नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ होमिओपॅथी, कोलकोता येथे उपलब्ध असणाऱ्या साडेपाच वर्षे कालावधीच्या बीएचएमएस या पदवी अभ्यासक्रमासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत –
शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावाची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व इंग्रजी या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांच्या गुणांची टक्केवारी कमीत कमी ५० टक्के असायला हवी. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी पाच टक्क्यांनी शिथिलक्षम आहे.
जागांची संख्या : या अभ्यासक्रमासाठी एकूण उपलब्ध जागांची संख्या ९३ असून त्यापैकी काही जागा नियमांनुसार राखीव आहेत.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावरील ही प्रवेश पात्रता परीक्षा देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई या परीक्षा केंद्राचा समावेश असेल.
अर्जदार विद्यार्थ्यांची बारावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या ६ ते १२ एप्रिल २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ होमिओपॅथीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nih.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्जासह पाठवायचे शुल्क  : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ५०० रु.चा डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ होमिओपॅथी यांच्या नावे असणारा व कोलकाता येथे देय असलेला डिमाण्ड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ती कागदपत्रे आणि डिमाण्ड ड्राफ्टसह असणारे अर्ज नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ होमिओपॅथी, ब्लॉक जीई, सेक्टर-३, साल्ट लेक, कोलकाता-७००१०६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० मे २०१३.