ECIL Recruitment 2022: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ने लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्र उमेदवार भरतीसाठी अधिकृत वेबसाइटद्वारे २५ जून २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ४ जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

‘या’ पदांसाठी होणार भरती

अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे निम्न विभाग लिपिकाच्या ११ रिक्त पदांची भरती केली जाईल. ज्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५ पदे, आर्थिक दुर्बल घटकासाठी १ पद, ओबीसीसाठी ४ पदे आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १ पदे रिक्त आहेत. पदांवर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा २०४८० रुपये मूळ वेतन दिले जाईल.

pune rte marathi news
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया सुरू… कसा आहे पालकांचा प्रतिसाद?
Big updated for admissions under RTE Online application registration will start
आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी मोठी अपटेड… ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार सुरू…
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
financial year came to an end Be careful when completing transactions
Money Mantra : आर्थिक वर्ष संपत आले; व्यवहार पूर्ण करताना ‘ही’ काळजी घ्या

(हे ही वाचा: SBI Recruitment 2022: ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील)

पात्रता काय?

उमेदवार किमान ५०% गुणांसह पदवीधर असावा. तसेच टाइप लेखनाचा वेग ४० शब्द प्रति मिनिट असावा. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

(हे ही वाचा: BMC Bharti 2022 : ११३ रिक्त पदांसाठी भरती; पदवीधर करू शकतात अर्ज)

वयोमार्यदा किती?

भरतीसाठी उमेदवाराचे कमाल वय २८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

(हे ही वाचा: DRDO INMAS Recruitment 2022: पदवीधारकांसाठी नोकरीची संधी; पगार ३१,००० रुपये)

निवड कशी होईल?

लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुणांचे नकारात्मक गुण असतील. उमेदवार भरतीसाठी अधिकृत वेबसाइट ecil.co.in वर २५ जूनपर्यंत अर्ज करू शकतात.

(हे ही वाचा: IBPS RRB 2022 Notification Out: बँक पीओ, लिपिक ते अधिकारी अशा विविध पदांसाठी होणार भरती; आजपासून अर्जप्रक्रिया सुरु)

अर्ज शुल्क किती?

सामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अधिक तपशीलांसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट पाहू शकता.