नोकरीची संधी

२४ ते ३० सप्टेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी

केंद्रीय कायदा मंत्रालयात हिंदी सहाय्यकांच्या ३ जागा :

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २४ ते ३० सप्टेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in अथवा http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०१६.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पुणे अंतर्गत गट समन्वयांकाच्या २ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी पुणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या दूरध्वनी क्र. ०२०- २६१३१७८४ वर संपर्क करावा अथवा विभागाच्या http://www.punezp.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा- पुणे, नवीन जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, १, वेलेस्ली रोड, कॅम्प, पुणे- ४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०१६.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांतर्गत संशोधक सहाय्यकांच्या ३ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://www.nhrc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०१६.

दक्षिण- मध्य रेल्वेत खेळाडूंसाठी २१ जागा-

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रताधारक असावेत व त्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १७ ते २३ सप्टेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली दक्षिण- मध्य रेल्वेची जाहिरात पहावी अथवा http://www.scr.indianrailways.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (रिक्रुटमेंट अ‍ॅण्ड हेडक्वार्टर्स), रूम नं. ४१६, चौथा मजला, रेल नीलयम, (सिकंदराबाद ५०० ०७१) (तेलंगण) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०१६

सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन (भारत सरकारच्या अंगीकृत उपक्रम)मध्ये पुढील पदांची भरती.

जाहिरात क्र. सीडब्ल्यूसी/1-मॅनपॉवर/डीआर्-रिक्रूट/२०१६/०२.

(१) मॅनेजमेंट ट्रेनी (जनरल) – (३७ पदे). पात्रता – पदवी  एमबीए (पीएम/एचआर/आयआर/एमएम/ सप्लाय चेन मॅनेजमेंट)

(२) मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निशियन) – (६ पदे). पात्रता – प्रथम वर्गातील पदव्युत्तर पदवी (कृषि किंवा बायोकेमिस्ट्री किंवा रसायनशास्त्र किंवा प्राणीशास्त्र) (वेअरहाऊसिंग/क्वालिटी मॅनेजमेंटमधील पदविकाधारकांना प्राधान्य)

(३) सहाय्यक इंजिनिअर – (सिव्हील) (१५ जागा). पात्रता – सिव्हीलमधील अभियांत्रिकी पदवी.

(४) अकाऊंटंट – (१८ पदे). पात्रता – बी.कॉम. अधिक संबंधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव.

(५) सुपरिटेंडंट जनरल – (१३० जागा). पात्रता – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी.

(६) ज्युनियर सुपरिटेंडंट – (१३० जागा). पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

(७) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट – (३०० जागा). पात्रता – कृषि विषयातील पदवी किंवा प्राणीशास्त्र/रसायनशास्त्र/बायो-केमिस्ट्री या विषयांसह पदवी.

(८) स्टेनोग्राफर  पात्रता – १०वी उत्तीर्ण अधिक इंग्रजी शॉर्टहँडची ८० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. वेग.

वयोमर्यादा – दि. १३ ऑक्टोबर २०१६ रोजी पद क्र. (१), (२) आणि (७) साठी २८ वष्रे. पद क्र. (३), (४), (५) आणि (६) साठी – ३० वष्रे. पद क्र. (८) स्टेनोग्राफरसाठी २५ वष्रे. (वयोमर्यादा शिथिलक्षम – अजा/अज – ५ वष्रे, इमाव – ३ वष्रे).

वेतन – प्रतिमाह – पद क्र. (१) आणि (२) साठी रु. ४४,२४८/- प्रशिक्षणानंतर रु. ७.५लाख प्रतिवर्ष.) पद क्र. (३), (४) आणि (५) साठी – रु. ३५,२२७/-  भत्ते (प्रतिवर्ष रु. ६ लाख). पद क्र. (६) साठी रु. २४,०५७/-  इतर भत्ते (प्रतिवर्ष रु. ४ लाख). पद क्र. (७) साठी रु. २२,५५४/-  इतर भत्ते (प्रतिवर्ष रु. ३.७५ लाख). पद क्र. (८) साठी रु. २१,०५०/-  इतर भत्ते (प्रतिवर्ष रु. ३.५ लाख).

निवड पद्धती – ऑनलाईन पद्धतीने अर्ज http://www.cewacor.nic.in  किंवा  www.cwcjobs.com  किंवा   www.cwcjobs.in  या संकेतस्थळावर दि. १३ ऑक्टोबर २०१६ पर्यंत रु. ५००/- परीक्षा शुल्कासह भरावेत. (अजा/अजसाठी रु. १००/-)

भारतीय नौसेनेत अविवाहित महिला/पुरुष यांची एज्युकेशन ब्रँच (पर्मनंट कमिशन) आणि ऑफिसर्स इन लॉजिस्टिक कॅडर (शॉर्ट सर्व्हिस कमिशन) जून, २०१७ पासून इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी, इझिमाला, केरळ येथे सुरू होणाऱ्या कोर्ससाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्रता – पीसी एज्युकेशन – (१) एमएस्सी फिजिक्स (बीएस्सी मॅथ्स विषयासह) किंवा (२)/(३) एमएस्सी मॅथ्स/केमिस्ट्री (बीएस्सी फिजिक्स विषयासह) किंवा (४) एमए इंग्लिश (१२ वी फिजिक्स किंवा गणित विषयासह) किंवा (५) एमए हिस्टरी किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्समधील अभियांत्रिकी पदवी बीईसाठी किमान ६०% गुण आणि पदव्युत्तर पदवीसाठी किमान ५०% गुणांची अट.

(ब) एसएस्सी – लॉजिस्टिक्स – (१) बीई कोणत्याही शाखेतील किंवा (२) एमबीए किंवा (३) बीएससी/बीकॉम/बीएससी (आयटी) किमान प्रथम वर्गात उत्तीर्ण. अधिक फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/मटेरियल मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदविका किंवा एमसीए/एमएससी (आयटी) (लॉजिस्टिक्स पदांसाठी किमान प्रथम वर्गात पास असणे आवश्यक) अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकाला १४ ऑक्टोबर २०१६ रोजी पात्रतेची परीक्षा पास करणे अनिवार्य. फक्त एकच अर्ज भरावयाचा आहे. जे उमेदवार एकापेक्षा जास्त कॅडरला पात्र असतील त्यांनी आपला पदाचा पसंती क्रम अर्जात नोंदावा.

वेतन – सीटीसी प्रतिमाह – सब-लेफ्टनंट पदासाठी रु. ७४,१००/- ते ९०,६००/-

निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार एसएसबी मुलाखतीसाठी निवडले जातील. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना सब-लेफ्टनंट रॅकवर तनात केले जाईल व प्रशिक्षणा दरम्यान पूर्ण वेतन दिले जाईल.

ई-अ‍ॅप्लिकेशन (ऑनलाइन) <http://www.joinindiannavy.gov.in/>  या संकेतस्थळावर दि. १४ ऑक्टोबर २०१६ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जाची िपट्रआऊट काढून (दोन प्रती) त्यावर पासपोर्ट साइज कलर फोटो स्वयंसाक्षांकित करून चिकटवावा. आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्जाची एक प्रत ‘पोस्ट बॉक्स नं. ५, आर.के. पुरम मेन पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली – ११००६६’ या पत्त्यावर दि. २४ ऑक्टोबर २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

 

सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला- पुणे येथे क्राफ्टसमनच्या ४ जागा-

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय स्तरावरील कौशल्यविषयक पात्रताधारक असावेत व त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा ३ वर्षांचा अनुभव असावा किंवा त्यांनी उमेदवारी पूर्ण करून त्यांना संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १७ ते २३ सप्टेंबर २०१६च्या अंकातील सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासलाची जाहिरात पहावी अथवा http://www.cwprs.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज दि चीफ अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला, पुणे ४११०२४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०१६.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये एक्झिक्यूटीव्ह आणि नॉन-एक्झिक्यूटिव्ह कॅटेगरी पदांची भरती.

(जाहिरात क्र. डीएमआरसी/ओएम/एचआर/१/२०१६)

एक्झिक्यूटिव्ह कॅटेगरी –

(१) असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल (१४ पदे),

(२) असिस्टंट मॅनेजर/एस अँड टी (७ पदे),

(३) असिस्टंट मॅनेजर/सिव्हील (५ पदे). पात्रता – संबंधित विषयांतील अभियांत्रिकी पदवी किमान ६०% गुणांसह आणि व्हॅलिड  ॅअळए 2016  स्कोअरसह

(४) असिस्टंट मॅनेजर/ऑपरेशन्स (५ पदे – पात्रता – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/सिव्हीलमधील अभियांत्रिकी पदवी किमान ६०% गुणांसह किंवा एमबीए किमान ६०% गुणांसह (मार्केटिंग/इंटरनॅशनल बिझिनेस ऑपरेशन्स/लॉजिस्टिकमधील) (५) असिस्टंट मॅनेजर/एचआर (३ पदे) – पात्रता – एचआरमधील २ वर्षांचा एमबीए किमान ६०% गुणांसह.

(६) असिस्टंट मॅनेजर (१० पदे) – पात्रता – सीए/आयसीडब्ल्यूए किमान ५०% गुणांसह

नॉन-एक्झिक्यूटिव्ह कॅटेगरी – (१) स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर (६६२ पदे),

(२) कस्टमर रिलेशन्स असिस्टंट (११०० पदे),

(३) ज्युनियर इंजिनीअर/इलेक्ट्रिकल (४८ पदे),

(४) ज्युनियर इंजिनीअर/इलेक्ट्रॉनिक्स (८१ पदे),

(५) ज्युनियर इंजिनीअर/मेकॅनिकल (१० पदे),

(६) ज्युनियर इंजिनीअर/सिव्हील (६६ पदे),

पद क्र. (१) साठी पात्रता – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्समधील अभियांत्रिकी पदविका किंवा फिजिक्स/केमिस्ट्री/मॅथ्समधील बीएस्सी पदवी.

पद क्र. (२) साठी पात्रता – कोणतीही पदवी आणि किमान ६ आठवडे कालावधीचा कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन कोर्स.

पद क्र. (३) ते (६) साठी पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका.

पद क्र. (७) अकाऊंट्स असिस्टंट (२४ पदे)साठी पात्रता -बीकॉम पदवी

पद क्र. (८) मेंटेनर (एकुण १३९३ पदे). इलेक्ट्रिशियन (४५६ पदे), फिटर (२४३ पदे), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (६०२ पदे), रेफ्रि आणि एसी मेकॅनिक (९२ पदे).
पात्रता – संबंधित विषयातील आयटीआय/एनसीव्हीटी/एससीव्हीटी). वयोमर्यादा – सर्व पदांसाठी दि. १ जुल २०१६ रोजी १८ ते २८ वष्रे. उच्चतम वयोमर्यादा अजा/अज -५ वष्रे आणि इमाव – ३ वर्षांनी शिथिलक्षम. लेखी परीक्षा/निवड पद्धती विषयी विस्तृत माहिती <http://www.delhimetrorail.com/>  या संकेतस्थळावर उपलब्ध. याच संकेतस्थळावर   करिअर या लिंकमधून ऑनलाइन अर्ज दि. १५ ऑक्टोबपर्यंत करावेत.

नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिटय़ूट, भोसरी, पुणे येथे तंत्रज्ञ म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ सप्टेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिटय़ूट, पुणेची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.icmr.nic.in अथवा  http://www.nari.res.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१६.

डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी- पुणे येथे ज्युनिअर रिसर्च फेलो व रिसर्च असोसिएशन पदांसाठी थेट मुलाखत-

अधिक माहिती व तपशिलासाठी डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीच्या http://www.diat.ac.in > careers@diat या संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्रताधारक उमेदवारांनी तपशीलवार अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्सड टेक्नॉलॉजी, गिरीनगर, पुणे या पत्त्यावर २१ ऑक्टोबर २०१६ रोजी उपस्थित राहण्याची वेळ सकाळी १० वा.

इंडियन ऑइलच्या बरोनी रिफायनरीमध्ये प्रशिक्षार्थीच्या ४६ जागा: 

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रताधारक असावेत अथवा त्यांनी बीएस्सी पदवी किंवा इंजिनीअरिंगमधील पदविका पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २४ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० सप्टेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ऑइलची जाहिरात पहावी अथवा इंडियन ऑइलच्या https://www.iocl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतेस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१६.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Job opportunities in india

ताज्या बातम्या