डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO), डिफेन्स मटेरिअल्स अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (DMSRDE) ने ज्युनियर रिसर्च फेलो पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ५ आणि ६ मे २०२२ रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.

डीआरडीओ, डीएमआरएसडीई (DMSRDE) भर्ती २०२२ अंतर्गत एकूण ३ पदे भरली जातील, ज्यामध्ये ज्युनियर रिसर्च फेलोच्या ०२ पदे आणि रिसर्च असोसिएटच्या ०१ पदांची भरती केली जाईल. ५ आणि ६ मे २०२२ रोजी होणाऱ्या मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

या भरती प्रक्रियेअंतर्गत, ज्युनियर रिसर्च फेलोच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नेटसह विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी असण्यास सांगण्यात आले आहे. रिसर्च असोसिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पीएचडी किंवा समकक्ष पदवी असावी. याशिवाय ज्युनियर रिसर्च फेलोसाठी वयोमर्यादा २८ वर्षे आणि रिसर्च असोसिएटसाठी ३५ वर्षे आहे.

अर्ज कसा करायचा?

वरील पात्रता पूर्ण करणारे इच्छुक उमेदवार डीएमआरएसडीई (DMSRDE) ट्रान्झिट फॅसिलिटी, डीएमआरएसडीई, GT रोड कानपूर २०८००४ या पत्त्यावर उमेदवार नियोजित तारखेला आणि वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा सोबत आणावा. याशिवाय मूळ गुणपत्रिका/प्रमाणपत्रे/प्रशस्तिपत्रे/सामुदायिक प्रमाणपत्रांसह अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटोही आणावा.