नोकरीची संधी

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पात्रताधारक असावेत.

*  इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये प्रशिक्षणार्थी उमदेवारांसाठी ८४ जागा-

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पात्रताधारक असावेत. अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या https://www.iocl.com/ संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१७.

* भारत ब्रॉडबँड नेटवर्कमध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्ससाठी संधी-

अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग यांसारख्या विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी जीएटीई- २०१७ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १ ते ७ ऑक्टोबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत ब्रॉडबँड नेटवर्कची जाहिरात पाहावी अथवा भारत ब्रॉडबँडच्या http://www.bbnl.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०१७.

*  मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन लि., नागपूर येथे असिस्टंट केमिस्ट पदाच्या १० जागांसाठी थेट मुलाखत-

अर्जदारांनी रसायनशास्त्र विषयातील एमएस्सी पात्रता कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ ते १० फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन, नागपूरची जाहिरात पाहावी अथवा एमईसीएलच्या http://www.mecl.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज व संबंधित कागदपत्रांसह मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, हायलँड ड्राइव्ह रोड, सेमिनरी हिल्स,
नागपूर- ४४०००६ येथे थेट मुलाखतीसाठी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी उपस्थित राहण्याची वेळ सकाळी ९.३० वाजता.

*  सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिटय़ूट, बंगलोर येथे इंजिनीअरिंग ऑफिसरच्या ८ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिटय़ूट, बंगलोरच्या http://www.cpri.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०१७.

*  सैन्य दलाच्या वैद्यक सेवा विभाग, मुंबई अंतर्गत शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशनची संधी-

अर्जदार वैद्यकशास्त्र विषयातील पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा ४५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २१ ते २७ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेल्या सैन्य दलाच्या वैद्यक सेवा विभाग, मुंबईची जाहिरात पाहावी अथवा विभागाच्या http://www.amcsscentry.gov.in / या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०१७.

*  नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅबियॉटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, बारामती- पुणे येथे सीनिअर सायंटिस्ट म्हणून संधी-

अर्जदारांनी कृषी अर्थशास्त्र, अर्थशास्त्र, सांख्यिकी यांसारख्या विषयात संशोधनपर पीएचडी पूर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित क्षेत्रात काम करण्याचा ८ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ४७ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ ते १० फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली कृषी संशोधक निवड मंडळ, नवी दिल्लीची जाहिरात पाहावी अथवा मंडळाच्या http://www.icar.org.in  किंवा http://www.asrb.org.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज सेक्रेटरी, अ‍ॅग्रिकल्चरल सायंटिस्ट रिक्रूटमेंट बोर्ड, कृषी अनुसंधान भवन- १, पूसा, नवी दिल्ली- ११००१२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०१७.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Job opportunities employment opportunities employment