स्पर्धापरीक्षेत देशाच्या अर्थसंकल्पावर बेतलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्याकरता गेल्या आर्थिक वर्षांतील महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींची इत्थंभूत माहिती असणे आवश्यक आहे. या लेखात स्पर्धापरीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांतील अद्ययावत आकडेवारी देत आहोत..

मागील लेखामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी विशद करण्यात आल्या.  आज आपण आर्थिक पाहणी अहवालातील नोंदींविषयी जाणून घेऊयात..

UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
Upsc Preparation Legislature Judiciary in Indian Polity Paper of Civil Services Pre Exam
upsc ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था; कायदेमंडळ, न्यायमंडळ, पंचायती राज
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
Controversy over opting out in recruitment process of Maharashtra Public Service Commission
‘ऑप्टिंग आऊट’वरून पुन्हा वाद; या पर्यायामुळे आर्थिक गैरव्यवहार….

गेल्या आíथक वर्षांतील महत्त्वाच्या आíथक घडामोडींचा आढावा, अर्थव्यवस्था व तिच्या विविध घटकक्षेत्रांची प्रगती व वाटचाल कशा प्रकारे झाली यावरील चर्चा व महत्त्वाची आकडेवारी आíथक पाहणी अहवालात देण्यात येते. २०१५-२०१६च्या आíथक पाहणी अहवालाचे दोन खंड असून यांपकी पहिल्या भागामध्ये सात मुख्य संकल्पनांवर चर्चा करण्यात आली आहे. त्या आहेत..

* भारतीय अर्थव्यवस्थेचे चक्रव्यूह

* भारतीय अर्थव्यवस्थेत त्रयीचा विस्तार

* कृषी- किमानातून कमाल

* माता व बालक

* संपन्न वर्गासाठी फायदे

* २१ व्या शतकातील राजकोषीय क्षमता

* प्राधान्य व्यापार करार

* खते

* भारतातील श्रम क्षेत्रात संरचनात्मक बदल

* संपूर्ण भारतातील वित्त व्यवस्था

२०१५-१६ वर्षांच्या सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत २०१६-१७ वर्षांत योजना खर्च १५.३ टक्क्य़ांनी, तर योजनेतर खर्च ९ टक्क्य़ांनी वाढलेला दिसतो. राजकोषीय तूट राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या (जीडीपी)  ३.५ टक्के या निर्धारित मर्यादेत ठेवण्यात केंद्र शासनाला यश मिळाल्याचे दिसून येते.

महत्त्वाची  आकडेवारी

* देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पादनामध्ये वाढ- ७.६%

* दरडोई राष्ट्रीय उत्पन्न- रु. ९३,२३१

* राष्ट्रीय सकल उत्पादनामध्ये (जीडीपी) सर्वाधिक वाढ झालेली राज्ये- पुदुच्चेरी, बिहार व मध्य प्रदेश अनुक्रमे.

* दरडोई  राष्ट्रीय सकल उत्पादनामध्ये (जीडीपी) सर्वाधिक वाढ झालेली राज्ये – पुदुच्चेरी, बिहार व मध्य प्रदेश अनुक्रमे.

* कर्जाची राष्ट्रीय सकल उत्पादनामध्ये (जीडीपी) टक्केवारी- अंतर्गत कर्जे- ४७.४%,

बाह्य़ कर्जे- १.५%, एकूण- ४८.९%

*एकूण कर्जातील वाटा-  

अंतर्गत कर्जे- ९६.९६ टक्के.

बाह्य़ कर्जे- ३ टक्के.

जागतिक बाजारातील तेलाच्या किमती घसरल्यामुळे पेट्रोलियम पदार्थ (ढडछ) व्यापारातील तूट  सन २०११-१२ ते २०१३-१४ दरम्यान १०० अब्ज डॉलरवरून एप्रिल-डिसेंबर २०१५ मध्ये ४४.२ अब्ज डॉलपर्यंत कमी झाली आहे.

२०१४-१५ वर्षांमध्ये सर्वाधिक निर्यातवाढ दूरसंचार उपकरणांमध्ये (२०.२%), तर सर्वात कमी निर्यातवाढ खनिजे व धातुके (-३२.७%) यामध्ये झाली.

आयातीमध्ये सर्वात मोठी घट (मूल्यानुसार) पेट्रोलियम पदार्थामध्ये झाली. तर सर्वाधिक आयातवाढ  कृषी व संबंधित उत्पादनांमध्ये (४०.९%), क्षार धातू (२५.४%) व सोने (१९.९%) इतकी झालेली दिसते.

चलनविषयक इतर दर

* राखीव रोखता गुणोत्तर (उफफ)- ४%

* वैधानिक रोखता गुणोत्तर (रछफ)- २१.२५%

* आधार दर (इं२ी फं३ी )- ९.३०%ते ९.१५%

* बचत जमा दर (रऊफ)- ४%

* बँक दर-  ७.०० %

* रेपो दर-  ६.५०%

* रिव्हर्स रेपो दर- ६.००%

EXPY- एखाद्या देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूच्या गुणवत्तेचे एकत्रित सरासरी परिमाण म्हणजे EXPY ही एका देशातून निर्यात होणाऱ्या सर्व उत्पादनांच्या PRODY सरासरी असते. भारताचा EXPY ७ इतका आहे.

Decanalization : याचा अर्थ एखाद्या वस्तूच्या किंवा उत्पादनाच्या आयातीवरील नियंत्रण हटवणे. भारतामध्ये ही संकल्पना विशेषत: खतांचे

नियमन हटविण्याबाबत वापरण्यात येते. भारतामध्ये स्फुरद आणि पोटॅश या खतांचे Decanalization यापूर्वीच करण्यात आले आहे. सन २०१६-१७ च्या आíथक पाहणी अहवालामध्ये युरिया खताच्या आयातीवरील र्निबधही शिथिल करणे प्रस्तावित आहे.

अर्थसंकल्प किंवा एकूणच आर्थिक बाबींमध्ये तथ्यात्मक माहिती (Factual Data) खूप महत्त्वाची असते. ही आकडेवारी कितीही कंटाळवाणी वाटली तरी विश्लेषणात्मक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तिच्यावर पकड असणे आवश्यक आहे.

या व मागील लेखामध्ये केंद्र स्तरावरील आर्थिक घडामोडींचा आढावा घेण्यात आला. पुढील लेखामध्ये महाराष्ट्र राज्याचा आर्थिक आढावा घेण्यात येईल.

आयातनिर्यातविषयक आकडेवारी

* निर्यातवाढ : वजा (-) १८.२% , आयातवाढ : वजा (-) १७.२%

* निर्यातीमध्ये सर्वाधिक वाटा : निर्मिती क्षेत्र, दागिने व मूल्यवान खडे, कृषी उत्पादने अनुक्रमे.

* आयातीमध्ये सर्वाधिक वाटा : पेट्रोलियम पदार्थ, भांडवली वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू.

* भारताचे व्यापारी भागीदार देश : चीन (१२.९६%), अमेरिका (११.५०%), संयुक्त अरब अमिरात (१०.५८%), सौदी अरब (७%), स्वित्र्झलड (४.१५%).

* भारताच्या निर्यातीमध्ये सर्वाधिक वाटा: अमेरिका (१३.७%), संयुक्त अरब अमिरात (१०.६%), हाँगकाँग (४.४%), चीन (३.८%), सौदी अरब (३.६%).

* भारताच्या आयातीमध्ये सर्वाधिक वाटा: चीन (१३.५%), सौदी अरब (६.३%),  संयुक्त अरब अमिरात (५.८%), स्वित्र्झलड (४.९४%), अमेरिका (४.९०%)