scorecardresearch

BSNL Recruitment: ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसरच्या ११ हजारहून अधिक पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या कुठे करायचा अर्ज

BSNL JTO Recruitment 2023: बीएसएनएलच्या ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर पदासाठी कुठे अर्ज करायचा जाणून घ्या

BSNL Recruitment: ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसरच्या ११ हजारहून अधिक पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या कुठे करायचा अर्ज
बीएसएनएलमध्ये ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर पदासाठी होणार भरती (प्रातिनिधिक फोटो)

‘भारत संचार निगम लिमिटेड’ (बीएसएनएल) कडुन २०२३ मधील भरतीबाबत माहिती देण्यात आली आहे. बीएसएनएलमध्ये ज्युनिअर टेलिकॉम ऑपरेटर पदाच्या ११,७०५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी बीएसएनएलच्या bsnl.co.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी, २०२३ आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया काय आहे जाणून घ्या.

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराकडे डिप्लोमा/ डिग्री/ पोस्ट ग्रॅज्युएशन/ किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ, संस्था, बोर्डची डिग्री आवश्यक आहे.
  • याबाबतचा अधिक तपशील उमेदवार अधिकृत वेबसाईटवरून जाणून घेऊ शकता.

वयोमर्यादा

  • उमेदवाराचे वय किमान २० वर्ष आणि कमाल ३० वर्ष यादरम्यान असावे.
  • SC/ST/OBC/PWD/PH या गटातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार यामध्ये सुट दिली जाईल.

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवार ३१ जानेवारी २०२३ पर्यंत, अधिकृत वेबसाईटवरून या पदासाठी अर्ज करू शकतात.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 15:19 IST

संबंधित बातम्या