एमपीएससी मंत्र : अर्थशास्त्राची तयारी

राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अर्थशास्त्र या घटकामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो.

अर्थशास्त्राचा अभ्यास म्हणजे एक ‘लढाई’ किंवा गच्च डोळे मिटून गिळायचा घास अशी भावना मला अनेक उमेदवारांमध्ये दिसते. परंतु हा कडू घास गिळल्याशिवाय यशाची भूक भागणार नाही मित्रांनो! राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये अर्थशास्त्र या विषयावर १२ ते १४ प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी  स्पर्धा परीक्षेचा आवाका, त्याची खोली व व्याप्ती आणि आयोगाचा प्रश्न विचारण्याचा विश्लेषणात्मक कल समजून घेणे आवश्यक आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अर्थशास्त्र या घटकामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो.

१)आर्थिक आणि सामाजिक विकास

२)शाश्वत विकास

३)दारिद्रय़

४)लोकसंख्या अभ्यास

५)सामाजिक सेवा धोरणे

वरील पाच घटकांपकी आपण या भाग १ मध्ये

१) आíथक आणि सामाजिक विकास

२) शाश्वत विकास

या दोन घटकांचा अभ्यास कसा करावा यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी उमेदवारांनी लक्षात ठेवाव्यात.

*    उमेदवाराने आयोगाच्या ४ ते ५ र्वष अगोदरच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा सखोल व विश्लेषणात्मक अभ्यास करावा.

*    अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना समजून     घ्याव्यात.

*    जास्तीत जास्त सराव चाचण्या सोडवण्याचा प्रयत्न करावा.

*   एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर त्यावर जास्त वेळ न घालवता पुढील प्रश्नांकडे जा. वेळेत पेपर पूर्ण करा.

आर्थिक आणि सामाजिक विकास

आर्थिक विकास ही आíथक वृद्धीपेक्षा व्यापक संकल्पना आहे.  याचा अभ्यास करताना सर्वप्रथम पायाभूत सुविधांचा विकास या घटकाचा अभ्यास करावा लागेल. आíथक आणि सामाजिक घटकांच्या अभ्यासात पुढील बाबींचा सविस्तर अभ्यास करा.

अ) आर्थिक पाहणी अहवाल (भारत, महाराष्ट्र) यात सामाजिक व आíथक विकासासाठी राबलेल्या योजना उद्दिष्टे वगरे.

2     यूएनडीपीचा मानव विकास अहवाल – यूएनडीपीमार्फत दरवर्षी मानव विकास अहवाल सादर केला जातो. त्यातील

१) मानव विकास निर्देशांक

२) लिंग असमानता निर्देशांक

३) बहुआयामी दारिद्रय़ निर्देशांक

४) असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक.

*     लिंग असमानता निर्देशांकाचा अभ्यास करताना महिलांविषयी बाबींचा विशेष अभ्यास करावा. (उदा. जननआरोग्य, सबलीकरण वगरे) यूएनडीपीच्या मानव विकास अहवालाचा अभ्यास करताना तो तुलनात्मकदृष्टय़ा करावा जसे भारताचे जागतिक एचडीआयमधील स्थान, निर्देशांक गुण तसेच जगातील सर्वाधिक व सर्वात कमी मानव विकास निर्देशांक असलेले देश त्याची क्रमवारी शॉर्ट नोटस् रूपात काढून ठेवावी.

*    अगोदरच्या पूर्व परीक्षेमध्ये राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरणावर भर दिलेला आहे, यामुळे याचाही सखोल अभ्यास करावा.

*    आजपर्यंत राबवलेल्या पंचवार्षकि योजनांमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आखलेल्या धोरणांचा थोडक्यात आढावा घ्यावा व त्याचे यशापयश लक्षात घ्यावे.

*     रॉस्टोच्या आर्थिक वाढीच्या पाच अवस्थांचा सविस्तर अभ्यास करा.

१) परंपरागत समाज

२) उड्डाणपूर्व स्थिती

३) उड्डाण

४) परिपक्वता

५) उच्च उपभोग

शाश्वत विकास

शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो भविष्यातील पिढय़ांची स्वत:च्या गरजा भागवण्याची क्षमता धोक्यात न आणता वर्तमानातील गरजा भागवू शकतो. शाश्वत विकास या घटकावर ३ ते ४ प्रश्न विचारले जातात. याचा अभ्यास करताना पुढील बाबी अभ्यासाव्यात.

*    शाश्वत विकासाची संकल्पना.

*    शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा उगम-ब्रन्डलँड आयोग वगरे.

*    वसुंधरा परिषदा आणि अजेंडा २१

*    शाश्वत विकासाचे आधार (Pillars of Sustainable Development)

२००२च्या शाश्वत विकास परिषद (WSSD)च्या मते शाश्वत विकासाची संकल्पना परस्परावलंबी चार आधारांवर आधारलेली आहे.

१) आíथक शाश्वतता

२) सामाजिक शाश्वतता

३) पर्यावरणीय शाश्वतता

४) संस्थात्मक शाश्वतता या चार घटकांचा अभ्यास करा.

सहस्रक विकास लक्ष्यांच्या (MDG s) यशाची अंमलबजावणीनंतर संयुक्त राष्ट्रसंघाने १७ शाश्वत विकास लक्ष्ये (SDG s) आणि १६९ सहयोगी लक्ष्ये जाहीर केली याचा सविस्तर अभ्यास करावा.

*    कार्बन क्रेडिट आणि क्केटो प्रोटोकॉल.

*    शाश्वत विकासासाठी भारताचे प्रयत्न.

*     COP परिषदा शाश्वत विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय हे सर्व परिषदांमधून शॉर्ट नोटस् रूपात काढा.

*     ग्रीन इकॉनॉमी – उगम, संकल्पना आणि उद्दिष्टय़े.

वरील सर्व घटकांचा सविस्तर अभ्यास करताना भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे, स्पर्धात्मक परीक्षा अर्थशास्त्र भाग १,२- किरण देसले ही पुस्तके उपयुक्त आहेत.

भाग दोनमध्ये आपण राहिलेल्या ३ घटकांचा अभ्यास करू. तोपर्यंत अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mpsc preparation mpsc 2017 exam mpsc exam tips