navi-sandhiसैन्य दलात कायदा पदवीधरांसाठी १४ जागा
उमेदवारांनी कायदा विषयातील पदवी कमीतकमी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत.
वयोगट २१ ते २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ डिसेंबर २०१४ ते २ जानेवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्य दलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २ फेब्रुवारी २०१५ पर्यंत अर्ज करावा.

वेस्टर्न कोल फील्डस् लिमिटेडमध्ये मायनिंग शॉट फिटर्सच्या ४३८ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी मायनिंग अथवा माइन सव्र्हेइंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा : २३ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ जानेवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली वेस्टर्न कोल फील्डस् लिमिटेडची जाहिरात  पाहावी अथवा डब्लूसीएलच्या http://www.westerncoal.nic.in   संकेतस्थळावर संपर्क साधावा.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर (पीअॅण्डआयआर), वेस्टर्न कोल फील्डस् लिमिटेड, कोल- इस्टेट, सिव्हिल लाइन, नागपूर- ४४०००१ या पत्त्यावर ५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षणार्थी ऑपरेटर टेक्निशिअनच्या २१९ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी मेटॅलर्जी, मेकॅनिकल, केमिकल वा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ जानेवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली स्टील अॅथॉरिटीची जाहिरात पाहावी अथवा ‘सेल’च्या http://www.sail.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ६ फेब्रुवारी २०१५ पर्यंत अर्ज करावा.

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी-  बंगळुरू येथे अभियंत्यांसाठी संधी
उमेदवारांनी अभियांत्रिकी अथवा तंत्रज्ञानामधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. ते फ्लाइट टेस्ट इंजिनीअर म्हणून पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ४८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ जानेवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली एरोनॉटिकल डेव्हलपमेंट अॅथॉरिटीची जाहिरात पाहावी अथवा एजन्सीच्या http://www.ada.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंत अर्ज करावा.

गव्हर्नमेंट प्रेस फरिदाबाद येथे शिकाऊ उमेदवारांसाठी ५० जागा
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ जानेवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली गव्हर्नमेंट प्रेस फरिदाबादची जाहिरात पाहावी अथवा प्रेसच्या http://www.dap.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज मॅनेजर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पिंट्रिंग प्रेस- फरिदाबाद (हरियाणा) या पत्त्यावर ८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.