नोकरीची संधी

उंची – १६२.५ सें.मी. नियमित सवयीने चष्मा वापरणारे उमेदवार पात्र नाहीत.

army job
भारतीय वायुसेनेत फ्लाइइंग ब्रँचमध्ये पुरुष आणि महिलांना कमिशन्ड ऑफिसर होण्यासाठी ‘एनसीसी स्पेशल एन्ट्री स्कीम’ अंतर्गत जानेवारी २०१८ पासून कोर्स.

* भारतीय वायुसेनेत फ्लाइइंग ब्रँचमध्ये पुरुष आणि महिलांना कमिशन्ड ऑफिसर होण्यासाठी ‘एनसीसी स्पेशल एन्ट्री स्कीम’ अंतर्गत जानेवारी २०१८ पासून कोर्स.

पात्रता –

(१) दि. २१ मे २०१५ नंतर एनसीसी एअर विंग सीनियर डिव्हिजन ‘सी’ सर्टिफिकेट प्राप्त केलेला असावा.

(२) किमान ६०% गुणांसह पदवी उत्तीर्ण (१२ वीला गणित आणि फिजिक्स विषय असावा.) किंवा बी.ई. उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०१८ रोजी (उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९४ ते १ जानेवारी १९९८ दरम्यानचा असावा.)

उंची – १६२.५ सें.मी. नियमित सवयीने चष्मा वापरणारे उमेदवार पात्र नाहीत. एलएलबी उत्तीर्ण उमेदवारांना भारतीय वायुसेनेत लिगल डय़ुटी मिळविण्याची संधी उपलब्ध असेल. फक्त पुरुष उमेदवारांना परमनंट कमिशनसाठी एक बॅच असेल. महिला आणि पुरुष यांच्यासाठी शॉर्ट सíव्हस कमिशन फक्त १४  वर्षांसाठी एक बॅच असेल.

निवड पद्धती – विहित मुदतीत अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांना टेस्टिंगसाठी डेहराडून, म्हैसूर, वाराणसी यांपकी एका एअरफोर्स सिलेक्शन बोर्डासमोर बोलाविले जाईल.

वेतन – दरमहा रु. ८२,०५०/- रु. ७५ लाखांचे इन्शुरन्स कव्हरेज.

ऑनलाइन अर्ज http://www.careerairforce.nic.in या संकेतस्थळावर दि. १५ जून २०१७ पर्यंत अर्ज करता येतील. एनसीसी सर्टिफिकेट वॅलिडेशननंतरच अर्ज स्वीकारला जाईल.

संपर्कासाठी दूरध्वनी क्र. १८००-११-२४८८ किंवा ०११-२३०१०२३१  विस्तार क्र. ७६१०/७९७३/७३५०

(९.३० ते १७.०० वाजेपर्यंत).

*  भारतीय नौदलात अविवाहित पुरुष उमेदवारांची भरती

(१) ‘सेलर्स’ (सिनियर सेकंडरी रिक्रूटस) (एसएसआर) फेब्रुवारी, २०१८ बॅच आणि

(२) ‘सेलर्स फॉर आर्टिफिअर अप्रेंटिस’ (EE) फेब्रुवारी, २०१८ बॅचसाठी भरती.

पात्रता – १२ वी (गणित आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री, बायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स यांपकी एका विषयासह) उत्तीर्ण.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म ‘एसएसआर’साठी १ फेब्रुवारी १९९७ ते ३१ जानेवारी २००१, ‘एए’साठी १ फेब्रुवारी १९९८ ते ३१ जानेवारी २००१ दरम्यानचा असावा.

निवड पद्धती –  (१) लेखी परीक्षा – (सप्टेंबर/ऑक्टोबर २०१७ मध्ये) इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामान्यज्ञान या विषयांवर आधारित ६० मिनिटे कालावधीची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची.

(२) शारीरिक क्षमता चाचणी (पीफटी).

(३) वैद्यकीय तपासणी.

शारीरिक मापदंड- उंची – १५७ सें.मी., छाती – किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक.

ट्रेनिंग – एसएसआरसाठी २२ आठवडय़ांचे ट्रेनिंग ‘आयएनएस चिलका’ येथे.

स्टायपेंड – ट्रेनिंग दरम्यान दरमहा रु. ५,७००/- दिले जाईल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर मूळ पगारातून दिलेले स्टायपेंड वजा करून वेतनातील फरक सुरुवातीपासून दिला जाईल.  ऑनलाइन अर्ज http://www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दि. ४ जून २०१७ पर्यंत करावेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Suitable job vacancies in india