्रमांक दिला जाईल.

बीएस्सी (पोस्ट बेसिक)- नर्सिंग- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची परीक्षा दिल्लीमध्येच घेतली जाईल. यामध्ये केवळ इंग्रजी विषयाचाच पेपर असेल.

गुणवत्ता यादीमध्ये एकूण जागांच्या तीनपट उमेदवारांचा समावेश केला जातो. अंतिम निवड यादी तयार करण्याआधी मुलाखत किंवा उमेदवारांचे मूल्यांकन केले जाईल. यासाठी उमेदवारांची बारावीपर्यंतची शैक्षणिक कामगिरी, नर्सिंग परीक्षेतील कामगिरी आणि प्रत्यक्ष नर्स म्हणून केलेली कामगिरी या बाबींचा समावेश आहे. या टप्प्याला ३० गुण दिले जातील. निवड झालेल्या प्रत्येक अभ्यासक्रमाच्या उमेदवारास दरमहा ५०० रुपये विद्यावेतन दिले जाते.

Story img Loader