navi-sandhi2अधिक माहितीसाउमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ३२ वर्षे. ठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ जुलै २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यात संपूर्णपणे भरलेले अर्ज जनरल मॅनेजर, कोर्डाईट फॅक्टरी, अरुवांकडू, निलगिरी डिस्ट्रिक्ट, तामिळनाडू ६४३२०२ या पत्त्यावर ८ ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.

गन अ‍ॅण्ड शेल फॅक्टरी, कोसिपोर-कोलकाता येथे कुशल कामगारांसाठी १९० जागा :
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पात्रताधारक असावेत. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ जुलै २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली गन अ‍ॅण्ड शेल फॅक्टरी, कोसिपोरची जाहिरात पाहावी अथवा gsf.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ८ ऑगस्ट २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

संरक्षण उत्पादन विभाग, चंद्रपूर येथे कुशल कामगारांच्या ४ जागा :
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ जुलै २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण उत्पादन विभाग, चंद्रपूरची जाहिरात पाहावी. अर्ज सीनिअर क्वालिटी अ‍ॅन्शुरन्स ऑफिसर, क्वालिटी अ‍ॅन्शुरन्स एस्टॅब्लिशमेंट (आर्यामेंटस्), चंद्रपूर- ४४२५०१ या पत्त्यावर ८ ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.
मध्य रेल्वेत नागपूर येथे खेळाडूंसाठी ५ जागा : उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. त्यांनी क्रिकेट, अ‍ॅथलॅटिक, स्विमिंग यांसारख्या क्रीडा प्रकारात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ जुलै २०१५ च्या अंकातील मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा  http://www.cr.indianrailways.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यात संपूर्णपणे भरलेले अर्ज सीनिअर डिव्हिजनल पर्सोनेल ऑफिसर, नागपूर मंडळ, मध्य रेल्वे, डीआरएम ऑफिस, किंग्जवे, नागपूर- ४४०००१ या पत्त्यावर १० ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.