भारताला दोन जागतिक पेचप्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. ते म्हणजे मोठय़ा प्रमाणावरील तरुण बेरोजगार आणि महत्त्वाची कौशल्ये संपादन केलेल्या व्यक्तींचा तुटवडा.   
सामाजिक व आíथक संकटांमधील शक्य परिणामांचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आज असे अनेक युवत-युवती आहेत, ज्यांना आपल्याला हवी ती नोकरी आपल्याला मिळेल का, अथवा आपण ती करू शकू का, अशी धाकधूक वाटत असते. देशाच्या कानाकोपऱ्यातील युवावर्गात धुमसणाऱ्या अस्वस्थतेवर नजर टाकली तरी त्यातून स्पष्ट होते की, जर आपण रोजगाराचे उपयुक्त कौशल्य प्रशिक्षण दिले नाही तर नजीकच्या भविष्यकाळात देशात असंख्य निरुपयोगी पदवीधर उभे राहतील.
अलीकडच्या अभ्यासाक्रमानुसार, टॉप
१० टक्क्यांचे उत्पन्न तळागाळातील
१० टक्क्यांहून १० पटीने जास्त आहे. युवावर्गातील बेरोजगारपणा कमी करण्यासाठी दोन आधारभूत गोष्टी महत्त्वाच्या आहेत- क्षमतांचा विकास आणि नव्या नोकऱ्यांची निर्मिती. स्पष्टपणे कर्मचाऱ्यांना शिक्षण पुरवठादारांसोबत काम करणे गरजेचे आहे, जेणेकरून विद्यार्थी त्यांना आवश्यक असलेली, कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठीची कौशल्ये आत्मसात करतील आणि यात सरकारची भूमिका महत्त्वाची ठरते.   
अलीकडच्या मॅकिन्जे ग्लोबल स्टडीनुसार, जगभरात –
* ७५ दशलक्ष तरुण बेरोजगार आहेत.
* ५४ % तरुणांना खात्री नाही की त्यांच्या माध्यमिक शिक्षणानंतरच्या पुढील शिक्षणामुळे नोकरी शोधण्याच्या त्यांच्या संधींमध्ये सुधारणा होते की नाही..
* जवळजवळ ५३ टक्के कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रवेश स्तरावरील रिक्त पदांचे मुख्य कारण कौशल्यांचा अभाव हे आहे.
यात भारताशी संबंधित सहा महत्त्वाचे
विषय आहेत –
* कर्मचारी, शिक्षण पुरवठादार आणि युवावर्ग, या सर्वानी परस्परांशी संलग्न राहून काम करणे जरुरी आहे, अन्यथा या समस्येकडे पाहण्याची प्रत्येकाची मानसिकता भिन्न होते.
* शिक्षण ते रोजगार या मार्गावर तीन महत्त्वाचे अडथळे स्पष्ट करणे आवश्यक आहे
* प्रवेशावेळी भरावे लागणारे पैसे जे अनियमित असतात आणि मागणी-पुरवठा यावर आधारित असतात.
* विश्वसनीय ऑन-द-जॉब ट्रेिनग आणि शिकणाऱ्यांचा अभाव.
शिक्षणाशी संबंधित नोकरी शोधणे आणि कल  
* बहुतांश कर्मचारी गुणवत्ता असलेले उमेदवार आकर्षति करण्यात आणि राखण्यामध्ये अपयशी ठरतात, कारण ते योग्य उमेदवारांपर्यंत पोहोचत नाहीत आणि जुडले जात नाहीत, अनेक युवांपकी फारच कमी जणांना त्यांच्या मनाप्रमाणे नोकरी मिळते. मात्र, बहुतांश तरुणांचे नुकसान होते कारण ते निष्काळजी राहतात, ते संघर्ष करत नाहीत आणि कायम निरुत्साही राहतात.   
* रोजगारयोग्य युवावर्ग निर्माण करण्यामध्ये दोन महत्त्वाचे यशस्वी घटक दिसून आले आहेत- ज्यामध्ये शिक्षण पुरवठादार आणि कर्मचारी एकमेकांशी सक्रियपणे संवाद साधतात. कर्मचाऱ्यांनी अभ्यासक्रम डिझाइन करण्यात मदत केली पाहिजे आणि त्यांना अतिथी शिक्षक म्हणून ऑफर दिली पहिजे – बोलावले पाहिजे. शिक्षण पुरवठादारांनी जॉब साइट्स आणि नोकरीची हमी देण्यासंबंधी विद्यार्थ्यांसाठी दीर्घकालीन इन्टर्नशिप कालावधी असेल याची खात्री केली पाहिजे. फक्त एकाच वेळी नोकरी देणे आणि प्लेसमेंट्सऐवजी शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या कालावधी दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांसोबत जुडण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे.  
* नोकरी निवडीसंबंधातील माहितीच्या प्रसारामध्ये प्रसारमाध्यमे व सरकारची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यांना करिअर पर्याय आणि ट्रेिनग मार्गावर माहितीचा अखंड पुरवठा गरजेचा असतो. प्रवेशापूर्वी कॅचमेंटवर ते असल्यामुळे शिक्षण पुरवठादारांनी जॉब प्लेसमेंट आणि करिअर मार्गक्रमणामध्ये अधिक स्वारस्य दाखवणे गरजेचे आहे. शाळा सोडल्यानंतर किंवा अभ्यासासाठी कोर्स घेतल्यानंतर कशाचा सामना करावा लागणार आहे, यांची तरुणांना स्पष्ट कल्पना असली पाहिजे. शैक्षणिक संस्थांनी ते काय शिकवत आहेत आणि नोकरीच्या बाजारपेठेत ते विद्यार्थ्यांशी कसे जुडले जातील याबाबत दक्ष असले पाहिजे.   
* अखेरीस किमतीचा समावेश करण्यासाठी शिक्षण पुरवठादारांनी कर्मचाऱ्यांच्या गरजांनुसार अनुकूल  किमतीमध्ये दर्जात्मक अभ्यासक्रम डिझाइन आणि प्रसार करण्यामध्ये इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे आहे.
रोजगार प्रदाता कामाच्या काळामधील मागणी आणि कर्मचाऱ्यांचा ठराविक अभ्यासक्रम देण्याकरिता विद्यार्थ्यांना व्यावहारिक दृष्टिकोन देण्यामध्ये नेटवर आधारित अ‍ॅप्रेन्टिसशिप मॉडय़ुल निर्माण करू शकतात.
सुनील चतुर्वेदी
संचालक – फार्मा नेटवर्क,
एनएमआयएमएस स्कूल ऑफ फार्मसी अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट
Sunil.chaturvedi@nmims.edu

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…