navi-sandhi2राष्ट्रीय द्राक्ष संशोधन  केंद्र, पुणे येथे कनिष्ठ लिपिकांच्या २ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनीट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनीट पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० एप्रिल २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणेची जाहिरात पाहावी अथवा संशोधन केंद्राच्या http://ncrgrapes.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, राष्ट्रीय अंगूर संशोधन केंद्र, मांजरी फार्म डाकघर, सोलापूर रोड, पुणे ४१२३०७ या पत्त्यावर ५ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.

सीमा सुरक्षा दलात खेळाडूंसाठी २४१ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्यांनी विविध क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २३ वर्षे.
अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० एप्रिल २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी अथवा http://www.bsf.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील भरलेले अर्ज दि कमांडंट, २५ बटालियन, बीएसएफ, चावला कँप,पोस्ट ऑफिस-नाजफगड, नवी दिल्ली ११००६१ या पत्त्यावर ५ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

 कर्नाटक अँटिबायोटिक अँड फार्मास्युटिकल्समध्ये मॅनेजमेंट ट्रेनीजच्या ६ जागा
अर्जदार फार्मसीमधील पदवीधर व पदव्युत्तर पात्रताधारक असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ एप्रिल २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्नाटक अँटिबायोटिक अँड फार्मास्युटिकल्सची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या http://www.kapliindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज जनरल मॅनेजर (एचआरडी) कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लि. निर्माण भवन, डॉ. राजकुमार रोड, फर्स्ट ब्लॉक, राजाजीनगर, बंगळुरु-५६० ०१० या पत्त्यावर ५ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.

 भारतीय रिझर्व बँक नोट मुद्रणमध्ये कुशल कामगारांच्या ९० जागा
उमेदवार प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनीअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग वा टूल-डाय-मेकिंग यासारखी पात्रता उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांच्या गुणांची टक्केवारी कमीतकमी ५५ टक्के असायला हवी. ते आयटीआय पात्रताधारक असावेत व त्यांना संबंधित कामाचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ एप्रिल २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली रिझर्व बँकेची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या http://www.brbnmpl.com.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ६ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.

 संरक्षण मंत्रालयात सुपरिंटेंडेंट (स्टोर्स)साठी ९ जागा
उमेदवार कुठल्याही विषयातील पदवीधर वा मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा मटेरियल मॅनेजमेंटमधील पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ एप्रिल २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या तपशिलासह असणारे अर्ज ऑर्डनन्स डेपो, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, आवडी, चेन्नई ६०० ०५५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ७ मे २०१५.

एनएमडीसीमध्ये ट्रेनी-मेकॅनिकच्या ९ जागा
उमेदवार मेकॅनिकल इंजिनीअरिंमधील पदविधारक असावेत. अवजड वाहन चालकाचा परवाना असणाऱ्यांना प्राधान्य. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० एप्रिल २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली एनएमडीसीची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील भरलेले अर्ज डेप्युटी मॅनेजर (पर्सोनेल), आर अँड पी, एनएमडीसी लि. बालाडिला आयर्न ओर माईन, किरांडुल, काँप्लेक्स, जि. दक्षिण बस्तर, हांतेवाडा, छत्तीसगड ४९४५५६ येथे पाठवावेत.

टाटा मेमोरियल सेंटर खारघर-नवी मुंबई येथे टेक्निशियन्सच्या ६ जागा
अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी  ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ एप्रिल २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली टाटा मेमोरियल सेंटरची जाहिरात पाहावी अथवा सेंटरच्या http:www.actrec.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ८ मे २०१५ पर्यंत अर्ज करावेत.