केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे संरक्षण दलाच्या विविध विभागांमध्ये अधिकारी पदावर निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कंबाइंड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन- २०१३ साठी पात्रताधारक उमेदवारांकडून खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.
जागांची संख्या व तपशील : या स्पर्धा परीक्षेद्वारा भरावयाच्या एकूण जागांची संख्या ५०० असून त्यामध्ये भारतीय सैन्यदल अकादमी, देहराडून २५०, भारतीय नौदल अकादमी, इझीमाला- ४०, वायुदल अकादमी, हैदरबाद ३२ व अधिकारी प्रशिक्षण अकादमी, चेन्नई १८७ याप्रमाणे जागांचा समावेश आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत-
* भारतीय सैन्यदल अकादमी व अधिकारी प्रशिक्षण अकादमी : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असायला हवेत.
* भारतीय नौदल अकादमी : अर्जदार इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत.
* वायुदल अकादमी : अर्जदारांनी बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र व गणित विषयांसह उत्तीर्ण करून त्यानंतर इंजिनीअरिंगमधील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
विशेष सूचना : वरील शैक्षणिक पात्रतेशिवाय अर्जदार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.
जे विद्यार्थी यंदा वरील शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसले असतील तेसुद्धा या स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना सैन्य निवड मंडळातर्फे शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून २०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत भरावेत.
अधिक माहिती व तपशील : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०१३.
ज्या पदवीधर विद्यार्थ्यांना सैन्यदलात अधिकारीपदावर आपले करिअर करायचे असेल त्यांना या स्पर्धा परीक्षेला जरूर बसता येईल.