कॅनडामध्ये पदार्थविज्ञानात पदव्युत्तर शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तींचे जग सैद्धांतिक पदार्थविज्ञानात जागतिक दर्जाच्या निवडक स्वतंत्र संशोधन संस्थांपकी एक म्हणजे कॅनडातील पेरिमीटर इन्स्टिटय़ूट फॉर थिआरॉटिकल फिजिक्स’. कॅनडातीलच वाटर्लू विद्यापीठाच्या सहकार्याने या संस्थेतर्फे सद्धांतिक पदार्थविज्ञानातील पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवला जातो. या विषयात संशोधन व उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी दोन्ही संस्थांच्या वतीने एकत्रितपणे शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६ वर्षांकरता दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी पदार्थविज्ञान किंवा […]

शिष्यवृत्तींचे जग
सैद्धांतिक पदार्थविज्ञानात जागतिक दर्जाच्या निवडक स्वतंत्र संशोधन संस्थांपकी एक म्हणजे कॅनडातील पेरिमीटर इन्स्टिटय़ूट फॉर थिआरॉटिकल फिजिक्स’. कॅनडातीलच वाटर्लू विद्यापीठाच्या सहकार्याने या संस्थेतर्फे सद्धांतिक पदार्थविज्ञानातील पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवला जातो. या विषयात संशोधन व उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी दोन्ही संस्थांच्या वतीने एकत्रितपणे शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६ वर्षांकरता दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी पदार्थविज्ञान किंवा गणित विषयातील आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून १ फेब्रुवारी २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीविषयी..
‘पेरिमीटर इन्स्टिटय़ूट फॉर थिओरोटिकल फिजिक्स’ ही कॅनडातील वाटर्लू शहरातील एक संशोधन संस्था आहे. पदार्थविज्ञानामध्ये गुणात्मक संशोधन करणाऱ्या जगातल्या ज्या काही मोजक्या स्वतंत्र संशोधन संस्था आहेत, त्यापकी ही एक. स्वत: अध्र्यावर महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिलेल्या, ब्लॅकबेरीचे संस्थापक उद्योजक माईक लझारीदीस यांनी १९९९ साली या संस्थेची स्थापना केली. सद्धांतिक पदार्थविज्ञानात मुळातच जागतिक दर्जाचे संशोधन फार कमी होते. हे लक्षात घेत पेरिमीटर इन्स्टिटय़ूटने केवळ सद्धांतिक पदार्थविज्ञानात संशोधन करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. कॅनडातील वाटर्लू विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने पेरिमीटर संशोधन संस्थेने एकत्रितपणे अनेक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या दोन्ही संस्थांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांपासून डॉक्टरेट करू इच्छिणाऱ्यांपर्यंत विविध वयोगटासाठी अनेक अभ्यासक्रम चालवले जातात. त्यांपकीच एक म्हणजे सद्धांतिक पदार्थविज्ञानातील पदव्युत्तर अभ्यासक्रम. या पदव्युत्तर संशोधन अभ्यासक्रमासाठी (मास्टर्स बाय रिसर्च) पेरिमीटर संशोधन संस्था आणि वाटर्लू विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेअंतर्गत या वर्षी दिल्या जाणाऱ्या एकूण प्रवेश व संशोधन शिष्यवृत्तींची संख्या ३० आहे. शिष्यवृत्तीधारकाच्या या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षांचा असेल. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून पदवीच्या कालावधीकरता पूर्ण शिष्यवृत्ती बहाल केली जाईल. ज्यामध्ये त्याचे विद्यापीठीय शैक्षणिक शुल्क, भोजन व निवास, आरोग्य विमा, लॅपटॉपसहित सर्व शैक्षणिक साहित्य आणि प्रवास भत्ता इत्यादींचा समावेश असेल. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर कुणाला हस्तांतरित करण्यात येणार नाही. अर्जदाराने त्याच्या आवडीच्या संशोधनाच्या विषयाची उपलब्धता विद्यापीठाच्या किंवा पेरिमीटर संशोधन संस्थेच्या वेबसाइटवर तपासावी.
आवश्यक अर्हता
ही शिष्यवृत्ती आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार पदार्थविज्ञान किंवा गणित या विषयांतील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा किंवा पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षांला शिकत असावा. मात्र, पदवीसोबतच त्याच्याकडे संशोधन विषयीचा उत्तम अनुभव असावा. अर्जदाराला त्याच्या संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे लागेल. पदवी-पदव्युत्तर स्तरावर अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी तसेच त्याचा पदार्थविज्ञानातील विविध संकल्पनांचा सखोल अभ्यास असावा. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदाराने टोफेल या इंग्रजीच्या परीक्षेत किमान ९० गुण मिळवणे गरजेचे आहे, ज्यामध्ये लेखन व मुलाखत या विभागांमध्ये किमान २५ गुण प्राप्त असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये नमूद केलेल्या वेबसाइटवर जमा करावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल फक्त एका पानात माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., आतापर्यंत त्याने केलेल्या संशोधनाचा ुसंशोधन प्रस्ताव (Research Proposal), प्रकाशित केलेल्या शोधनिबंधाची यादी, त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या तीन प्राध्यापकांची किंवा तज्ज्ञांची लेटरहेडवर नमूद केलेली शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती आणि टोफेलच्या गुणांची प्रत इत्यादी गोष्टी जोडाव्यात. अर्जदाराने जर टोफेल परीक्षा दिली नसेल तर तो आयईएलटीएस किंवा सीएईएल (Canadian Academic English Language Assessment) या परीक्षांचे गुण संस्थेला कळवू शकतो. या शिष्यवृत्तीसाठी जीआरई परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक नाही, मात्र अर्जदाराने जर जीआरई परीक्षा दिली असेल तर जीआरईचे गुण अधिकृत संस्थेमार्फत गुण विद्यापीठास कळवावे. अर्जदार पदव्युत्तर अभ्यासक्रमाबद्दल किंवा संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी त्याचा अर्ज जमा करण्यापूर्वी विद्यापीठातील संबंधित विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शकाला ईमेलद्वारे संपर्क करू शकतो.
निवडप्रक्रिया
अर्जदाराची सद्धांतिक पदार्थविज्ञानातील गुणवत्ता, त्यातील त्याची आवड व एकूण स्पर्धात्मकता लक्षात घेऊन शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. संस्था विविध पाश्र्वभूमी असलेल्या व वेगवेगळ्या देशांमधील अर्जदारांची निवड या शिष्यवृत्तीसाठी करू इच्छिते. शिष्यवृत्तीधारकाला या अभ्यासक्रमास प्रवेश मिळाल्यावर त्याला इतर कुठेही अर्धवेळ किंवा पूर्णवेळ नोकरी स्वीकारता येणार नाही. निवड झालेल्या अर्जदारांची यादी विद्यापीठाच्या व संस्थेच्या वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल.
अंतिम मुदत
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १ फेब्रुवारी २०१६ आहे.
महत्त्वाचा दुवा
http://www.perimeterinstitute.ca

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Canada physicist pg scholarship