अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये सर्वात जुनी, पण काही गरसमजांमुळे मधल्या काळात थोडीशी दुर्लक्षित राहिलेली शाखा म्हणजे सिव्हिल इंजिनीअरिंग. या शाखेत करिअर आणि स्वयंरोजगाराच्याही अनेक नव्या संधी आता खुल्या झाल्या आहेत.

सिव्हिल इंजिनीअिरगमधल्या विविध विषयांमध्ये मास्टर ऑफ सिव्हिल इंजिनीअिरग (एम.ई किंवा पीएच.डी) या पदव्या घेतल्या असतील तर, त्या त्या क्षेत्रातले सल्लागार म्हणून काम करायला भरपूर वाव आहे. एम.ई. किंवा पीएच.डी. करण्यासाठी आयआयटीची गेट (ॠं३ी) ही प्रवेश परीक्षा किंवा ज्या इंजिनीअिरग शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, त्यांच्या प्रवेश परीक्षा, मुलाखती उत्तीर्ण होणे गरजेचे असते.

apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!

स्ट्रक्चरल इंजिनीअर

जुन्या आणि मोडकळीला आलेल्या इमारती कोसळून होणारी जीवित आणि वित्तहानी टळावी, यासाठी ठरावीक काळानंतर प्रत्येक इमारतीचं ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून घ्यायचा कायदा राज्य सरकारने केला आहे. त्यामुळे या पुढच्या काळात स्ट्रक्चरल इंजिनीअर्सना विशेष मागणी असणार आहे.

जिओटेक्निकल इंजिनीअर

पूर्वीच्या काळी जमिनीचे परीक्षण करून ती इमारतीचे वजन पेलायला सक्षम आहे की नाही हे तपासले जायचे. ती सक्षम नसल्यास अशा जमिनीवर बांधकाम केले जात नसे. पण आता मात्र, अशा प्रकारे जमिनी सोडून देणे परवडणाऱ्यातले नाही. त्यामुळे असलेल्या जमिनीवर सुयोग्य प्रक्रिया करून त्यावर बांधकाम करणे गरजेचे आहे. म्हणूनच इमारत उभी राहण्यापूर्वी मातीचे परीक्षण करून घेणेही आवश्यक असते. त्यासाठी जिओटेक्निकल इंजिनीअरिंग हा सिव्हिल इंजिनीअिरगमधला विशेष विषय घेऊन पदव्युत्तर पदवी घेतलेल्या जिओटेक्निकल इंजिनीअर्सना विशेष संधी उपलब्ध आहेत. याशिवाय बोगदे, जमिनीखाली दोन ते तीन मजले असलेल्या इमारती अशा प्रकल्पांमध्ये जिओटेक्निकल इंजिनीअर्सना मोठी मागणी आहे. या सगळ्या प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून ते काम करू शकतात.

एन्व्हायरन्मेंटल इंजिनीअर

पर्यावरण हा विषय घेऊन एम. ई. किंवा पीएच.डी. केलेल्या सिव्हिल इंजिनीअर्सनाही तितकीच मागणी आहे. कारण सागरी पूल, विमानतळे, धरणे, बंदरे अशा देशातल्या कुठल्याही इंजिनीअिरग प्रकल्पाची उभारणी करण्याआधी त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम, वाईट परिणाम कमी होण्यासाठी किंवा त्यांची तीव्रता कमी होण्यासाठी, त्या प्रकल्पांमुळे होणाऱ्या हवा, पाणी किंवा ध्वनिप्रदूषणाला रोखण्यासाठी एन्व्हायरन्मेंटल इंजिनीअर्सची मदत घेतली जाते.

व्हॅल्युअर

जागांसाठी कर्ज देताना त्या जागेची खरी किंमत तपासली जाते. कोर्टकचेऱ्यांच्या कामातही अनेकदा वास्तूंचे मूल्य ठरवावे लागते. अशा वेळी व्हॅल्युअर म्हणून काम करणाऱ्या सिव्हिल इंजिनीअरची नितांत गरज असते. इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर एखाद्या व्हॅल्युअरकडे काम करायचा अनुभव घेऊन मग नवी दिल्ली इथल्या काउन्सिल ऑफ व्हॅल्युअर्स या संस्थेकडे नोंदणी करणे गरजेचे असते. मगच व्हॅल्युअर म्हणून काम करता येते.

आर्ब्रिटेटर

बांधकामाच्या दर्जाविषयीच्या किंवा इतर तक्रारी या पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाच्या असतात. त्या नेहमीच्या न्यायालयांमार्फत सोडवणे कठीण होते. अशा वेळी आर्ब्रिटेशन अर्थात तंटानिवारण करणाऱ्या आर्ब्रिटेटरची गरज असते. ते म्हणजे सिव्हिल इंजिनीअर्सच असतात. विद्यार्थ्यांला सिव्हिल इजिनीअिरगच्या पदवीनंतर एलएल.बी. पदवी मिळवून एखाद्या आर्ब्रिटेटरबरोबर त्याचा साहाय्यक म्हणून काम करायचा अनुभव घ्यावा लागतो. मग कौन्सिल ऑफ आर्ब्रिटेटर्सकडे नोंदणी करून हा व्यवसाय करता येतो. व्हॅल्युअर्सना स्थानिक न्यायालयांच्या न्यायाधीशांचा मान असतो आणि त्यांनी दिलेल्या निर्णयांना केवळ उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयातच आव्हान देता येते.

संपूर्ण राज्यभरात इंजिनीअिरग अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या संस्था, त्यात उपलब्ध असलेल्या जागा आणि प्रवेश प्रक्रियेविषयीच्या तपशीलवार माहितीसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या  http://dtemaharashtra.gov.in या  संकेतस्थळावर संपूर्ण माहिती मिळू शकेल.

प्रा. मनोज अणावकर

anaokarm@yahoo.co.in