BARC Recruitment : Golden Opportunity for Govt Job in Bhabha Atomic Research Centre; Salary more than 55 thousand per month | Loksatta

BARC Recruitment : भाभा अणु संशोधन केंद्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिन्याला मिळणार ५५ हजारांहून अधिक पगार

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी भाभा भाभा अणुसंशोधन केंद्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

BARC Recruitment : भाभा अणु संशोधन केंद्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिन्याला मिळणार ५५ हजारांहून अधिक पगार
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी भाभा अणु संशोधन केंद्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी (File Photo/Wikimedia)

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी भाभा भाभा अणुसंशोधन केंद्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. BARC ने तांत्रिक अधिकारी आणि इतर रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार भाभा अणुसंशोधन केंद्राच्या अधिकृत वेबसाइट barc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत ५० रिक्त जागांवर नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये वैद्यकीय आणि वैज्ञानिक अधिकारीच्या १५ आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या ३५ पदांवर भरती केली जाणार आहे. अधिक माहितीकरिता उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेची मदत घ्यावी. उमेदवारांनी अधिसूचनेत दिलेल्या पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, अर्ज फी ५०० रुपये असून उमेदवाराने हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

किती असेल पगार?

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार,

वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-ई (न्यूक्लियर मेडिसिन)- ७८,८०० रुपये प्रति महिना
वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी (न्यूक्लियर मेडिसिन)- ६७,७०० रुपये प्रति महिना
वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी (जनरल मेडिसिन)- ६७,७०० रुपये प्रति महिना
वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी (ईएनटी सर्जन)- ६७,७०० रुपये प्रति महिना
वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी (रेडिओलॉजी)- ६७,७०० रुपये प्रति महिना
वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी (रुग्णालय प्रशासक)- ६७,७०० रुपये प्रति महिना
वैद्यकीय/ वैज्ञानिक अधिकारी-डी (बालरोगतज्ञ)- ६७,७०० रुपये प्रति महिना
वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-सी (पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक)- ५६,१०० रुपये प्रति महिना
वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-सी (सामान्य कर्तव्य/अपघाती वैद्यकीय अधिकारी)- ५६,१०० रुपये प्रति महिना
तांत्रिक अधिकारी-सी- ५६,१०० रुपये प्रति महिना

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
करिअर मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा : पारिस्थितिकी आणि जैवविविधता घटक

संबंधित बातम्या

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022: नाशिक महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ४० हजार रुपये

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: गुंतवणुकीच्या आमिषाने मित्राची दहा लाखांची फसवणूक
विश्लेषण: केवळ नेयमारवर अवलंबून राहणे ब्राझीलला महागात पडले? पराभवामागे काय होती कारणे?
“मी जर मुख्यमंत्री असतो ना…”, अब्दुल सत्तारांचा समाचार घेताना उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारला सुनावलं!
IND vs BAN 3rd ODI: पठ्ठ्याने मैदान मारलं! इशान किशन थाटात द्विशतकीय क्लबमध्ये दाखल
‘वेड’नंतर आता जिनिलीया देशमुखची मराठी मालिकेत एंट्री; प्रोमो व्हायरल