विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षा-अर्थशास्त्र विषयाची तयारी भाग १ मध्ये आपण आर्थिक, सामाजिक आणि शाश्वत विकास या दोन घटकांचा अभ्यास केला. आता दुसऱ्या भागात  दारिद्रय़, लोकसंख्येचा अभ्यास. सामाजिक सेवा धोरणे व सामाजिक क्षेत्र सुधारणा घटकांचा अभ्यास करूयात.

दारिद्रय़ (poverty)

जीवनाच्या किमान मूलभूत गरजा न भागवता येण्याची स्थिती म्हणजे दारिद्रय़ होय. भारतात दारिद्रय़ मोजण्यासाठी निरपेक्ष दारिद्रय़ विचारात घेतले जाते. या घटकांच्या अभ्यासासाठी खालील बाबींचा सविस्तर अभ्यास करावा.

**   भारतातील दारिद्रय़ –

*   दारिद्रय़ अभ्यासासाठी नेमलेल्या समित्या अहवाल (तेंडुलकर, रंगराजन वगरे).

*   पंचवार्षकि तसेच इतर योजनांत दारिद्रय़ निर्मूलनासाठी राबवलेले कार्यक्रम, त्याची उद्दिष्टे आणि परिणाम.

*   भारतात दारिद्रय़ निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या विविध संस्थांचा आढावा घ्या.

*  राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेची (NSSO)) दारिद्रय़विषयक अहवाल व आकडेवारी.

**   हंगर इंडेक्स –

हंगर इंडेक्सचा भारत आणि जग असा तुलनात्मक अभ्यास करावा. भारताचे स्थान, गुण वगरे आणि पहिले व शेवटचे ३ देश.

**   जागतिक दारिद्रय़ निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या संघटना –

युनो, जागतिक बँक, आय. एम. एफ. वगरे.

**   बहुआयामी निर्धनता निर्देशांक (MPI) UNDP च्या  MPI च्या या अहवालात जगात किती टक्के दारिद्रय़ आहे याची सविस्तर माहिती ठेवा.

**   पॉव्हर्टी गॅप इंडेक्स –

*   सरासरी दारिद्रय़ रेषेपासून दारिद्रय़ाचे अंतर म्हणजे पॉव्हर्टी गॅप.

*   ही संकल्पना गौरव दत्त व मार्टिन रॅव्हॅलीन यांनी सुचवली. याची सविस्तर  माहिती घ्या. भारताचा ढॅक व त्याचा इतर देशांशी तुलनात्मक अभ्यास करा.

लोकसंख्या अभ्यास –

राज्य सेवा पूर्वपरीक्षेत अर्थशास्त्र घटकातील जनसांख्यिकी या घटकावर प्रश्न विचारण्याचा आयोगाचा कल जास्त आहे. या घटकाचा अभ्यास खालीलप्रमाणे करा.

**   जगाची लोकसंख्या  –

*   जागतिक लोकसंख्या वाढीचे टप्पे, जागतिक लोकसंख्या वितरण, दिन वगरे.

*   जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे देश व भारताचे स्थान.

*   जागतिक लोकसंख्येची वैशिष्टय़े.

*    भारताची लोकसंख्या –

*   भारताची जनगणना आणि त्याचा इतिहास.

*   लोकसंख्या वाढीचे टप्पे आणि अवस्था.

*    लिंग गुणोत्तर साक्षरता नागरी व ग्रामीण लोकसंख्या.

*   लोकसंख्येची घनता –  सर्वाधिक व सर्वात कमी घनतेची राज्ये, शहरे याची माहिती काढावी.

* लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात वाढ झाली, सर्वाधिक सर्वात कमी अशा राज्यांची माहिती नोट्स रूपात काढलेली असावी, ०-६ वर्षांखालील लिंग गुणोत्तर, इ.

*   साक्षरता- साक्षरता दर साक्षरतेसाठी राबलेल्या योजना.

*   स्थलांतर- आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत, राज्यांतर्गत, जिल्हा जिल्ह्य़ात होणारे स्थलांतर, इ. याचे प्रकार आणि कारणे अभ्यासा.

*   नागरी व ग्रामीण लोकसंख्या – नागरी व ग्रामीण, लोकसंख्येचा सविस्तर अभ्यास करा, भारतातील एकूण दशलक्षी शहरे वगरे.

*   जन्मदर आणि मृत्युदर – संकल्पना आणि सविस्तर आकडेवारी.

*   महाराष्ट्राची लोकसंख्या – भारताच्या लोकसंख्येशी तुलनात्मक अभ्यास करावा.

**   राष्ट्रीय लोकसंख्या धोरण –

*   धोरणाची उद्दिष्टे

*   दीर्घकालीन ध्येये आणि अल्पकालीन ध्येय.

**   राष्ट्रीय लोकसंख्या आयोग –

रचना, उद्दिष्टे, कार्यपद्धती सामाजिक सेवा धोरणे समाजातील मागास घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक क्षेत्र सुधारणा धोरणे राबवावी लागतात. यात बालक, स्त्रिया, अपंग, वृद्ध व मागास असे गट पाडले जातात. या गटाचे वर्गीकरण करून अभ्यास करावा.

**   बालक –

*   राष्ट्रीय बालक धोरण १९९४

*   एकात्मिक बालविकास प्रकल्प

*   बालकांची राष्ट्रीय सनद आणि युनिसेफ

*   बालकांच्या सद्य:स्थितीचा अहवाल- अर्भक मृत्युदर, बालमृत्युदर, इ.

**   स्त्रिया –

*   राष्ट्रीय महिला आयोग- रचना, उद्देश आणि कार्य

*   राष्ट्रीय महिला कोश व महिला कायदे

*   पंचवार्षकि योजनांमधील महिलांविषयीच्या योजना

*   महाराष्ट्र सरकारच्या महिलांविषयी योजना आणि धोरणे

**   अपंग –

*   संयुक्त राष्ट्र संघाचा अपंग व्यक्तींच्या हक्काचा आंतरराष्ट्रीय करार.

*   केंद्र स्तरावरील अपंगांसाठीच्या संस्था, विभाग, शासकीय व एन.जी.ओ.

*   बहुविकलांग कायदा १९९९

*   राष्ट्रीय अपंगांसाठीचे धोरण

**   वृद्ध –

*   एकात्मिक वृद्ध व्यक्तींसाठीची योजना १९९२

*  राष्ट्रीय वृद्धांसाठीचे धोरण

**   मागासवर्ग –

*   अनुसूचित जाती व जमाती कायदा १९८९

*   मागासवर्गीयांसाठीच्या विविध योजना.

*   अनुसूचित जाती आयोग, अनु-जमाती आयोग, रचना, कार्य व उद्दिष्टे.

वरील सर्व घटकांचा सविस्तर अभ्यास करताना

भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे

स्पर्धात्मक परीक्षा अर्थशास्त्र भाग १,२ -किरण देसले, ही पुस्तके उपयुक्त आहेत.

राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही यशाची पहिली पायरी आहे. त्यासाठी खूप कष्ट करा, कारण फुकट काहीच मिळत नाही. स्वतला फसवू नका, त्यामुळे केवळ पसा आणि वेळ वाया जातो. शेवटी पदरी निराशाच पडते. प्रामाणिक अभ्यास करा. राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.