CBSE Class 10th Result 2022 Today Updates : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, सीबीएसई (CBSE) ने बारावी टर्म २ बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत आणि आता दहावी बोर्डाचा निकाल देखील लवकरच जाहीर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टर्म १ आणि टर्म २ चे गुण एकत्र करून आज अंतिम निकाल जाहीर केला जाईल. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की सीबीएसईचे निकाल वेळेवर आणि कदाचित जुलैच्या अखेरीस जाहीर केले जातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in तपासात राहावी, कारण निकाल लवकरच जाहीर होऊ शकतो. सूत्रांनुसार, असे सांगितले जात आहे की निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर होण्याची शक्यता आहे. cbseresults.nic.in या वेबसाइटला भेट देऊन, विद्यार्थी निकाल तपासण्यासाठी आणि गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी त्यांच्या शाळेचा कोड, रोल नंबर आणि जन्मतारीखसह लॉग इन करू शकतात.

CBSE 12th Result 2022 : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

सीबीएसई दहावीचे गुणपत्रक डाउनलोड करण्याची प्रक्रिया

  • स्टेप १: शिक्षण मंडळाच्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • स्टेप २: तुम्हाला होम पेजवर ‘CBSE 10th result 2022’ अशी लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • स्टेप ३: आता, विद्यार्थ्यांना त्यांचे आवश्यक डिटेल्स जसे की रोल नंबर, जन्मतारीख इत्यादी भरणे आवश्यक आहे.
  • स्टेप ४: सीबीएसई इयत्ता १० वी निकाल २०२२ स्क्रीनवर दिसेल
  • स्टेप ५: इयत्ता १० चे स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbse 10th result 2022 might be released today at 2 pm on the official website pvp
First published on: 22-07-2022 at 12:59 IST