करिअरमंत्र

संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा या एकमेकांपासून वेगळ्या असतात.

प्रश्न – माझे बी.एस्सी. झाले आहे. मला एम.पी.एस्सी.मधून कोणत्या परीक्षा देता येतील? – प्रियंका रणखांब
उत्तर – तुला तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकार, विक्रीकर अधिकारी, उपजिल्हाधिकारी यासारख्या राजपत्रित पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा देता येईल. त्याशिवाय विक्रीकर निरीक्षक, साहाय्यक, पोलीस निरीक्षक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षाही देता येतील.

प्रश्न- मी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले असून यूपीएससीसाठी प्रयत्न करणार आहे. नागरी सेवा सोडून इतर परीक्षा दिल्यास अटेम्प्ट धरला जातो का? नागरी सेवेसाठी खुल्या प्रवर्गासाठी वयाची अट किती व किती अटेम्प्ट असतात? – राहुल धनवडे
उत्तर- संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा या एकमेकांपासून वेगळ्या असतात. त्यामुळे एका परीक्षेचा अटेम्पट दुसऱ्यासाठी लागू होत नाही. खुल्या संवर्गातील उमेदवारांना वयाच्या ३२ व्या वर्षांपर्यंत ६ वेळा परीक्षा देता येते.

प्रश्न – मला एनआयएसएम, सीसीआरए अभ्यासक्रमाबद्दल माहिती हवी आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर कोणत्या संधी मिळतील?
– प्रियंका देशपांडे
उत्तर – द सर्टिफाइड क्रेडिट रिसर्च अनॅलिस्ट (सीसीआरए) हा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम आहे. वित्तीय जगाताशी संबंधित बँक लोन, स्टॉक मार्केटशी निगडित कौशल्यनिर्मितीसाठी या अभ्यासक्रमात भर दिला जातो. वित्तीय विश्लेषण, कर्ज बांधणी, कर्जाचे हप्ते, कर्ज देण्याची कार्यपद्धती, श्रेणीकरण उधार-उसनवारी अशा सारखे विषय शिकवले जातात. बँक, कोषागरे, वित्तीय संस्था आदी ठिकाणी करिअरच्या संधी मिळू शकतात. असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल वेल्थ मॅनेजमेंट ऑफ इंडिया आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स या दोन संस्था हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान करते. आपणास व्यामिश्र स्वरूपाची आकडेमोड आणि विश्लेषणात रस आणि गती असल्यास करिअरच्या विविधांगी संधी मिळू शकतात. संपर्क- रेगस, लेव्हल नाइन, प्लॅटिना, ब्लॉक जी, प्लॉट सी-५९, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा-पूर्व, मुंबई-४०००५१, संकेतस्थळ- http://nism.ac.in/

प्रश्न – मी सध्या माझा बीबीआयचा अंतिम वर्षांच्या निकालाची वाट बघत आहे. निकालानंतर बँकिंग आणि फायनान्समध्ये एम.कॉम. करावे की पीजीडीएम करावे याबाबत गोंधळ उडाला आहे. कृपया मार्गदर्शन करावे.? – काजल पालवनकर
उत्तर – आपणास नेमके काय करायचे आहे, हे एकदा स्पष्ट व्हायला हवे. पीजीडीएम केल्यास व्यवस्थापनच्या क्षेत्रात आपणास करिअरच्या संधी मिळत जातील. एम.कॉम. केल्यावर अध्यापन, अकाउंटंट अशांसारख्या बाबींमध्ये संधी मिळू शकतात.

प्रश्न- मी बॅचलर ऑफ मास मीडिया /जर्नालिझम केले आहे. पुढे मी काय करू. माझा गोंधळ उडाला आहे. मला अ‍ॅन्किरग करायचे आहे. त्यासाठी मी काय करू.  – ज्योती शिंदे
उत्तर – आपणास पत्रकारिता अथवा इलेक्टॉनिक माध्यमांमध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात. त्यासाठीच्या जाहिरातींकडे लक्ष ठेवावे. अध्यापनाच्या क्षेत्रात जायचे असल्यास मास मीडियामधील पदव्युत्तर पदवी आणि पुढे पीएच.डी. अथवा नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण करावी. जाहिरात/मार्केटिंगचे स्पेशलाइज्ड पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम करून त्या क्षेत्रातही करियरच्या संधी मिळू शकतात. माहिती खात्यामध्ये बॅचलर ऑफ मास मीडिया ही अर्हता नोकरीसाठी ग्राह्य धरली जाते. आकाशवाणी/दूरदूर्शनच्या वृत्त विभागातही नोकरी मिळू शकते. अँकिरग करण्यासाठी भाषेवर प्रभुत्व, स्पष्ट शब्दोच्चार हवे. हजरजबाबीपणा हवा, प्रसंगावधान, भरपूर वाचन हवे. आवाजावर मेहनत करायला हवी. सतत सरावाने यात कौशल्य प्राप्त करता येते. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सच्या सहकार्याने व्हिसलिंगवूड या संस्थेने सर्टिफिकेट कोर्स इन अँकिरग हा तीन महिने कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. संकेतस्थळ- http://www.whistlingwoods.net/tiss-sve-3-months-programme

प्रशन– मी विज्ञानशाखेचा विद्यार्थी असून १२ वीत शिकत आहे. मी भौतिकशास्त्र, रसानशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र हे माझे मुख्य विषय आहेत. १२ वी नंतर मला एरोस्पेसमध्ये संशोधन करायचे आहे. या क्षेत्रात मला कसे जाता येईल. त्यासाठी काही प्रवेश परीक्षा आहे का. त्याची माहिती द्यावी? – रुशिका रमाने
उत्तर – १२ वीनंतर आयआयटी आणि काही खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये एरोस्पेस इंजिनीअिरगमध्ये पदवी अभ्यासक्रम करता येतात. आयआयटीतील प्रवेशासाठी त्यासाठी JEE-MAIN  आणि त्या नंतर JEE- ADVANCED परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. बीईनंतर भारतात पदव्युत्तर पदवी अथवा परदेशात एम.एस. अभ्यासक्रम करता येईल. त्याच वेळेला संशोधनाचाही विचार करता येईल. सध्या तू बारावीवर लक्ष केंद्रित करावेस. भौतिकशास्त्र आणि गणितावर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. या दोन्ही विषयांच्या संकल्पना स्वयंस्पष्ट होणे आवश्यक आहे.

प्रश्न – मला कंपनी सेक्रेटरीचा अभ्यासक्रम हिंदीमधून करण्याचा आहे, तसा पर्याय आहे काय?– प्रमोद सावंत
उत्तर – फांउडेशन प्रोग्रॅममधील बिझिनेस कम्युनिकेशन या विषयाच्या व्यतिरिक्त कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमातील इतर विषयांची परीक्षा हिंदीमधून देता येते.

प्रश्न – मी सध्या १२ वी कलाशाखेचे पेपर दिले आहे. बी.ए.साठी मी मानसशास्त्र हा विषय घेणार आहे. मला इंडियन आर्मीत जायचे आहे. त्यासाठी आपण काही सुचवू शकाल काय? – पूर्वा कुलकर्णी
उत्तर – नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमीची परीक्षा देऊन आपण इंडियन आर्मीत जाऊ शकता. ही परीक्षा १२ वी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी देऊ शकतात.

प्रश्न – मला हॉटेल मॅनेजमेंट करायचे आहे. त्यासाठी कोणती प्रवेश परीक्षा व कधी द्यावी लागते. कृपया माहिती द्यवी.
उत्तर – देशातील नामवंत व दर्जेदार हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटिरग टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत राष्ट्रीय पातळीवरील चाळणी परीक्षा खडकठळ JOINT ENTRACE EXAMINATION  घेतली जाते. या परीक्षेद्वारे बी.एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो. ही परीक्षा साधारणत: दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ा घेतली जाते. संपर्क संकेतस्थळ- http://www.nchm.nic.in/
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.ूे या पत्त्यावर पाठवा.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Career advice