scorecardresearch

Bank Recruitment 2022: बँकेत ६९६ जागांसाठी भरती, अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

लक्षात घ्या या पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.

Job Alert News
प्रातिनिधिक फोटो

Bank of India Recruitment 2022: बँक ऑफ इंडियाने नियमित आणि कराराच्या आधारावर ६९६ रिक्त पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. उमेदवार १० मे २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. नियमितपणे ५९४ रिक्त पदांवर आणि कंत्राटी पद्धतीने १०२ रिक्त पदांवर भरती केली जाईल. रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता

अर्थशास्त्रज्ञ (नियमित आधार) या पदासाठी अर्जदाराने संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. तर, व्यवस्थापक आयटी (कंत्राटी आधार) या पदासाठी, अर्जदाराने संगणक विज्ञान विषयात बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

(हे ही वाचा: CUET 2022 परीक्षेसंबंधित तुम्हाला ‘ही’ सर्व माहिती असणे आहे आवश्यक)

वायोमार्यदा

अर्जदारांचे वय १ डिसेंबर २०२१ पासून मोजले जाईल. ओबीसी (OBC) उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत ३ वर्षे आणि एसी (SC) आणि एटी (ST) उमेदवारांसाठी ५ वर्षांची सूट आहे. विविध पदांसाठी करार आणि नियमितपणे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

(हे ही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील)

अर्ज फी किती?

सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील अर्जदारांसाठी ८०० रुपये आणि एससी आणि एसटी प्रवर्गासाठी १७५ रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल?

अर्जदारांची निवड लेखी चाचणी, गटचर्चा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.

(हे ही वाचा: SBI Jobs 2022: विविध पदांसाठी भरती! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू करण्याची तारीख – २६ एप्रिल २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० मे २०२२

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bank recruitment 2022 for 696 posts today apply at bankofindia co in ttg

ताज्या बातम्या