करिअरमंत्र

नागरी सेवेतील नोकरी करण्यासाठी नागरी सेवा परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हावे लागेल.

मी २०१६ मध्ये मेकॅनिकल विषयात बीई केले आहे. सध्या मी एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. या नोकरीत मला समाधान मिळत नाही. मला नागरी सेवेतील नोकरी करण्याची इच्छा आहे. मी काय करावे? यात काय संधी आहेत?  

मयूर पाटील

नागरी सेवेतील नोकरी करण्यासाठी नागरी सेवा परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हावे लागेल. त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होते. आयुष्याला वेगळे वळण मिळते. नागरी सेवांसारखी अमाप संधी, अधिकार आणि समाजातील मान्यता दुसऱ्या कोणत्याही नोकरीमध्ये मिळणे अवघड असते. तथापी हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे की, दरवर्षी साधारण एक हजार जागा या परीक्षेद्वारे भरल्या जातात. पण या परीक्षेला बसतात तब्बल सहा ते सात लाख विद्यार्थी. स्पर्धा अतिशय तीव्र असते. त्यामुळे या परीक्षेची तयारीसुद्धा जोरदार करावी लागते. अगदी दिवसरात्र अभ्यास करावा लागतो.

मी बारावीमध्ये शिकत आहे. मला इंडियन एअर फोर्समध्ये जायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

हृषीकेश माहुरपवार

नॅशन डिफेन्स अ‍ॅकॅडेमीसाठी घेतली जाणारी परीक्षा देऊन तू भारतीय हवाई दलात जाऊ  शकतोस. मात्र त्यासाठी तू बारावीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय घेतलेले असणे आवश्यक आहे.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Career guidance career advice

ताज्या बातम्या