CBSE 10th Result 2022 Updates : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी आपले गुण तपासण्यासाठी cbseresults.nic.in, results.cbse.nic.in, results.gov.in किंवा cbse.digitallocker.gov.in वर जाऊ शकतात. तत्पूर्वी, बोर्डाने आज १२वीच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. शाळेचा कोड, रोल नंबर आणि जन्मतारीख वापरून सीबीएसई निकाल तपासता येतो.

यावर्षी सीबीएसईने दोन टर्ममध्ये परीक्षा घेतल्या. अंतिम निकालासाठी, लेखी पेपर्सच्या बाबतीत, टर्म १ ला ३०% आणि टर्म २ ला ७०% महत्त्व देण्यात आले आहे. प्रॅक्टिकलमध्ये, दोन्ही टर्म्सना समान महत्त्व देण्यात आले आहे.

UPSC Result, UPSC Result Marathi News, UPSC Civil Services Final Result 2023 Out
यूपीएससी परीक्षेत विदर्भाचा डंका, नागपूरच्या पाच विद्यार्थ्यांनी मारली बाजी
National Medical Commission, Denies Approval for New Medical Colleges, Medical Colleges and Seat Increase, 2024 2025 Academic Year, medical students, medical seats in india, medical seats
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा, महाविद्यालयांमध्ये वाढ? राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काय सांगितले?
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या
How Much Expenditure on Salary of Retired Contract Teachers
सेवानिवृत्त निवृत्त कंत्राटी शिक्षकांच्या मानधनावर किती खर्च? जाणून घ्या सविस्तर…

प्रदेशनिहाय टक्केवारी

त्रिवेंद्रम: ९९.६८%; बंगळुरू: ९९.२२%; चेन्नई: ९८.९७%; अजमेर: ९८.१४%; पाटणा: ९७.६५%; पुणे : ९७.४१%; भुवनेश्वर: ९६.४६%; पंचकुला: ९६.३३%; नोएडा: ९६.०८%; चंदीगड: ९५.३८%; प्रयागराज: ९४.७४%, डेहराडून: ९३.४३%; भोपाळ: ९३.३३%; दिल्ली पूर्व: ८६.९६%; दिल्ली पश्चिम: ८५.९४%, गुवाहाटी: ८२.२३%

CBSE 12th Result 2022 : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

लिंगनिहाय टक्केवारी

दहावीतही मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९५.२१ टक्के मुली आणि ९३.८० टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. तर ९० टक्के ट्रान्सजेंडर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९०% आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाख ३६ हजार ९९३ असून ९५% आणि त्याहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ६४ हजार ९०८ इतकी आहे.

२०२१-२२ या शालेय वर्षासाठी सीबीएसई दहावीच्या बोर्डातील एकूण नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या २१ लाख नऊ हजार २०८ होती, तर २० लाख ९३ हजार ९७८ मुलांनी परीक्षा दिली. त्यातील १९ लाख ७६ हजार ६६८ विद्यार्थी पास झाले असून सीबीएसईने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात एकूण ९४.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसईने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात एकूण ९४.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सीबीएसई दहावीचे गुणपत्रक डाउनलोड करण्याची प्रक्रिया

  • स्टेप १: शिक्षण मंडळाच्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • स्टेप २: तुम्हाला होम पेजवर ‘CBSE 10th result 2022’ अशी लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • स्टेप ३: आता, विद्यार्थ्यांना त्यांचे आवश्यक डिटेल्स जसे की रोल नंबर, जन्मतारीख इत्यादी भरणे आवश्यक आहे.
  • स्टेप ४: सीबीएसई इयत्ता १० वी निकाल २०२२ स्क्रीनवर दिसेल
  • स्टेप ५: इयत्ता १० चे स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.