सेंट्रल वॉटर कमिशन गांधीनगर अंतर्गत कुशल कामगार- सहाय्यकांच्या ५७ जागा-

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत.

वयोमर्यादा ३० वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ डिसेंबर २०१७ च्या अंकातील सेंट्रल वॉटर कमिशन गांधीनगरची जाहिरात पहावी अथवा कमिशनच्या www.cwc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज सुपरिंटेंडिंग इंजिनीअर, हायड्रॉलिक ऑब्जव्‍‌र्हेशन सर्कल, सेंट्रल वॉटर कमिशन, दुसरा मजला, नर्मदा तापी भवन, सेक्टर १० ए, गांधीनगर, गुजरात ३८२०१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०१८.

इंडियन ऑइलमध्ये इंजिनीअर्ससाठी अधिकारी म्हणून संधी-

अर्जदारांनी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, मेटॅलर्जी, कॉम्प्युटर सायन्स वा इंस्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. व त्यांनी जीईटीई २०१८ पात्रता परीक्षा दिलेली असावी आणि त्यांना संबंधित विषयातील कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा.

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली इंडियन ऑइलची जाहिरात पहावी अथवा इंडियन ऑइलच्या www.iocl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०१८ आहे.

केंद्रीय नागरी उड्डयन विभागात विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ७९ जागा-

अर्जदार पदवीधर असावेत व त्यांना सुरक्षाविषयक कामाचा सहा वर्षांचा अनुभव असायला हवा. अधिक माहिती व तपशिलासाठी १८ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय नागरी उड्डयन विभागाची जाहिरात पहावी अथवा www.bcasindia.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी डायरेक्टर (पर्सोनेल) मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन, ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी, ए विंग, तिसरा मजला, जनपथ, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०१८.

प्रसार भारतीमध्ये डेप्युटी डायरेक्टर ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या ६ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६ ते २२ डिसेंबर २०१७ च्या अंकातील प्रसार भारतीची जाहिरात पहावी अथवा प्रसारभारतीच्या www.prasarbharati.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी डायरेक्टर (पीबीआरबी), प्रसारभारती सेक्रेटरीएट प्रसारभारती हाऊस, कॉपर्निकस मार्ग, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०१८.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथे वरिष्ठ सहाय्यकांच्या ६ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३ ते १५ डिसेंबर २०१७ च्या अंकातील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्लीची जाहिरात पहावी अथवा विद्यापीठाच्या www.jnu.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज जॉइंट रजिस्ट्रार (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन), रूम नं. ३१०, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, न्यू मेहरोली रोड, नवी दिल्ली ११००६७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०१८.

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये संशोधकांच्या जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनची जाहिरात पहावी अथवा ऑर्गनायझेशनच्या ntro.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट डायरेक्टर (पर्सोनेल), नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, ब्लॉक ३, ओल्ड जेएनयू कॅम्पस्, नवी दिल्ली ११००६७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०१८.

वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत मुंबई येथे सीनिअर प्रिंटर म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली वस्त्रोद्योग मंत्रालयाची जाहिरात पहावी अथवा मंत्रालयाच्या www.handlooms.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर (वेस्ट झोन), वस्त्रोद्योग मंत्रालय, वेव्हर्स सव्‍‌र्हिस सेंटर, १५ ए, माया परमानंद मार्ग, मुंबई ४०० ००४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०१८.