अभियांत्रिकीच्या पदविका विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती

विशेष शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून प्रवेशिका अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदविका अभ्यासक्रम

‘एनटीपीसी’तर्फे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी देण्यात येणाऱ्या विशेष शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून प्रवेशिका अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थी अनुसूचित जाती-जमाती अथवा शारीरिकदृष्टय़ा अपंग गटातील असावेत. त्यांनी अभियांत्रिकी विद्याशाखेअंतर्गत २०१५-२०१६ या शैक्षणिक सत्रात इलेक्ट्रिकल मेकॅनिक्स, इन्स्ट्रमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल अथवा टेलिकम्युनिकेशन्स इंजिनीअरिंगच्या पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला असावा.

शिष्यवृत्तीची संख्या : या योजनेअंतर्गत पाच  शैक्षणिक शिष्यवृत्ती दिल्या जातात.

शिष्यवृत्तीचा  तपशील : निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांत दोन वर्षे कालावधीसाठी दरमहा १००० रु. शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल.

वरील कालावधीदरम्यान लाभार्थी विद्यार्थ्यांना अन्य शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही.

अर्जाचा नमुना : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ जानेवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘एनटीपीसी’ची विशेष शैक्षणिक शिष्यवृत्तीविषयक जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची मुदत : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले, आवश्यक तपशील आणि कागदपत्रांसह असणारे आपले अर्ज संबंधित शैक्षणिक संस्था- प्रमुखांमार्फत डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर), एनटीपीसी लि. ईस्टर्न रिजन हेडक्वार्टर्स, दुसरा मजला, लोकनायक जयप्रकाश भवन, डाक बंगला चौक, पाटणा ८००००१, बिहार या पत्त्यावर २८ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Engineering diploma student getting special scholarships from ntpc

ताज्या बातम्या