देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या : महिलांसाठी स्पेनमध्ये अभियांत्रिकीमधील शिष्यवृत्ती

तर्कशास्त्रातील संशोधनाविषयी भारतात जास्त अनुकूलता नाही. याउलट, मात्र पाश्चात्त्य देशांमध्ये तर्कशास्त्रामधील संशोधन उत्तम पातळीवर सुरू आहे. युरोपमध्ये या संशोधनात अग्रेसर असलेली एक उत्कृष्ट संस्था म्हणजे स्पेनस्थित – द जरगोझा लॉजिस्टिक्स सेंटर.

तर्कशास्त्रातील संशोधनाविषयी भारतात जास्त अनुकूलता नाही. याउलट, मात्र पाश्चात्त्य देशांमध्ये तर्कशास्त्रामधील संशोधन उत्तम पातळीवर सुरू आहे. युरोपमध्ये या संशोधनात अग्रेसर असलेली एक उत्कृष्ट संस्था म्हणजे स्पेनस्थित – द जरगोझा लॉजिस्टिक्स सेंटर. द जरगोझा लॉजिस्टिक्स सेंटरकडून दरवर्षी एमआयटी – जरगोझामध्ये प्रवेश घेतलेल्या काही निवडक महिला विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. अभियांत्रिकीमधील ही शिष्यवृत्ती ‘मास्टर ऑफ इंजिनीअिरग इन लॉजिस्टिक्स अ‍ॅण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दिली जाते. सेंटरच्या या शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी संबंधित विभागाकडून १५ मे २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल –
स्पेनमध्ये असलेल्या द जरगोझा लॉजिस्टिक्स सेंटरकडून दरवर्षी एमआयटी – जरगोझामध्ये प्रवेश घेतलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवृत्त्या दिल्या जातात. महिलांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन लॉजिस्टिक्समधील उत्तमोत्तम तज्ज्ञ तयार व्हावेत, अशा हेतूने या शिष्यवृत्त्या महिला विद्यार्थ्यांना प्रदान केल्या जातात. ही शिष्यवृत्ती मात्र अभियांत्रिकीमधील असून ती ‘मास्टर ऑफ इंजिनीअरिंग इन लॉजिस्टिक्स अ‍ॅण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दिली जाते. शिष्यवृत्तीची रक्कम अर्जदाराच्या एकूण शिकवणी शुल्काच्या अर्धी म्हणजे साधारणपणे २१,५०० युरो एवढी आहे.
आवश्यक अर्हता-
लॉजिस्टिक्स सेंटरची ही शिष्यवृत्ती फक्त महिलांसाठी असून ती सर्व आंतरराष्ट्रीय महिला विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार पदवीधर असावी. मात्र पदवी कार्यक्रमाचा एकूण कालावधी हा चार वर्षांचा असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, आपल्याकडे असलेली फार्मसी किंवा अभियांत्रिकीची चार वर्षांची पदवी. तसेच या शिष्यवृत्तीला अर्ज करण्याअगोदर अर्जदाराला एमआयटी – जरगोझामध्ये पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला असणे आवश्यक आहे. हा पदव्युत्तर अभ्यासक्रम ‘लॉजिस्टिक्स अ‍ॅण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या शाखेमधलाच असावा. अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदार विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. त्याबरोबरच अर्जदाराने GMAT या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवणे भाग आहे. टोफेल अथवा IELTS या इंग्रजी भाषेच्या दोन्हीपकी एका परीक्षेत उत्तीर्ण असायला हवे.
अर्ज प्रक्रिया :
अर्जदार या शिष्यवृत्तीसाठी दोन प्रकारे म्हणजे एक तर ई-मेलच्या स्वरूपात किंवा पोस्टाने अर्ज करू शकते. अर्जाचा दुवा संस्थेच्या वेबसाइटवर दिलेला आहे. अर्जामध्ये अर्जदाराला एक एस.ओ.पी. (Statement of Purpose)- ज्यामध्ये तिच्या आवडीनिवडी, छंद, शिक्षण, शिक्षणेतर उपक्रम, कामाचा अनुभव, आर्थिक परिस्थिती व शिष्यवृत्तीची गरज का आहे इत्यादी गोष्टी सविस्तर मांडाव्या लागतील. त्याचबरोबर अर्जदाराला स्वत:च्या उत्पन्नाचा दाखला, पासपोर्टची एक प्रत व एमआयटी – जरगोझामध्ये प्रवेश मिळालेला आहे, असे नमूद करणाऱ्या प्रवेशपत्राची एक प्रत अर्जाबरोबर जोडावी लागेल किंवा ई-मेल करावी लागेल. या सर्व माहितीसह अर्जदाराने आपला अर्ज ZLS financial aid office ला पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे ciqarcia@zls.edu.es या ई-मेलवर पाठवून द्यावा.
अंतिम मुदत –
अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ मे २०१३ आहे.
महत्त्वाचा दुवा – http://www.mastersupplychain.edu.esitsprathamesh@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Engineering scholarship for women in spain

ताज्या बातम्या